Aren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Union Budget 2023 Updates: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट 2023 सादर केलं. पण, त्याचा तुमच्या आमच्यावर काय परिणाम होणार आहे? बदललेली कर रचना फायद्याची की तोट्याची? रोजगार निर्मिती नेमकी कुठे होईल? अशा तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया गुंतवणूक तज्ज्ञ योगेंद्र जोशी आणि शेअर बाजार विश्लेषक निखिलेश सोमण यांच्याकडून...
Feb 02, 2023 00:41 IST
महागाईबाबत सरकारची भूमिका काय?
महागाई सतत बदलत असते. रशिया आणि युक्रेन युद्धानंतर महागाई वाढली. केवळ भारतातच नाहीतर युकेमध्ये सुद्धा महागाई वाढली. तरिही विकसनशील देशांच्या तुलनेत भारतात महागाई कमी आहे. महागाई नियंत्रणाची जबाबदारी रिझर्व्ह बँकेवर आहे.
-- योगेंद्र जोशी, गुंतवणूक तज्ज्ञ
Feb 02, 2023 00:32 IST
महिलांना 'या' बजेटमध्ये काय मिळाले
महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट ही दोन वर्ष मुदतीची गुंतवणूक योजना असून यात महिला जास्तीत जास्त दोन लाख रुपयांची गुंतवणूक करु शकतात. या योजनेत महिलांना 7.5% व्याज मिळणार आहे.
- योगेंद्र जोशी, गुंतवणूक तज्ज्ञ
81 लाख बचत गटांसाठी सरकारने बजेटमध्ये भरीव तरतूद केली आहे. ग्रामीण भागाबरोबरच शहरात देखील बचत गट कार्यरत आहे. कॉर्पोरेट कंपन्या बचत गटांची उत्पादने विक्री करतात. बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न केला आहे.
- निखिलेश सोमण, शेअर बाजार विश्लेषक
Feb 02, 2023 00:23 IST
रोजगार हमी योजनेच्या तरतुदीत बजेटमध्ये कपात केली
सरकारला रोजगार द्यायचा नाही असे नाही तर रोजगाराची हमी द्यायची नाही. इन्फ्राला 30 टक्के जादा निधी, रस्ते, पूल बांधणी या गोष्टी करताना काम करणारा कामगार मनरेगामधून येतो. प्रकल्प करताना इतर गोष्टी येतात जसे सिमेंट, पोलाद , बँकिंग क्षेत्र येते. 10 लाख कोटींची गुंतवणूक होणार असल्याने याला पूरक क्षेत्रात रोजगार संधी निर्माण होतील असे वाटते.
- निखिलेश सोमण, शेअर बाजार विश्लेषक
Feb 02, 2023 00:16 IST
आर्थिक व्यवहार करताना पॅनकार्ड हे केवायसीसाठी महत्वाचे डाक्युमेंट असेल.
आर्थिक व्यवहार करताना पॅनकार्ड हे केवायसीसाठी महत्वाचे डाक्युमेंट असेल. कर भरणाऱ्यांची संख्या अजूनही मर्यादित आहे. त्यामुळे पॅनकार्डमुळे सर्व व्यवहारांची माहिती आयकर विभागाला मिळेल. - निखिलेश सोमण, शेअर बाजार विश्लेषक
Feb 02, 2023 00:10 IST
20 वर्षाच्या तरुणाने गुंतवणूक कुठे करावी
गुंतवणूक करताना जोखीम आणि उत्पन्न, निवृत्ती नियोजन यांचा विचार करायला हवा. जसे विमा, एसआयपी, शेअर मार्केटमध्ये इक्विटी योजना असेल तर दिर्घकालीन अर्थात 5 वर्ष, 10 वर्ष 20 वर्ष अशी असावी. - योगेंद्र जोशी, गुंतवणूक तज्ज्ञ
Feb 02, 2023 00:07 IST
तरुणाईला बजेटमध्ये काय मिळाले
या बजेटमध्ये सरकारने कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्सबाबत घोषणा करण्यात आल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञानासाठी 30 हून अधिक युनिव्हर्सिटी, ड्रोन तंत्रज्ञान यासारखे कौशल्य विकासाचे प्रोग्रॅम जाहीर करण्यात आले. यातून तरुणाईला अनेक संधी उपलब्ध होतील. आपण आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल करु, सरकारची भूमिका नवीन उद्योजक तयार व्हावेत अशी आहे.
- निखिलेश सोमण, शेअर बाजार विश्लेषक
Feb 02, 2023 00:03 IST
क्रिप्टोबाबत आजही सुस्पष्टता नाही- निखिलेश सोमण, शेअर बाजार विश्लेषक
आज बजेटमध्ये क्रिप्टोबाबत कोणतीही घोषणा झाली नाही. मात्र सरकार यावर नक्कीच काम करत असेल. कदाचित सरकारला क्रिप्टो नको असेल त्यामुळे भविष्यात क्रिप्टोवर बंदी येऊ शकते, असे आपल्याला वाटते. डिजिटल करन्सी मिडियम ऑफ एक्सचेंज आहे. पेमेंट सुलभतेसाठी डिजिटल करन्सी पर्याय आहे. - निखिलेश सोमण, शेअर बाजार विश्लेषक
Feb 02, 2023 00:00 IST
योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यात अडचणी - निखिलेश सोमण
सरकारची मानसिकता जास्तीत जास्त लोकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवणे आवश्यक आहे, मात्र देशाची लोकसंख्या आणि त्रोटक यंत्रणा पाहता अंमलबजावणीत अडथळे येत आहेत. त्यामुळे खासगीकरणाकडे सरकारचा कल दिसून येतो.- निखिलेश सोमण, शेअर बाजार विश्लेषक
Feb 01, 2023 23:54 IST
ज्येष्ठ नागरिकांसाठी बजेटमध्ये काय घोषणा झाल्या?
सिनियर सिटीजन सेव्हिंग्ज ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील गुंतवणूक मर्यादा दुपटीने वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत (Senior Citizen Saving Scheme - SCSS) आता ज्येष्ठ नागरिकांना 30 लाख रुपयांची गुंतवणूक करता येणार आहे. पोस्टाच्या मंथली इन्कम स्किममधील गुंतवणूक मर्यादा आता 9 लाख रुपये करण्यात आली आहे. यापूर्वी ही मर्यादा 4.5 लाख रुपये होती. जॉइंट अकाउंटसाठी ही मर्यादा 9 लाख रुपयांवरुन 15 लाख करण्यात आली आहे.
- योगेंद्र जोशी, गुंतवणूक तज्ज्ञ
Feb 01, 2023 23:54 IST
नवीन कर प्रणालीत कर सवलत मिळेल का?
नवीन कर प्रणालीत कोणतीही कर सवलत नाही. नवीन कर प्रणालीत 50000 रुपयांचे स्टॅंडर्ड डिडक्शन हा एक फायदा मिळणार आहे. नवीन कर प्रणाली डिफॉल्ट म्हणून ग्राह्य धरला आहे. - योगेंद्र जोशी, गुंतवणूक तज्ज्ञ
Feb 01, 2023 23:54 IST
नवीन कर प्रणालीने बचतीच्या सवयीवर परिणाम होईल का
विमा हा गुंतवणुकीचा भाग आहे. जर गुंतवणूक झाली नाही किंवा बचत झाली नाही तर ग्राहक तो पैसा खर्च करेल, त्यामुळे सरकारने एकाच दगडात दोन पक्षी मारलेत. सरकारचे असे म्हणणे आहे कि बचत करा आणि उरलेल्या पैशांत गुंतवणूक करा. बचत आणि गुंतवणूक हा संस्काराचा भाग- निखिलेश सोमण, शेअर बाजार विश्लेषक
बचत आणि गुंतवणूक यांचा ताळमेळ साधण्याचा प्रयत्न आजच्या बजेटमधून केला आहे. - योगेंद्र जोशी, गुंतवणूक तज्ज्ञ
Feb 01, 2023 23:46 IST
जुनी कर प्रणाली किंवा नवीन कर प्रणाली कोणती कर प्रणाली निवडवावी?
एकदा नवीन कर प्रणाली निवडली तर जुनी कर प्रणाली निवडता येणार नाही. दोन्ही कर प्रणालीबाबत करदात्यांनी त्यात दिलेल्या कर सवलती तपासून निवड करायला हवी. सरकारचा प्रयत्न हा नवीन कर प्रणालीत जास्तीत जास्त करदात्यांनी स्वीकारावी याचा आहे.
- योगेंद्र जोशी, गुंतवणूक तज्ज्ञ
Feb 01, 2023 23:43 IST
कर रचनेतील बदल केवळ नवीन कर प्रणालीत- योगेंद्र जोशी, गुंतवणूक तज्ज्ञ
वर्ष 2020 मध्ये नवीन आणि जुनी कर प्रणाली अशा दोन कर प्रणालीत जाहीर करण्यात आली होती. आजचा बदल हा केवळ नवीन कर प्रणालीत झाला आहे. 9 लाख उत्पन्न असणाऱ्याला 45000 रुपये कर भरावा लागेल. योगेंद्र जोशी, गुंतवणूक तज्ज्ञ
Feb 01, 2023 23:40 IST
बजेटमध्ये तळागाळातील घटकांचा विचार झाला, अंमलबजावणी महत्वाची- निखिलेश सोमण, शेअर बाजार विश्लेषक
मागील अनेक वर्षातील वेगळे बजेट, दरवर्षी तळागाळातील घटकांचा विचार बजेटमध्ये करण्यात आल्याचे दिसून आले. यंदा युवकांना केंद्रस्थानी ठेवून बजेटमध्ये घोषणा करण्यात आल्या. सर्वसाधारण गुंतवणूकदार, भांडवलदार, उद्योजकांचा विचार, या सरकारचा अंमलबजावणी करण्याचा रेशो चांगला - निखिलेश सोमण, शेअर बाजार विश्लेषक
Feb 01, 2023 23:26 IST
Union Budget 2023 Analysis & Highlights Live : आजचे बजेट शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न- योगेंद्र जोशी, गुंतवणूक तज्ज्ञ
अर्थव्यवस्थेत पैसा खेळता राहायला हवा. तरच भारत 5 ट्रिलियन डॉलरकडे जाऊ. शेवटच्या घटकांपर्यंत पैसा पोहोचणे आवश्यक. - योगेंद्र जोशी, गुंतवणूक तज्ज्ञ
संबंधित पोस्ट
-
NMC Budget 2023 : नागपूर शहरात डबल डेकर जलकुंभासाठी मनपा देणार 90 कोटी
25 Mar, 2023 00:29 469 -
Maharashtra Budget 2023-24: राज्याच्या बजेटमधून सरकार पोलिसांवर किती रुपये खर्च करते?
17 Mar, 2023 01:47 709 -
Maharashtra Budget 2023-24: राज्यातील प्रत्येक नागरिकावर 56 हजारांचे कर्ज!
13 Mar, 2023 17:30 1,079 -
Lek Ladki Yojna: जन-सामान्यांना सरकारची भेट, आता मुलींच्या शिक्षणासाठी मिळणार 75 हजार रुपये
10 Mar, 2023 17:32 725