ऑनलाइनच्या (Online) या काळात ग्राहकांची गरज लक्षात घेता कंपनीनं ही सुविधा उपलब्ध करून दिलीय. या प्लॅटफॉर्ममुळे ग्राहकांना आपल्या घरातून टोयोटा वाहनांचं मॉडेल बुक करणं, खरेदी करणं आणि डिलिव्हरी करणं शक्य होणार आहे, असं टीकेएमनं (TKM) म्हटलंय. शिवाय, बुक केलेल्या टोयोटा उत्पादनाच्या स्थितीबद्दल, विश्वासार्हता आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी रिअल-टाइम माहितीदेखील आम्ही उपलब्ध करून देणार आहोत, असंही कंपनीनं पुढे म्हटलंय.
2021मध्ये लाँच केलं व्हर्च्युअल शोरूम
द व्हील्स ऑन वेब (The Wheels on Web) हे व्यवसाय ते ग्राहक (B2C) अशाप्रकारचं प्लॅटफॉर्म आहे. या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ग्राहकांना अधिक चांगला अनुभव देण्याचा, त्रास मुक्त उत्तम सेवा देण्यास कंपनी वचनबद्ध असेल, असंही कंपनीनं म्हटलंय. कंपनीनं 2021मध्ये आपलं व्हर्च्युअल शोरूम लाँच केलं होतं. ग्राहकांना त्यांच्या विविध मॉडेल्स आणि अॅक्सेसरीजमध्ये अॅक्सेस मिळावा आणि एक्सप्लोर करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावं, हा यामागचा उद्देश होता. यामुळे घरातूनच 360 डिग्री इमर्सिव्ह एक्सपिरिअन्स ग्राहकांना देण्याचं कंपनीचं काम सोपं झालंय.
डिजिटलमुळे व्यवसाय विस्तार अधिक
आता या नव्या सुविधेमुळे व्हर्च्युअल शोरूम प्लॅटफॉर्मशी आताची सुविधा उत्तमप्रकारे काम करतील, असं कंपनीनं आपल्या निवेदनात म्हटलंय. विक्रीतला डिजिटल माध्यमातला हिस्सा 5 पटीनं वाढले आहे आणि कंपनीच्या ई-बुकिंगमध्ये गेल्या वर्षांच्या तुलनेत 20 पटीनं वाढ झालीय, असा दावा कंपनीनं केलाय. व्हर्चुअल शोरूमच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे 1.3 दशलक्ष ग्राहकांची वाढ झाल्याचं कंपनीनं म्हटलंय.
कार खरेदीच्या अनुभवात होणार क्रांती
हायक्रॉस (गॅसोलीन), हिलक्स, लिजेंडर, कॅमरी, फॉर्च्युनर आणि इनोव्हा क्रिस्टा (GX) यासारखे विविध मॉडेल कंपनी सुरुवातीला ऑफर करते, असं कंपनीनं सांगितलं. टोयोटा किर्लोस्कर मोटरचे सेल्स आणि स्ट्रॅटेजिक मार्केटिंग विभागाचे उपाध्यक्ष अतुल सूद म्हणाले, की आमचा नुकताच लाँच झालेला व्हील्स ऑन वेब हा ऑनलाइन रिटेल प्लॅटफॉर्म देशातल्या कार खरेदीच्या अनुभवात क्रांती घडवून आणेल, असा आम्हाला विश्वास आहे. कार खरेदी करण्याची प्रक्रिया ही सोपी करण्यासाठी व्हॅल्यू अॅडेड सर्व्हिस देणं, एंड-टू-एंड ट्रान्झॅक्शन सोपे करणं, वन स्टॉप शॉप म्हणून सुरक्षित ऑनलाइन पेमेंट या काही गोष्टींना आम्ही प्राधान्य देत आहोत, असंही त्यांनी सांगितलं.