अनिवासी भारतीय नागरिक लवकरच त्यांच्या आंतरराष्ट्रीय मोबाईल क्रमांकावरून UPI प्लॅटफॉर्म वापरू शकतील . नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI प्लॅटफॉर्मला काही अटींच्या अधीन राहून दहा देशांतील NRI खातेधारकांना आंतरराष्ट्रीय मोबाइल नंबरसह ऑनलाईन पेमेंटची सुविधा वापरण्याची परवानगी दिली आहे. या 10 देशांमध्ये NRE (Non-Resident External Account) किंवा NRO (Non-Resident Ordinary) खाती असलेल्या अनिवासी भारतीयांना UPI प्लॅटफॉर्मद्वारे व्यवहार करण्यासाठी भारतीय मोबाइल नंबरची आवश्यकता राहणार नाही.
परवानगी देण्यात आलेले हे दहा देश कोणते?
10 जानेवारी 2023 रोजी जारी केलेल्या NPCI परिपत्रकानुसार, NPCI या देशांना परवानगी देणार आहे:
काय आहेत अटी?
NPCI परिपत्रकानुसार, आंतरराष्ट्रीय मोबाइल क्रमांक असलेल्या NRE किंवा NRO खातेधारकांना या अटींच्या पूर्ततेच्या अधीन राहून UPI प्लॅटफॉर्मवर नोंदणी आणि व्यवहार करण्याची परवानगी असेल.
- बँकांनी याची खात्री करणे आवश्यक आहे की NRE किंवा NRO खात्यांना केवळ सध्याच्या FEMA (फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट एक्ट) नियम आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या संबंधित नियामक विभागांनी वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वे/सूचनांनुसार परवानगी दिली आहे.
- मनी लाँडरिंग/दहशतवादी फंडिंग विरोधी सर्व आवश्यक तपास बँकांनी करणे अनिवार्य आहेत.
- NPCI नुसार, अनिवासी भारतीयांना त्यांच्या आंतरराष्ट्रीय मोबाइल नंबरसह UPI व्यवहार करण्यासाठी NRE किंवा NRO खाते असणे आवश्यक आहे, त्याशिवाय UPI व्यवहार करता येणार नाही.
- सध्याच्या UPI मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सेवा घेणारे खातेदारांची आर्थिक व्यवहार पडताळणी, जोखीम नियम इत्यादी NRE किंवा NRO खात्यांसाठी लागू असणार आहेत.
- NPCI ने सर्व बँकांना आणि खातेधारकांना 30 एप्रिल 2023 पर्यंत या सूचनांचे पालन करण्यास सांगितले आहे.
UPI म्हणजे काय?
UPI ही एक रिअल-टाइम पेमेंट सिस्टम आहे जी मोबाइल प्लॅटफॉर्मवरून त्वरित पैसे हस्तांतरण करते. तुम्ही फक्त UPI सुविधा देणाऱ्या बँक खात्यासह UPI ID तयार करू शकता आणि पैसे पाठवण्यासाठी/हस्तांतरित करण्यासाठी त्याचा वापरू शकता. डिसेंबर 2022 मध्ये, UPI द्वारे 12.82 लाख कोटी रुपयांचे विक्रमी आर्थिक व्यवहार झाले आहेत.