Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

NPCI च्या रडारवर क्रिप्टोकरन्सी, भारतातील क्रिप्टो खरेदीचे व्यवहार ठप्प - Crypto Exchanges In India

NPCI च्या रडारवर क्रिप्टोकरन्सी, भारतातील क्रिप्टो खरेदीचे व्यवहार ठप्प - Crypto Exchanges In India

Image Source : www.linkedin.com

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (NPCI) निशाण्यावर क्रिप्टोकरन्सी आल्यामुळे क्रिप्टोकरन्सीच्या खरेदीसाठी वापरल्या जाणाऱ्या युपीआय पेमेंटवर (UPI Payments) अमेरिकेतल्या क्रिप्टो एक्सचेंज कॉईनबेसने (Crypto Exchange Coin base) बंदी घातली आहे.

सध्या भारतातच नव्हेत संपूर्ण जगभरात बिटकॉइन (Bitcoin), इथर (Ether) आणि मॅटिक (Matic) सारख्या क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrencies) देशात चर्चेचा विषय बनल्या आहेत; अलीकडच्या काळात या क्रिप्टोकरन्सींनी मोठ्या प्रमाणात नफा कमावला आहे. तरीही, त्याच्याबद्दलची बाजारातील अस्थिरता आणि चढ-उताराच्या गुणधर्मामुळे (Volatile nature) गुंतवणूक नेहमीच चिंतेत असतात. त्यात आता, पुरवठादार आणि देवाणघेवाण करणाऱ्यांना निधीच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ज्याचा क्रिप्टोकरन्सीच्या व्यापारावर विपरित परिणाम होत आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी 2022-23 च्या अर्थसंकल्पात डिजिटल उत्पन्नावर कर लावण्याच्या निर्णयाचा परिणाम भारतातील क्रिप्टोकरन्सीच्या व्यवसायावर स्पष्टपणे दिसायला लागला आहे. सरकारने क्रिप्टोकरन्सीसह डिजिटल मालमत्तेतून मिळणाऱ्या नफ्यावर 30 टक्के कर आणि क्रिप्टोकरन्सी व्यवहारांवर एक टक्का टीडीएस लावण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर भारतात रुपयाच्या तुलनेत क्रिप्टोकरन्सी खरेदी करणे सोपे राहिलेले नाही. परिणामी भारतात क्रिप्टोकरन्सी व्यवहारांसाठी वापरले जाणारे मोबाईल अॅप कॉईनबेस (Coinbase) आणि कॉईनस्वीच कुबेर (Coinswitch Kuber) वरील क्रिप्टोकरन्सीच्या खरेदीचे व्यवहार थांबवले आहेत. या दोन्ही मोबाईल अॅप्सवर, युपीआय (UPI) आणि बँकेद्वारे क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्याचे पर्याय बंद करण्यात आले आहेत.

upi-mahanaeja-kaya-1.jpg

एनपीसीआयच्या (NPCI) रडावरवर क्रिप्टोकरन्सी 

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेनश ऑफ इंडिया (NPCI) ही संस्था देशातील युपीआय पेमेंट्सवर देखरेख ठेवणारी संस्था आहे. एनपीसीआयच्या रडावर क्रिप्टोकरन्सी आल्याने अमेरिकेतील क्रिप्टो एक्सचेंज कॉईनबेसचे (Crypto Exchange Coinbase) भारतात लॉन्चिंग होऊन 3 महिनेच झालेले असताना कॉईनबेसने क्रिप्टोकरन्सी खरेदीसाठी UPI पेमेंटवर बंदी घातली. कॉईनबेसनंतर, कॉईनस्वीच कुबेरने (Coinswitch Kuber) देखील मोठे पाऊल उचलले आहे. कॉईनस्वीच कुबेर अॅपवरून रूपयाद्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारांची सेवा तात्पुरत्या बंद केल्या आहेत. याशिवाय, कंपनीच्या मोबाईल अॅपवर NEFT आणि RTGS सारख्या UPI द्वारे बँक ट्रान्सफरवर बंदी घातली आहे.

देशातील बँका सतर्क

एनपीसीआयने क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारासाठी युपीआयच्या (UPI) वापराबाबत प्रसिद्ध केलेल्या निवेदनानंतर देशातील बँकाही सावध झाल्या आहेत. त्यांनीही याबाबत सावधगिरी बाळगण्यास सुरुवात केली आहे. भारतातील खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ही युपीआयद्वारे कॉईनबेसवर पैसे ट्रान्सफर करणाऱ्या सर्व व्यवहारांवर बंदी घातली आहे.

भारतात क्रिप्टो ट्रेडिंगला परवानगी नाही

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने अलीकडेच म्हटले होते की, युपीआयद्वारे होत असलेल्या भारतातील कोणत्याही क्रिप्टो एक्सचेंजची माहिती आम्हाला नाही. यानंतर भारतातील बँकांनी सर्वप्रथम कॉईनबेसवरील युपीआय व्यवहार बंद केले. दरम्यान, सरकारने क्रिप्टोकरन्सीचा व्यवहार भारतात कायदेशीर नसल्याचा इशारा दिला. क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणुकीची जोखीम ही गुंतवणूकदाराचीच असेल. तसेच क्रिप्टोला देशात कायदेशीर मान्यता मिळेपर्यंत एनपीसीआय क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारासाठी युपीआय पेमेंटला मान्यता देऊ शकत नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.