Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Travelling with Family: मल्टी-मेंबर ट्रॅव्हल इन्शुरन्सबद्दल जाणून घ्या संपूर्ण माहिती!

Travelling with Family

Travel Insurance : तुमचा प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि तुमच्या कुटुंबाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असते; तेव्हा प्रवासी विमा (Travel Insurance) विकत घेतलाच पाहिजे. कौटुंबिक प्रवासी विमा तुमच्या कुटुंबाची काळजी घेण्यास उपयोगी पडू शकतो.

  1. कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या भयाण परिस्थितीनंतर अनेकांच्या सहली, परदेश दौरे, ट्रिप रद्द करण्यात आल्या होत्या. पण आता परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर अनेकांनी आपल्या रखडलेल्या ट्रिप्स पुन्हा अॅक्टिव्ह करण्यास सुरूवात केली. परिणामी एअरलाईन्स आणि हॉटेल्सची मागणी वाढू लागली आहे. त्याचबरोबर आता प्रवासी स्वत:ची जोखीम लक्षात घेऊन स्वत:चा आणि आपल्या कुटुंबाचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी प्रवासी विमा (Travel Insurance) खरेदी करत आहेत.

प्रवासी विमा घेताना प्रत्येक प्रवासाचे, सहलीचे स्वरूप आणि त्याचा आवाका वेगवेगळा असल्याने प्रवासी विमा सुद्धा वेगवेगळा प्रकारचा असू शकतो. तुम्ही वैयक्तिक किंवा ग्रुपने सहलीसाठी जाताना पर्सनल इन्शुरन्स घेऊ शकता. म्हणजे तसे इन्शुरन्स कंपन्यांकडे पर्याय उपलब्ध असतात. पण जे संपूर्ण कुटुंबासोबत प्रवास करत आहेत; त्यांच्यासाठी मल्टी-मेंबर ट्रॅव्हल इन्शुरन्स स्कीमस सुद्धा उपलब्ध आहेत.

मल्टी-मेंबर ट्रॅव्हल इन्शुरन्स म्हणजे काय? What is Multi-Member Travel Insurance?

मल्टी-मेंबर ट्रॅव्हल इन्शुरन्स (Multi-Member Travel Insurance) हा कौटुंबिक प्रवासी विमा (Family Travel Insurance) म्हणून ही ओळखला जातो. हा असा इन्शुरन्स आहे; जो परदेशात आणि देशातही प्रवास करताना सूंपूर्ण कुटुंबातील व्यक्तींना संरक्षण पुरवतो. कुटुंबातील लहान मुले किंवा वयोवृद्धांना संरक्षित करण्यासाठी अशा प्रकारची पॉलिसी फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे प्रवास करताना विशेषत: लांब पल्ल्याचा कुटुंबासह प्रवास करताना ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅन खरेदी करणं फायद्याचे ठरू शकते. कारण कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी वैयक्तिक इन्शुरन्स खरेदी करण्यापेक्षा मल्टी-मेंबर ट्रॅव्हल इन्शुरन्स खरेदी केल्यास तो तुलनेने स्वस्तात मिळू शकतो.

मल्टी-मेंबर ट्रॅव्हल इन्शुरन्सचे फायदे! Benefits of Multi-Member Travel Insurance! 

मेडिकल इमर्जन्सी कव्हर (Cover Against Medical Emergencies)

प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारची मेडिकल इमर्जन्सी आल्यास ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसीद्वारे ही जोखीम कव्हर होते. यामध्ये कुटुंबतील कोणत्याही सदस्याला कोणत्याही प्रकारच्या आजारासाठी किंवा अपघातासाठी संरक्षित करते. बरेच ट्रॅव्हल इन्शुरन्स स्कीम्स या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यापासून 30 ते 60 दिवसांपर्यंत कव्हर करतात. तसेच एखाद्यावेळी इमर्जन्सी म्हणून रूग्णाला उपचारांसाठी इतर ठिकाणी नेण्यासाठी अम्ब्युलन्सचा खर्च देखील यात समाविष्ट असतो. 

ट्रिप डिले झाली, रद्द झाल्यावरही कव्हर मिळतो (Cover Against Trip Delay and Cancellation)

कुटुंबासोबत एखादी पिकनिक किंवा प्रवास करत असताना अनेक गोष्टी पुढे-मागे होण्याची शक्यता असते. काही वेळेस मेडिकल इमर्जन्सीमुळे संपूर्ण ट्रिपसुद्धा रद्द करावी लागते किंवा तिचा कालावधी कमी करावा लागतो. तसेच विमानाटे टेक ऑफ होण्यासाठी उशीर होत असेल तर आपल्याला ऐनवेळी राहण्याची सोय करावी लागते. अशाप्रकारच्या घटनांमुळे अचानकपणे होणारा खर्च Family Travel Insurance Policy द्वारे संरक्षित केला जातो.

सामानाच्या नुकसानीविरोधात कव्हर (Cover Against Loss of Luggage)

एखाद्याच्या सामानाचे नुकसान झाले किंवा ते प्रवासादरम्यान चोरीला गेल्यास त्याचा आर्थिक भुर्दंड फॅमिली ट्रॅव्हल इन्शुरन्समधून संरक्षित करता येतो. ट्रॅव्हल इन्शुरन्स कंपन्या अशा खर्चाची भरपाई एकरकमी रक्कम देऊन करतात. तसेच एअरपोर्टवर किंवा प्रवासादरम्यान प्रवाशांचे सामान पोहचण्यास उशीर झाला असेल, तर त्याविरोधातही कव्हर मागता येतो. तसेच प्रवाशाचे सामान त्याला मिळेपर्यंत त्याला आवश्यक असलेल्या वस्तु विकत घेण्यासाठी लागणारी खर्चाची भरपाई सुद्धा यामधून करता येते. परदेशात असताना कुटुंबातील एकाही सदस्याचा पासपोर्ट हरवल्यास संपूर्ण कुटुंबाची ट्रिप धोक्यात येऊ शकते. अशावेळी कौटुंबिक प्रवासी इन्शुरन्स पॉलिसीद्वारे तुम्ही पासपोर्टची डुप्लिकेट कॉपी विनाखर्च मिळवू शकता.

सिंगल आणि मल्टी-ट्रिप इन्शुरन्सची निवड (Single and Multi-Trip Insurance)

वैयक्तिक ट्रॅव्हल इन्शुरन्स स्कीमप्रमाणेच बऱ्याच इन्शुरन्स कंपन्या मल्टी-ट्रिप किंवा सिंगल ट्रिप फॅमिली ट्रॅव्हल इन्शुरन्सचा पर्याय देतात. जी कुटुंबे वर्षातून किमान 3-4 वेळा प्रवास करत असतील त्यांना प्रत्येकवेळी ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्याची गरज नाही. ते एकदाच मल्टी-ट्रिप इन्शुरन्स विकत घेऊ शकतात. ज्याचा उपयोग त्यांना प्रत्येक प्रवासादरम्यान होऊ शकतो.

ट्रॅव्हल इन्शुरन्स हा प्रवासादरम्यान खूपच फायदेशीर आहे. पण अनेक देशांमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवासी विमा (Travel Insurance) हा अनिवार्य सुद्धा आहे. त्यामुळे एखाद्या अनोळखी ठिकाणी मदतीची गरज भासू शकते किंवा आपल्या कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी Travel Insurance फायद्याचा ठरू शकतो.