Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SVB Bank Collapsed: अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक बुडाली! पैसे काढण्यासाठी ठेवीदारांच्या रांगा, शेअर्सची धूळदाण

SVB Bank Collapsed

Image Source : www.coindesk.com

SVB Bank Collapsed: अमेरिकेतील दुसरी सर्वात मोठी बँक म्हणून ओळखली जाणारी सिलिकॉन व्हॅली बँक (Silicon Valley Bank Collapsed) भांडवल संपल्याने बुडाली आहे. रोजचा व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी हाताशी पैसेच नसल्याने सिलिकॉन व्हॅली बँकेला बिझनेस तडकाफडकी बंद करावा लागला आहे. या घटनेने जगभरात एकच खळबळ उडाली आहे.

 ( (अमेरिकेतील दुसरी सर्वात मोठी बँक म्हणून ओळखली जाणारी सिलिकॉन व्हॅली बँक (Silicon Valley Bank Collapsed) भांडवल संपल्याने बुडाली आहे. रोजचा व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी हाताशी पैसेच नसल्याने सिलिकॉन व्हॅली बँकेला बिझनेस तडकाफडकी बंद करावा लागला आहे. या घटनेने जगभरात एकच खळबळ उडाली आहे. यानंतर तातडीने बँकेवर प्रशासक नेमण्यात आला असून ठेवीदारांना विमा भरपाई देण्याची प्रक्रिया 13 मार्चपासून सुरु होणार आहे. 2008 मध्ये लेहमन ब्रदर्सच्या दिवाळखोरीने जागतिक अर्थव्यवस्थेला मंदीच्या खाईत लोटले होते. तशीच पुनरावृत्ती सिलिकॉन व्हॅली बँकेच्या दिवाळखोरी होईल, अशी भीती जाणकार व्यक्त करत आहेत.

वर्ष 2020 नंतर पहिली बँक बुडली आहे. सिलिकॉन व्हॅली बँकेचा डोलारा कोसळणे हा सर्वांसाठी धोक्याचा इशारा असल्याचे बँकरेटमधील विश्लेषक मॅथ्यू गोल्डबर्ग यांनी म्हटले आहे. एकीकडे फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढीचा सपाटा सुरु आहे. अशाच एखादी मोठी बँक अवसायानत निघणे हे अमेरिकेसाठी परवडणारे नाही, असे गोल्डबर्ग म्हणाले. व्याजदर वाढल्याने आयपीओ मार्केट ओस पडले आहे. त्यामुळे छोट्या कंपन्यांना , स्टार्टअप्सना जादा व्याजदराने पैसे उभारावे लागत आहेत. सिलिकॉन व्हॅली बँकेच्या काही क्लाईंट्सनी शेअर मार्केटमधून प्रचंड प्रमाणात पैसे काढून घेतल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, शुक्रवारी 10 मार्च 2023 रोजी सिलिकॉन व्हॅली बँक डबाघाईला आल्याचे कळताच बँक खातेदार आणि ठेवीदारांमध्ये खळबळ माजली आहे. अमेरिका आणि युरोपातील ठेवीदारांनी बँकेचा शाखांमध्ये पैसे काढण्यासाठी रांगा लावल्याचे व्हिडिओज सोशल मिडियात पोस्ट करण्यात आले आहेत. 

सिलिकॉन व्हॅली बँकेचे शेवटपर्यंत प्रयत्न (SVB Sold US Bonds)

सिलिकॉन व्हॅली बँकेने भांडवल उभारणीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न सुरु ठेवले होते. पैशांची गरज भागवण्यासाठी बँकेने बुधवारी 21 बिलियन डॉलर्सचे बॉंड खुल्या बाजारात विक्री केले होते. यात प्रामुख्याने सरकारी रोखे अर्थात यूएस ट्रेझरीजचे प्रमाण सर्वाधिक होते. त्याशिवाय 2.25 बिलियन डॉलर्सचे शेअर्स विक्री करुन निधी उभारण्याचे शेवटचे प्रयत्न बँकेने केले.  

अमेरिकेतील स्टार्टअप्सला मोठा धक्का (StartUps May Face Big Crises Ahead) 

अमेरिकेच्या इतिहासात सिलिकॉन व्हॅली बँकेच्या रुपाने दुसरी बँक बुडाली आहे. सिलिकॉन व्हॅली बँक बुडणे हे अमेरिकेतील स्टार्टअप्सला मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. या बँकेने स्टार्टअप्ससाठी प्रचंड अर्थसहाय्य केले आहे. दरम्यान, सिलिकॉन व्हॅली बँकेने भांडवल उभारणीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न सुरु ठेवले होते, मात्र त्यात अपयश आल्याने बँकेवर व्यवसाय बंद करण्याची नामुष्की ओढवली आहे.

SVB बँकेच्या शेअर्सची धूळदाण उडाली (SVB Bank Shares See Sharp Fall)

आर्थिक डबघाईला आलेल्या सिलिकॉन व्हॅली बँकेला शेअर मार्केटमध्ये प्रचंड फटका बसला आहे. एकीकडे हाती पुरेस भांडवल नसल्याने व्यवसाय बंद करण्याचे संकट ओढवलेले असतानाच शेअर मार्केटमध्ये बँकेचा शेअर केवळ दोन दिवसांत तब्बल 66% कोसळला आहे. या प्रचंड घसरणीने SVB बँकेला तब्बल 100 बिलियन डॉलर्सचे बाजार भांडवल गमवावे लागले आहे. SVB बँकेच्या शेअरमधील घसरणीचे तडाखे जगभरातील शेअर बाजारांना बसले आहेत. गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेण्याचा सपाटा लावल्याने आशियापासून युरोप-अमेरिकेतील शेअर बाजार कोसळले. 

बँकेतील 89% ठेवींना विमा संरक्षण नाही, ठेवीदार संकटात (89% Deposit Uninsured)

कॅलिफोर्नियामधील बँक रेग्युलेटरने एसव्हीबी बँकेवर फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशनची (FDIC) नियुक्ती केली आहे.  येत्या 13 मार्च 2023 पासून बँकेच्या मुख्य कार्यालय आणि सर्व ब्रॅंचेसमधून FDIC ठेवीदारांना विमा भरपाई देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येईल, असे बँक रेग्युलेटरने म्हटले आहे.  यासाठी प्रसंगी सिलिकॉन व्हॅली बँकेची मालमत्ता विक्री करण्याची तयारी FDIC ने केली आहे.  बँकेकडे 175 बिलियन डॉलर्सच्या ठेवी आहेत. मात्र वर्ष 2022 च्या आकडेवारीनुसार  त्यातील 89% ठेवींना विमा संरक्षण नाही. त्यामुळे बँकेच्या ठेवीदारांचा जीव टांगणीला लागला आहे. सिलिकॉन व्हॅली बँकेत अनेक छोट्या मोठ्या कंपन्यांनी डिपॉझिट ठेवल्या आहेत. मात्र त्यांना विमा संरक्षण नसल्याने या कंपन्यांना मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील रोबलॉक्स कॉर्प, रोकू इन्कॉर्पोरेश अशा कंपन्यांनी सिलिकॉन व्हॅली बँकेत लाखो डॉलर्स डिपॉझिट केले आहेत.

पुढल्या आठवड्यात शेअर बाजार आणखी कोसळणार (Market May have Huge Fall)

विकेंडमुळे शेअर मार्केट दोन दिवस बंद असल्याने गुंतवणूकदारांनी काहीचा सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र सिलिकॉन व्हॅली बँक बुडणे म्हणजे अमेरिकेतील बँकांसाठी धोक्याची सूचना आहे. बाजारात रोकड तरतलता आटली आहे. विशेषत: स्टार्टअप आणि छोट्या उद्योजकांना पैशांची आणि खेळत्या भांडवलाची प्रचंड चणचण जाणवत आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण होईल, असा अंदाज शेअर बाजार विश्लेषक व्यक्त करत आहेत. व्हॅलेन ग्लोबल अॅडव्हायझरचे अध्यक्ष ख्रिस्तोफर व्हॅलेन यांनी सांगितले की बँका आर्थिक संकटात सापडल्याने  त्याचे पडसाद पुढील आठवड्यात शेअर मार्केटमध्ये उमटतील.

या' प्रकरणावर व्हाईट हाऊसची काय आहे स्ट्रॅटेजी? (White House Strategy On SVB Episode) 

सिलिकॉन व्हॅली बँक अचानक बुडाल्यानंतर व्हाईट हाऊसमधील घडामोडींना वेग आला आहे. यूएस ट्रेझरी सेक्रेटरी जॅनेट येलेन यांनी बँकिंग रेग्युलेटरची शुक्रवारी भेट घेतली. सिलिकॉन व्हॅली बँक प्रकरणी निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यास सक्षम असल्याचा विश्वास त्यांनी बँक नियंत्रकाला दिला. वर्ष 2008 च्या जागतिक मंदीनंतर अमेरिकेतील बँकांची पाळेमुळे भक्कम असल्याचा दावा अमेरिकेच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षा सेसिला राउस यांनी केला आहे. अमेरिकेच्या बँकिंग नियंत्रकावर भरवसा असल्याचे व्हाईट हाऊसने म्हटले आहे.

(बातमीसाठी सोर्स :  Reuters, CNN News)