Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Transvoy Logistics IPO: ट्रान्सवॉय लॉजिस्टीकचा आयपीओ लवकरच बाजारात येणार!

Transvoy Logistics IPO

Transvoy Logistics IPO: येत्या शुक्रवारी, 20 जानेवारी रोजी ट्रान्सवॉय लॉजिस्टीक कंपनीचा आयपीओ बाजारात लाँच होणार आहे. शेअरची फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे, मात्र त्यांची मार्केट व्हॅल्यू किती आहे? लॉट साईज किती आहे? आयपीओचे संपूर्ण वेळापत्रक काय आहे? कंपनीची नेटवर्थ किती आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे या बातमीतून जाणून घेता येतील.

Transvoy Logistics India Limited SME IPO will open soon: सामानाचा पुरवठा किंवा ने-आण करणे अर्थात लॉजिस्टीक (Logistic) होय. गुजरातमधील ट्रान्सवॉय लॉजिस्टीक्स इंडिया लिमिटेड (Transvoy Logistics India Limited) कंपनीचा आयपीओ (IPO: Initial Public Offer) येत्या 20 जानेवारी रोजी बाजारात दाखल होणार आहे. या आयपीओचे सदस्यत्व (Subscription) घेण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी असणार आहे. या कंपनीचा स्टॉक बीएसई एलएमईवर (Bombay Stock Exchange, small and medium sized companies) निर्देशांकावर सूचीबद्ध (Listed on Index) केला जाणार आहे.

ट्रान्सवॉय लॉजिस्टीक्स इंडिया कंपनीच्या शेअरचे दर्शनी मूल्य (Face Value) 10 रुपये आहे, मात्र बाजार भाव 71 रुपये आहे. कंपनीने 1 हजार 600 शेअर्स ही लॉट साईज ठरवली आहे. रिटेल किंवा वैयक्तिक गुंतवणुकदार एका लॉटपर्यंत सबस्क्राईब करू शकतो, म्हणजे 1 लाख 13 हजार 600 रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतो. एकूण इशू साईज 7 लाख 20 हजार शेअरची आहे. ज्याची एकत्रित किंमती 5.11 कोटी आहे.

शेअर्सची वाटणी 30 जानेवारी रोजी होईल, तर ज्यांना शेअर मिळणार नाहीत अशांची रक्कम लगेचच 31 जानेवारी रोजी परत केली जाणार आहे. शेअर्स डिमॅट खात्यात 1 फेब्रुवारीला क्रेडीट होतील, तर लिस्टींग 2 फेब्रुवारीला होणार आहे. या इशूद्वारे कंपनीला मिळणारी रक्कम, सध्या सुरू असलेल्या कामांमध्ये लागणारी भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी, कंटेनर खरेदीसाठी, कंपनीच्या इतर कार्यांसाठी तसेच वाहतुक अडचणी सोडवण्याचा खर्च पूर्ण करण्यासाठी वापरली जाणार आहे.

ट्रान्सवॉय लॉजिस्टीक्स इंडिया कंपनीविषयी (About Transvoy Logistics India)

ट्रान्सवॉय लॉजिस्टीक्स इंडिया ही कंपनी 2015 साली नोंदणीकृत केली गेली. कंपनी रस्ते, जलमार्ग आणि वायुमार्गाद्वारे सामानाची ने - आण करते. भारतातील सर्व भागांमध्ये लॉजिस्टीक सुविधा पुरवते, याखेरीज श्रीलंका, चीन, मलेशिया, मध्य पूर्वेकडील देश आणि सिंगापूर या प्रदेशांमध्येही लॉजिस्टींक सुविधा पुरवते. कंपनीचे मुख्य कार्यालय अहमदाबाद येथे आहे तर दुसरे मुख्य कार्यालय सिंगापूर येथे आहे.

रविंद्रकुमार जोशी हे कंपनीचे अध्यक्ष आहेत. कंपनीचा 2022 वर्षातला एकूण महसूल 1 हजार 83.07 लाख होता. तर, नेटवर्थ 230.69 लाख आहे. सध्या कंपनीकडे 826.06 लाखांचे अॅसेट्स आहेत.