Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

OYO IPO: ओयो सेबीकडे आयपीओ अर्ज सादर करण्यासाठी सज्ज, कधी दाखल करणार अर्ज?

OYO to refile updated draft IPO papers to sebi

Image Source : www.businesstoday.in

OYO IPO: सप्टेंबर 2021 मध्ये ओयोने सेबीकडे आयपीओसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यावेळी अनेक त्रुटी असल्यामुळे अर्ज फेटाळण्यात आला होता. तर आता पूर्ण तयारीनिशी पुन्हा एकदा ओयो सेबीकडे अर्ज देण्यासाठी सज्ज आहे. येत्या फेब्रुवारीत अर्ज दाखल केला जाईल, ओयोला चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत किती फायदा झाला ते पुढे वाचा.

OYO to refile updated draft IPO papers to sebi: हॉटेल व्यवसाय स्टार्टअप ओयो (OYO: On Your Own) पुढील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत सेबीकडे (SEBI: Securities and Exchange Board of India) आयपीओसाठी (IPO: Initial Public Offer) पुन्हा अर्ज करणार आहे. ओय़ो ऑपरेट करणारी कंपनी ओरेव्हल स्टेज लिमिटेडने (Oravel Stage Limited) ही माहिती दिली आहे. काही काळापूर्वी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) ट्रॅव्हल-टेक फर्म ओयोचा रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसचा मसुदा (DRHP: Draft Red Herring Prospectus) परत पाठवला होता आणि त्यांना काही अपडेट करून पुन्हा अर्ज करण्यास सांगितले होते.

ओरेव्हल स्टेज लिमिटेडने नुकतेच  सांगितले की ते पुढील महिन्याच्या मध्यापर्यंत आपला आयपीओ अर्ज पुन्हा दाखल करणार आहेत. फेब्रुवारी 2023 च्या मध्यापर्यंत रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसचा मसुदा रिफायल करण्याचा कंपनीचा मानस आहे. कंपनीने सांगितले की, 'आम्ही एकाच वेळी सर्व प्रमुख विभागांना अपडेट करण्यावर काम करत आहोत. हे काम वेगवेगळ्या पक्षांमध्ये विभागलेले आहे. कंपनीचे वरिष्ठ अधिकारी बुक रनिंग लीड मॅनेजर्स, आयपीओ बँकर्स, वकील आणि ऑडिटर यांच्याशी जवळून काम करत आहेत.

सप्टेंबर 2021 मध्ये, ओयोने सेबीकडे 8 हजार 430 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी कागदपत्रे दाखल केली होती. ज्यामध्ये 7 हजार कोटी रुपयांपर्यंतचे ताजे शेअर्स आणि 1 हजार 430 कोटी रुपयांपर्यंतच्या विक्रीची ऑफर देण्यात आली होती. सेबीने आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या सहामाहीतील अद्ययावत आर्थिक निकाल सेबीला सादर केला होता. सेबीने नंतर कंपनीला डीआरएचपी पुन्हा फाइल करण्यास सांगितले. यामध्ये, जोखीम घटक, केपीआय (key performance indicator), थकबाकीदार खटले आणि ऑफरचा आधार इत्यादी सर्व संबंधित विभाग अपडेट करण्यास सांगितले होते.

या वर्षाच्या सहामाहीत 63 कोटी नफा (63 crore profit in Fy23)

ओयो ही नफा कमावणारी कंपनी आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांत कंपनीने 63 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. वर्षभरापूर्वी याच कालावधीत कंपनीला 280 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. या काळात कंपनीने 2 हजार 905 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीपेक्षा हे प्रमाण 24 टक्के अधिक आहे. कंपनीने मासिक बुकिंग मूल्यात प्रति महिने 69 टक्के वाढ नोंदवली आहे.