Form 15G/H Submit On WhatsApp: ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांचा वेळ वाचवण्यासाठी अनेक बॅंकांनी आपल्या सिस्टिमध्ये अनेक बदल केले आहेत. यामध्ये ऑनलाईन आणि डिजिटल बॅंकिंगने तर ग्राहकांना खूपच सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यात आता युनिअन बॅंकेने बॅंकेतील ठेवींवर मिळणाऱ्या व्याजावर टीडीएस कापला जाऊ नये, म्हणून भरावा लागणारा फॉर्म 15G आणि 15H हा व्हॉट्सॲपवरून भरून पाठवण्याची सुविधा सुरू केली. यामुळे ज्येष्ठ नागरिकांची मोठी सोय होणार आहे.
Table of contents [Show]
काय आहे युनिअन व्हर्च्युअल कनेक्ट
युनिअन बॅंकेने याबाबत प्रसिद्ध केलेल्या माहितीत नमूद केले आहे की, रिझर्व्ह बॅंक इनोव्हेशन हब (Rerserve Bank Innovation Hub-RBIH) यांच्या सहकार्याने ही प्रक्रिया राबवली जात आहे. बॅंकेने या सेवेला युनिअन व्हर्च्युअल कनेक्ट (Union Virtual Connect-UVConn) असे नाव दिले. युनिअन बॅंकेचे ग्राहक UVConn च्या माध्यमातून ही सेवा 7 वेगवेगळ्या भाषांमधून घेऊ शकतात.युनिअन बॅंकेच्या ग्राहकांना बॅंकेला दिलेल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 09666606060 या क्रमांकावर Hi असा मॅसेज पाठवायचा आहे.
युनिअन बॅंकेने RBIH च्या सहकार्याने या सेवेत आणखी एक नवीन फीचर जोडले आहे. बॅंकेने UVConn द्वारे फॉर्म 15G आणि 15H व्हॉट्सॲपद्वारे भरण्याची सुविधा ग्राहकांना देऊ केली आहे. यापूर्वी युनिअन बॅंकेने रिझर्व्ह बॅंक इनोव्हेशन हब (RBiH)च्या मदतीने किसान क्रेडिट कार्ड या योजनेच्या डिजिटायझेशनचा कार्यक्रम लॉन्च केला होता. या सेवेला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याने युनिअन बॅंकेने RBiH च्या सहकार्याने आता विना अडथळा व्हॉट्सॲपवरून फॉर्म 15 G आणि 15 H भरता येणार आहे. बॅंकेने यापूर्वीच टेक्नॉलॉजीचा वापर करत ज्येष्ठ नागरिक आणि टेक्नोसॅव्ही ग्राहकांसाठी वेगवेगळ्या ऑनलाईन सेवा सुरू केल्या आहेत.
15H/15G फॉर्म काय आहे?
बँकेत जमा केलेल्या मुदत ठेवींवर बॅंक व्याज देते. हे व्याज एका वर्षात 40,000 रुपयांहून अधिक असेल तर, बँक त्या रकमेतून टीडीएस वजा करते.पण एखाद्या ग्राहकाचे एकूण उत्पन्न करउत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा कमी असेल (Income Below Tax Limit) तर तो ग्राहक फॉर्म 15G आणि फॉर्म 15H भरून बँकेला टीडीएस वजा न करण्याची विनंती करु शकतो. 60 वर्षाखालील आणि 60 वर्षावरील ग्राहक 15G/H फॉर्म भरू शकतात.
इन्कम टॅक्स कायद्यातील 194A नुसार बँकांकडून मुदत ठेवींवरील व्याजावरील उत्पन्नावर टीडीएस कापला जातो. साधारणपणे एका वर्षात ग्राहकाला 40,000 रुपयांपेक्षा जास्तीच्या व्याजावर टीडीएस भरावा लागतो. त्यातून सवलत मिळवण्यासाठी ग्राहक 15H/G फॉर्म भरू शकतात. ही सुविधा अनिवासी भारतीय आणि कंपन्यांना लागू होत नाही.
फॉर्म 15G आणि 15H कुठे लागू होतो?
- कॉर्पोरेट बॉण्डमधील उत्पन्नावर टीडीएस वजा केल्यावर
- एलआयसी प्रिमीयमच्या रिसिप्टवर
- पोस्ट ऑफिस डिपॉझिटमधून टीडीएस वजा केल्यावर
- ईपीएफचे पैसे काढताना टीडीएस कापल्यावर
- भाड्याची रक्कम वर्षाला 2.4 लाखाहून अधिक असल्यास
- इन्शुरन्सच्या कमिशनवर टीडीएस कापल्यावर
युनिअन बॅंक व्हॉट्सॲप सेवा
युनिअन बॅकेने ग्राहकांना फॉर्म 15G/H चा फॉर्म व्हॉट्सॲपवरून भरण्यासाठी 09666606060 हा मोबाईल क्रमांक जाहीर केला आहे.