ट्रॉन (TRX) या बाजार भांडवलानुसार 18व्या सर्वात मोठ्या टोकेनची किंमत क्रिप्टो एक्सचेंज हुओबीवर मोठ्या प्रमाणात घसरली होती. तर क्रिप्टो वॉलेटमधून क्रिप्टो एक्सचेंज बायनान्समध्ये 50 दशलक्ष डॉलरपेक्षा जास्तीची हालचाल दिसून आली. बाजार मूल्यानुसार सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी असलेली बिटकॉईन 16,900 डॉलर्सवर ट्रेड करत होती, गेल्या 24 तासात त्यात 0.2 टक्क्यांनी वाढ झाली होती. तर दुपारच्या सत्रात बिटकॉईन 17,000 डॉलर्सवर पोहोचली होती. CoinGeckoच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत BONK टोकनची किंमत 36 टक्क्यांनी घसरली.
Table of contents [Show]
क्रिप्टोकरन्सीच्या आजच्या किमती
बिटकॉईन (Bitcoin)
क्रिप्टोमधल्या या महत्त्वाच्या नाण्याची किंमत 7 जानेवारीला सकाळी 10 वाजता 16,938.25 युएस डॉलर एवढी होती. मागील 24 तासात या नाण्याच्या किमतीत 0.50 टक्के वाढ झाली. भारतीय क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज प्लॅटफॉर्म वझीरएक्सनुसार (WazirX) शनिवारी (दि.7 जानेवारी) बिटकॉईनचा दर 13.95 लाख एवढा आहे.
इथरियम (Ethereum)
इथरियम नाण्याच्या किमतीत मागील 24 तासांमध्ये 0.91 टक्क्यांनी वाढली आहे. याची शनिवारी सकाळी 10 वाजता 1,264 युएस डॉलर एवढी किंमत होती. वझीरएक्सनुसार (WazirX) आज या कॉईनचा भारतीय दर 1.04 लाख एवढा आहे.
डॉजकॉईन (Dogecoin)
या कॉईनची किंमत 0.0723 युएस डॉलरवर सकाळी 10 वाजता ट्रेड करत होती. या कॉईनचा दर मागील 24 तासात 1.56 टक्क्यांनी वाढला आहे. वझीरएक्सनुसार (WazirX) डॉजकॉईनची किंमत 5.95 रुपये आहे.
लाईटकॉईन (Litecoin)
मागील 24 तासामध्ये लाईटकॉईनच्या किमतीत 2.06 टक्क्यांनी वाढ झाली. तर या नाण्याची किंमत 75.87 युएस डॉलर होती. भारतीय मूल्यानुसार याची किंमत 6,250 रुपये आहे.
सोलाना (Solana)
सोलानाच्या किमतीत गेल्या 24 तासात 0.52 टक्क्यांची वाढ झाली. याची किंमत 13.26 युएस डॉलर एवढी आहे. तर याची भारतीय रुपयात याचे मूल्य 1,093.19 रुपये आहे.