Goa Tour : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कुठे फिरायला जायचं? हा विचार आपण करीत असतो. मग छान समूद्र, क्रूज, रात्री न्याहाळता येणारं निसर्गाचं सौंदर्य, बीच, पब, सीफूड अशी कुठली जागा तुम्हाला निवडायची असेल, तर मग तुम्ही गोव्याला जायचा विचार करु शकता. तुम्ही अगदी तुमच्या कमी बजेट मध्ये देखील नाइटलाइफ, वॉटर स्पोर्ट्स,सीफूड आणि पबची मज्जा लूटू शकता. आज आम्ही तुम्हाला गोव्याला फूल टू धम्माल कुठे करता येईल, आणि तेही कमी बजेट मध्ये कसे करता येईल? अशी काही ठिकाणं सुचविणार आहोत.
Table of contents [Show]
कलिंगुट बीच
कलिंगुट बीच हा बागा बीचला लागून आहे. येथे वॉटर स्पोर्ट्स, मार्केट, रेस्टॉरंट सर्व एकाच ठिकाणी मिळेल, त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टींसाठी इतरत्र जायचा तुमचा खर्च वाचेल. तसेच, हे बीच नाइटलाइफ आणि पबसाठी प्रसिध्द आहे.
अंजूना बीच
अंजूना बीच हे विदेशी पर्यटक, बॉलिवूडच्या चित्रपटांचे चित्रीकरण यासाठी प्रसिध्द आहे. तसेच, जर तुम्हाला बीच,सीफूड, बिअर आणि चांगल्या संगीताची आवड असेल, तर हे बीच तुमच्या साठी अत्यंत उपयोगी आहे. तुम्हाला आवडत असलेल्या अनेक गोष्टी एकाच बीच वर मिळेल. या बीचवर एक फ्ली मार्केट देखील आहे. तेथे तुम्हाला अतिशय कमी किमतीमध्ये कपडे, सँडल, आणि इतर वस्तू मिळतात.
बागा बीच
बागा बीच हे भारतीय पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. हे बीच पार्टी, संगीत, खाद्यपद्रार्थ, जलक्रीडा यासाठी प्रसिध्द आहे. गोव्यातील प्रसिध्द बीचमध्ये याचा समावेश आहे. बागा बीच पणजीच्या उत्तरेस 19 किमी अंतरावर आहे.
छपरा बीच
तु्म्ही जर फूड प्रेमी आणि वॉटर स्पोर्ट्सची आवड असणारे असाल, तर तुम्ही छपरा बीचवर नक्की जा. येथे तुम्हाला बजेट मध्ये अनेक खाद्य पदार्थांचा आनंद घेता येईल. पणजी पासून छपरा बीच 24 किलोमीटर अंतरावर आहे. येथील छपरा किल्ला देखील बघण्यासारखा आहे.
कसा प्रवास कराल?
तुम्हाला जर का, बजेटमध्ये गोव्याला भेट द्यायची असेल, तर तिथे जाण्यास उन्हाळा हा सगळ्यात बेस्ट ऋतु आहे. तुम्ही जर आधीच व्यवस्थित प्लॅन केला तर, तुम्ही फ्लाइट बुकिंग मध्ये देखील जास्त प्रमाणात डिस्काउंट मिळवू शकता. रेल्वेचे स्लीपर कोचचे तिकिट पाचशे रुपयांपासून सुरु होते. खासगी ट्रॅव्हल्सचे भाडे 1000 रुपयांपासून असून फ्लाईट्सचा दर 2500 ते 6000 रुपयांच्या दरम्यान आहे. देशभरातील प्रमुख शहरे रेल्वेने गोव्याशी जोडलेली आहेत. मुंबई-पुणे या ठिकाणांहूनही ट्रॅव्हल्सने गोवा गाठता येते. जर तुम्ही मित्र-मंडळी सोबत गेलात तर मग प्रवासाचा खर्च आणि इतरही खर्च बराच कमी होतो.
ऑफ सिझन मध्ये जाण्याचा फायदा
गोव्यात ऑक्टोबर ते मार्च हे महिने पर्यटनाचे असतात. त्यामुळे त्या काळात तेथे सगळ्याच गोष्टी आणि खाद्यपदार्थ प्रचंड महाग असतात. परंतु, एप्रिल ते सप्टेंबर या ऑफ सिझन मध्ये पर्यटकांचा ओघ कमी असल्याने फ्लाइट, हॉटेल्स, भाड्याने दिल्या जाणाऱ्या बाइक्स आणि कार सर्व इतर दिवसांपेक्षा कमी किमतीत असतात.