वाणिज्य मंत्री गोयल सध्या न्यूयॉर्क, न्यू जर्सी आणि वॉशिंग्टन या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी भारतीय – अमेरकन्ससोबत संवाद साधला.
यावेळी त्यांनी भारताच्या वाटचालीचे कौतुक केले. अमेरिकेला भारतीय प्रतिभेचा कसा फायदा झाला याचेही त्यांनी कौतुक केले.
केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना देशात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले आहे. चार दिवसांच्या US दौऱ्यावर आलेले गोयल (Piyush Goyal )यांनी एडिसन, न्यू जर्सी येथे भारतीय-अमेरिकन यांना संबोधित केले. त्यांना जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादनांचा विस्तार करण्याचे आवाहन केले. त्यांनी भारताची महत्त्वाकांक्षी दृष्टी, धोरणात्मक इत्यादींचा उल्लेख केला.
भारताला बनायचे आहे जागतिक गुरू
उपस्थित समुदायाला संबोधित करताना, गोयल म्हणाले, 'मी तुम्हाला नवीन भारत, एक शक्तिशाली भारत आणि भारताची रूपरेषा तयार करण्यात मदत करण्यासाठी आमंत्रित करतो. भारत जागतिक विकासाचे नेतृत्व करेल. भारताने 'विश्वगुरु' बनायचे ठरवले आहे. ते म्हणाले की, यावर्षी आम्ही G-20 चे अध्यक्ष आहोत. तुमच्या क्षमता आणि तुमच्या योगदानाबद्दल जगाला माहिती होणे महत्वाचे आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपण केवळ आपल्या कर्तृत्वाचे आणि वैभवाचे दर्शन घडवत नाही, तर या काळातील विचारांवरही लक्ष केंद्रित करतो.
भारत - अमेरिका यांचे संबंध मजबूत
वाणिज्य मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) म्हणाले की, भारत आणि अमेरिका यांचे आर्थिक संबंध मजबूत आहेत. अनेक क्षेत्रात चांगले भागीदार आहेत. दोन्हीकडे लोकशाही आहे. आम्हा दोघांमध्ये खूप घट्ट नातं आणि मैत्रीचं बंध आहे. मजबूत भौगोलिक राजकीय संबंध आहेत आणि दोन्ही देशांना व्यापारात खूप रस आहे. गोयल म्हणाले की, भारतीय वंशाच्या लोकांनी देशाचा विकास प्रवास पुढे नेला पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे. येत्या 25 वर्षात आपण भारताला आणि जगासाठीचे योगदान एका नव्या उंचीवर नेऊ.
वाणिज्य मंत्र्यांनी कोविड लॉकडाऊननंतर भारताची अर्थव्यवस्था कशी परत आली हे या समुदायासमोर सांगितले. गोयल म्हणाले की, 2022 हे विक्रमी बिझनेस वर्ष होते. यामध्ये भारताची निर्यात 670 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढली आहे.
13व्या व्यापार धोरण मंचाच्या बैठकीत सहभागी
13व्या ट्रेड पॉलिसी फोरम (TPF) मंत्रिस्तरीय बैठकीत सहभागी होण्यासाठी गोयल अमेरिकेत आहेत. हा मंच दोन्ही देशांमधील व्यापारासाठी एक मूलभूत यंत्रणा आहे. या बैठकीला अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कॅथरीन ही उपस्थित राहणार आहेत. गोयल यांच्यासोबत आलेले भारतीय उच्च पदस्थ अधिकारी अमेरिकेच्या वाणिज्य सचिव जीना रायमोंडो यांचीही भेट घेणार आहेत. TPF ची स्थापना जुलै 2005 मध्ये व्यापार आणि गुंतवणूक समस्यांवर चर्चा करण्यासाठी करण्यात आली. 23 नोव्हेंबर 2021 रोजी 12वी TPF मंत्रीस्तरीय बैठक चार वर्षांच्या कालावधीनंतर दिल्लीत झाली होती.