Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

After Hour Trading : शेअर मार्केट बंद झाल्यावरही सुरू असते ट्रेडिंग? जाणून घ्या काय असते After Hour ट्रेडिंग!

After Hour Trading

After Hour Trading : After Hour ट्रेडिंग म्हणजे मार्केट सुरु होण्याआधी आणि बंद झाल्यावर केली जाणारी ट्रेडिंग होय. मार्केट बंद झाल्यावर म्हणजेच दुपारी 3.30 पासून ते सकाळी मार्केट सुरु होईपर्यंत म्हणजेच सकाळी 9.15 पर्यंत जी ट्रेडिंग होते; त्याला After Hour ट्रेडिंग असे म्हटले जाते.

इंडियन शेअर मार्केट (Share Market) सकाळी 9.15 ते दुपारी 3.30 पर्यंत चालू असते. पण मार्केट सुरु होण्याआधी म्हणजेच सकाळी 9.00 ते 9.15 हा कालावधी प्री-ओपन मार्केटचा (Pre Open Market) असतो. त्यानंतर प्रत्यक्षात मार्केट सुरु होते आणि दुपारी 3.30 वाजता बंद होते. पण खरेच मार्केट 9.15 ते दुपारी 3.30 पर्यंतच चालू असते का? 3.30 वाजता मार्केट बंद होते; पण ट्रेडिंग बंद होत नाही. मार्केट सुरु होण्याआधी आणि बंद झाल्यावर सुद्धा ट्रेडिंग सुरू असते, त्याला After Hour ट्रेडिंग असे म्हणतात. हीच After Hour ट्रेडिंग गॅप अप ओपनिंग किंवा गॅप डाऊन ओपनिंगला (Gap Up Opening Or Gap Down Opening) कारणीभूत असते. चला तर मग समजून घेऊयात काय आहे After Hour ट्रेडिंग आणि After Hour चा फायदा कसा घेता येऊ शकतो.

After Hour ट्रेडिंग म्हणजे काय? What is After Hour Trading?

After Hour ट्रेडिंग म्हणजे मार्केट सुरु होण्याआधी आणि बंद झाल्यावर केली जाणारी ट्रेडिंग होय. मार्केट बंद झाल्यावर म्हणजेच दुपारी 3.30 पासून ते सकाळी मार्केट सुरु होईपर्यंत म्हणजेच सकाळी 9.15 पर्यंत जी ट्रेडिंग होते; त्याला After Hour ट्रेडिंग असे म्हटले जाते. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (Bombay Stock Exchange-BSE) मध्ये After Hour ट्रेडिंगची वेळ दुपारी 4.00 ते सकाळी 8.55 पर्यंत आहे. तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज (National Stock Exchange-NSE) मध्ये देखील After Hour ट्रेडिंगची वेळ दुपारी 4.00 ते सकाळी 8.55 पर्यंत आहे. After Hour ट्रेडिंगमध्ये काही नियम आहेत; जे मार्केटच्या परिस्थितीनुसार, मार्केटनुसार व ऑर्डरच्या प्रकारानुसार बदलत असतात. After Hour ट्रेडिंग करण्यासाठी तुम्ही वापरत असलेल्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवरून तुम्ही आफ्टर मार्केट ऑर्डर (After Market Order-AMO) देऊ शकता. मार्केट बंद झाल्यानंतरही तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता. 

After Hour ट्रेडिंग करण्याचे फायदे | Benefits of After Hour Trading

इंडियन शेअर मार्केट 9.15 ते 3.30 पर्यंत सुरू असते. या साडेसहा तासात पुरेशा प्रमाणात ट्रेडिंग करता येते. मग तरीही मार्केट बंद झाल्यावर ट्रेडिंग करायची गरज काय? असे तुम्हाला वाटत असेल तर मग तुम्हाला After Hour ट्रेडिंगचे फायदे जाणून घेणे गरजेचे आहे.

सोयीस्कर (Convenient)

After Hour ट्रेडिंग हे बऱ्याच गुंतवणूकदारांसाठी एक सोयीस्कर फिचर आहे. अनेक गुंतवणूकदारांना मार्केट प्रत्यक्ष सुरू असते तेव्हा ट्रेडिंग करणे जमत नाही. अशावेळी वेळेचे बंधन असलेल्या गुंतवणूकदारांसाठी आणि ट्रेडर्ससाठी After Hour ट्रेडिंग चांगला पर्याय आहे.

बातम्यांचा फायदा घेणे शक्य (Can take Advantage of the News)

शेअर मार्केटमध्ये गोंधळ निर्माण करण्यात सर्वात पुढे असतात; त्या म्हणजे बातम्या. प्रत्येक बातमीला मार्केट काही ना काही प्रतिसाद देत असतो आणि त्यानुसार गुंतवणूकदार आपली पोझिशन ठरवत असतात. पण मार्केट बंद झाल्यावर जेव्हा बातमी येते. तेव्हा देखील योग्य निर्णय घेऊन गुंतवणूकदाराला आपली पोझिशन ठरवणे गरजेचे असते. त्याकरता मार्केट सुरु होण्याची वाट जर आपण पाहत बसलो तर मग आपल्या पोझिशनचे कल्याण झालेच समजा. अशावेळी After Hour ट्रेडिंगची मदत होते. यामुळे गुंतवणूकादार आपल्या अगोदरचा निर्णय बदलू शकतो किंवा नवीन पोझिशन घेऊ शकतो. After Hour ट्रेडिंगमुळे आलेल्या बातम्यांचा त्याचवेळी फायदा उचलणे शक्य होते.

टेकनिकल अॅनालिसिस (Technical Analysis)

‘शेअर मार्केट पैसे गुंतवा आणि फायदा मिळावा’, या वाक्याऐवढे शेअर मार्केटमधून पैसे मिळवणे सोपे नाही. शेअर्स किंवा एखादी पोझिशन घेण्याआधी त्याचा अभ्यास करणे गरजेचे असते. कारण त्यानुसार किती व कोणते स्टॉक घ्यायचे व त्यातून कधी बाहेर पडायचे, असे महत्त्वाचे निर्णय घेणे शक्य होते. After Hour ट्रेडिंगमुळे हा अभ्यास पूर्ण करून लगेच त्यानुसार अॅक्शन घेणे शक्य होते. मार्केट सुरु होण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा लगेच पोझिशन घेणे After Hour ट्रेडिंगमुळे शक्य होते.


After Hour ट्रेडिंगमधील रिस्क | Risk in After Hour Trading

After Hour ट्रेडिंगचे जसे फायदे आहेत; त्याचप्रमाणे त्यात रिस्क देखील आहे. 

किमतीमधील रिस्क (Risk in Pricing)

अनेक वेळा तुम्ही जेव्हा After Market ऑर्डर तुमच्या ब्रोकरला देता. तेव्हा ती मार्केट ऑर्डर मार्केट सुरु झाल्यानंतर जी किंमत असते; त्या किमतीवर एक्झीक्यूट होते. त्यामुळे ट्रेडिंग सुरु करण्याआधी तुमच्या ब्रोकरद्वारे ट्रेडिंगचे कोणते फीचर्स दिले जातात व त्यावर कोणत्या अटी लागू आहेत. याची माहिती घेणे गरजेचे आहे.

बातम्यांमुळे होणारे नुकसान (Loss due to News)

जसे बातम्यांमुळे After Hour ट्रेडिंगमध्ये फायदा होऊ शकतो; तसेच बातम्यांमुळे After Hour ट्रेडिंगमध्ये तोटादेखील होऊ शकतो. जेव्हा बातमी प्रसिद्ध होते. त्यानंतर सर्वच जण त्यावर आधारित पोझिशन्स घेत असतात. त्यामुळे सकाळी गॅप अप ओपनिंग आणि गॅप डाऊन ओपनिंगच्या किमतींमध्ये बदल होताना दिसू शकतात. त्यामुळे बातम्यांच्या दबावानुसार निर्णय घेतला जाऊ शकतो.

शेअर मार्केटमध्ये तशीही भरपूर रिस्क आहे. 9.15 ते 3.30 या दरम्यानच ट्रेडर्स ट्रेडिंग करून थकतात. त्यामुळे पुन्हा After Hour ट्रेडिंग करण्यासाठी रिस्क उचलण्याची क्षमता, अनुभव आणि अभ्यास या गोष्टी गरजेच्या आहेत. जर तुम्हाला After Hour ट्रेडिंग सोयीची वाटत असेल तर तुम्ही नक्की त्यामध्ये भाग घेतला पाहिजे. पण त्याबद्दल पुरेशी माहिती असणे गरजेचे आहे.