Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Savings Strategies: जास्तीत जास्त पैशांची बचत करण्यासाठी कोणती स्ट्रॅटेजी वापरायला हवी? वाचा

Savings Strategies

Image Source : https://www.freepik.com/

दरमहिन्याला मिळणाऱ्या उत्पन्नातील ठराविक हिस्सा हा गुंतवणुकीसाठी वापरल्यास भविष्यात खूप फायदा होऊ शकतो. योग्य आर्थिक नियोजनाच्या मदतीने तुम्ही जास्तीत जास्त बचत व आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करू शकता.

बचत हा प्रत्येकाच्या आर्थिक बजेटचा भाग असणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त पैशांच्या बचतीमुळे तुम्ही सुरक्षित भविष्य व आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने पाऊल टाकत असतात. दरमहिन्याला मिळणाऱ्या उत्पन्नातील ठराविक हिस्सा हा गुंतवणुकीसाठी वापरल्यास भविष्यात खूप फायदा होऊ शकतो. योग्य आर्थिक नियोजनाच्या मदतीने तुम्ही जास्तीत जास्त बचत व आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करू शकता.

या लेखातून किती बचत करायला हवी? वयानुसार गुंतवणुकीत कशाप्रकारे बदल करायला हवा? गुंतवणुकीसाठी नक्की कोणती स्ट्रॅटजी वापरायला हवी व बचत करताना नक्की कशाला प्राधान्य द्यायला हवे? अशा विविध प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात.

खर्च व बचतीचे नियोजन

जास्तीत जास्त पैशांची बचत करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे खर्चावर नियंत्रण. दरमहिन्याला येणारा पगार कोणत्या गोष्टींवर खर्च करायचा याचा प्राधान्यक्रम ठरवणे गरजेचे आहे. थोडक्यात, उत्पन्न व खर्चाची सांगड घालण्यासाठी बजेट तयार करायला हवे.

पैशांची बचत करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला मिळणारे उत्पन्न लक्षात घेणे गरजेचे आहे. तुमचे व कुटुंबातील सदस्यांचे मिळून दरमहिन्याला येणारे उत्पन्न किती आहे हे पाहा. त्यानंतर खर्चाची यादी करा. बजेटमुळे अनावश्यक खर्च टाळता येईल. अशाप्रकारे, उर्वरित रक्कम इतर ठिकाणी गुंतवता येईल. 

तुम्ही बचतीसाठी दीर्घकालीन, अल्पकालीन बचत, ऑटोमेटिक सेव्हिंग अशा विविध पद्धतींचा वापर करू शकता. विशेष म्हणजे चांगल्या लाइफस्टाइलच्या नादात कर्ज काढू नये. अन्यथा, उत्पन्नातील जास्त वाटा कर्जाचे हफ्ते भरण्यातच जातो व शिल्लक काहीही राहत नाही. त्यामुळे बचतीसाठी योग्य आर्थिक नियोजनाचा मार्ग वापरणे गरजेचे आहे.

किती बचत करावी? स्ट्रॅटजी काय असायला हवी?

वयानुसार ठरेल बचतीचा आकडापैशांची बचत किती करायला हवी, हे प्रत्येक व्यक्तीनुसार ठरत असते. याशिवाय, तुमचे उत्पन्न, खर्च व वय यावर देखील किती बचत करणे गरजेचे आहे हे ठरते. सर्वसाधारणपणे बचतीसाठी 50:30:20 असा फॉर्म्युला वापरतात. यानुसार, तुमच्या महिन्याच्या पगारातील 50 टक्के रक्कम दैनंदिन गरजा व घरखर्चासाठी वापरावी, 30 टक्के रक्कम जीवनशैली खर्चावर व 20 टक्के रक्कम बचत करावी. 
अल्पकालीन बचत बचतीच्या या स्ट्रॅटजीमध्ये तुम्ही अल्पकालीन उद्देशाने गुंतवणूक करू शकता. 2 ते 3 वर्षाच्या कालावधीत जास्तीत जास्त परतावा मिळविण्याच्या उद्देशाने या स्ट्रॅटजीचा वापर करू शकता. मात्र, अशा गुंतवणुकीत जोखीम देखील असते. तुम्ही मुदत ठेवी, बचत खाते, लाभांश देणारे स्टॉक्स अशात गुंतवणूक करू शकता.
दीर्घकालीन बचत 10 वर्षापुढील लक्ष्य निर्धारित करून गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही स्ट्रॅटजी नक्कीच वापरू शकता. या स्ट्रॅटजीमध्ये गुंतवणूकदार हे प्रामुख्याने स्टॉक्स, बाँड्स, म्युच्युअल फंड आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली जाते. टप्प्याटप्प्याने संपत्तीत वाढवणे, हा यामागचा हेतू असतो.
आपत्कालीन निधी  तुम्ही बचत अथवा गुंतवणुकीसाठी कोणतीही स्ट्रॅटजी वापरत असाल तर आपत्कालीन निधी त्याचा भाग असणे गरजेचे आहे. काहीजण त्वरित जास्तीत जास्त परतावा मिळविण्याच्या नादात संपूर्ण रक्कम एकाच ठिकाणी गुंतवणूक करण्याची जोखीम स्विकारतात. मात्र, यामुळे नुकसान होण्याचीही शक्यता असते. नुकसान झाल्यास आपत्कालीन निधी नसल्याने मोठी समस्या निर्माण होते. त्यामुळे आपत्कालीन निधी तुमच्या गुंतवणुकीचा भाग असणे गरजेचे आहे.
ऑटोमेटिक सेव्हिंगअनेकदा पगाराची संपूर्ण रक्कम दैनंदिन गरजा पूर्ण करण्यातच खर्च होते. अनेकजण पगार आल्यावर अनावश्यक गोष्टी खरेदी करतात व यामुळे पैसे बाजूला पडत नाही. अशावेळी ऑटोमेटिक सेव्हिंगचा मार्ग वापरू शकता. यामुळे दरमहिन्याला पगारातील काही रक्कम आपोआप बाजूला पडेल.

पैशांची बचत करताना या गोष्टी ठेवा लक्षात

खर्चावर लक्ष ठेवाजास्तीत जास्त पैशांची बचत करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अनावश्यक खर्च टाळणे. त्यामुळे तुमच्या खर्चावर लक्ष ठेवणे, त्याची नोंद करणे गरजेचे आहे. यामुळे तुम्ही अनावश्यक खर्च टाळून जास्त रक्कम गुंतवू शकता. 
बचतीला बनवा बजेटचा भाग सर्वसाधारणपणे बजेट तयार करताना उत्पन्न व खर्चाचा विचार करतो. आलेल्या पगारात कोणकोणते खर्च भागवायचे, याला प्राधान्य दिले जाते. परंतु, बचत हा देखील बजेटमधील एक पर्याय असणे गरजेचे आहे.
सातत्य गरजेचेतुमच्या बचतीमध्ये सातत्याने असणे गरजेचे आहे. समजा, दरमहिन्याला पगारातील 5 हजार रुपयांची बचत करत आहात. मात्र, 6 महिन्यानंतर अचानक बचत करणे थांबवल्यास त्याचा फायदा होणार नाही. त्यामुळे तुमच्या बचतीमध्ये सातत्याने असायला हवे.
उद्देशसमोर ठेऊन करा बचतउद्देशसमोर ठेऊन बचत केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो. समजा, तुम्हाला 5 वर्षांनी घर अथवा गाडी खरेदी करायची आहे. अथवा पुढील 10 वर्षात 30 लाख रुपयांची बचत व्हायला हवी, असे तुम्हाला वाटत असल्यास योग्य नियोजन करून हा उद्देश पूर्ण करू शकता. उद्देश समोर असल्यास बचतीमध्ये सातत्य पाहायला मिळते.

तरूणांसाठी बचत करण्याचा योग्य मार्ग (20 ते 30 वयोगट) 

कमी वयात करा सुरुवातआर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी ही वेळ सर्वोत्तम आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी लागल्यावर त्वरित गुंतवणुकीला सुरुवात करणे गरजेचे आहे. कमीत वयात बचत करण्यास सुरुवात केल्यावर भविष्यात त्याचा सर्वाधिक फायदा होऊ शकतो. याशिवाय, या कालावधीत जोखीम स्विकारायची क्षमताही अधिक असते.
बचत करण्याची पद्धत पगारातील ठराविक रक्कम दरमहिन्याला नियमितपणे गुंतवणे गरजेचे आहे. नियमितपणे बचतीची सवय लावणे आवश्यक आहे. तुम्ही पगारातील 1 हजार, 2 हजार रुपयांची दरमहिन्याला बचत करू शकता. हीच रक्कम पुढे मोठ्या रक्कमेत बदलेल. यासाठी ऑटोमेटिक सेव्हिंगचा मार्ग वापरू शकता.
उल्पकालीन उद्देश ठरवा  0-30 वर्षांचे असताना गुंतवणूक अथवा बचतीच्याबाबतीत थेट मोठी झेप घेण्याऐवजी उल्पकालीन उद्देश ठरवणे गरजेचे आहे. बचतीच्याबाबतीत टप्प्याटप्प्याने पुढे जायला हवे. तुम्ही उच्च शिक्षण, प्रवास, गाडी खरेदी करणे अशी उद्दिष्टे ठरवून बचत करू शकता.
आपत्कालीन निधीला द्या प्राधान्यकधी मोठे आर्थिक संकट येईल सांगता येत नाही. त्यामुळे सुरुवातीपासून आपत्कालीन निधीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. हॉस्पिटल खर्च, गाडी दुरुस्तीपासून ते घराच्या ईएमआयपर्यंत अशा गोष्टींसाठी आपत्कालीन निधी तयार असणे गरजेचे आहे. कमीत कमी 6 महिन्यांचा खर्च भागवता येईल, एवढी बचत असणे आवश्यक आहे.
कर्ज घेणे टाळाकमी वयात कर्ज काढण्याची सवय लावल्यास भविष्यात मोठ्या आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे कर्ज काढणे टाळून योग्य आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे. आर्थिक नियोजनामुळे खर्च कमी होऊन पैशांची बचत करण्यास मदत होईल.

प्रौढांसाठी बचत करण्याचा योग्य मार्ग (30 ते 55 वयोगट)

बचतीच्या रक्कमेत करा वाढकोणत्याही व्यक्तीसाठी वयाची 30 ते 55 वर्ष हा सर्वात महत्त्वाचा कालावधी असतो. या कालावधीत करिअरसोबतच कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतात. यासोबतच, अनेकांना स्वतःचे घर, गाडी देखील खरेदी करायचे असते. त्यामुळे या कालावधीत खर्चात वाढ होते. परंतु, असे असतानाही नियमित बचत करणे सुरू ठेवणे गरजेचे आहे. एवढेच नाही तर बचतीच्या रक्कमेतही वाढ करावी. बोनस अथवा इतर अतिरिक्त उत्पन्न खर्च न करू नये.
आर्थिक सल्लागाराची घ्या मदतअनेकजण करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात गुंतवणुकीला प्राधान्य देत नाही. मात्र, वाढत्या वयासोबतच गुंतवणुकीची जाणीव अनेकांना होते. त्यामुळे आर्थिक नियोजनाबाबत आर्थिक सल्लागाराची मदत घेतल्यास फायदा होतो. आर्थिक सल्लागाराच्या मदतीमुळे गुंतवणुकीत वाढ होण्यास मदत होऊ शकते.
गुंतवणुकीत हवी विविधता तुमच्या गुंतवणुकीमध्ये विविधता असणे गरजेचे आहे. बचत केलेली रक्कम एकाच ठिकाणी गुंतवल्यास नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्टॉक्स, रिअल इस्टेट, सोने, म्युच्युअल फंड अशा विविध गोष्टींमध्ये गुंतवणूक करावी.
आरोग्य विमा, पेन्शन योजनेला द्या प्राधान्यवयाची 30 वर्ष पूर्ण केल्यानंतर सर्वात प्रथम आरोग्य विमा, पेन्शन योजनांमध्ये गुंतवणुकीला प्राधान्य द्यायला हवे. करात सवलत मिळेल, अशा योजनांमध्ये गुंतवणू करावी. आरोग्य विमा काढल्याने वैद्यकीय खर्च वाचेल. विम्यामुळे अनपेक्षित परिस्थितीत तुमच्या कुटुंबाचे संरक्षणही होईल. राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS), कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये (EPF) गुंतवणूक करा.
निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी बचतया वयामध्ये खर्चासोबतच दीर्घकालीन उद्देश समोर ठेऊन बचत करणे देखील आयुष्य आहे. प्रामुख्याने सेवानिवृत्तीनंतर कोणत्याही आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागू नये यासाठी बचतीला प्राधान्य द्यावे. आर्थिक नियोजन करून बचतीचे वेगवेगळे पर्याय वापरावे.
कर्ज फेडण्याला द्या प्राधान्यया कालावधीमध्ये अनेकजण लग्नासाठी, घर-गाडी खरेदी करण्यासाठी कर्ज काढतात. मात्र, सेवानिवृत्तीनंतर कोणतीही समस्या निर्माण होऊ नये म्हणून आधीच या कर्जाची परतफेड करावी. नियमितपणे कर्जाची परतफेड केल्यास निवृत्तीनंतर कोणताही आर्थिक बोझ तुमच्यावर पडणार नाही.

निवृत्तीनंतरचा बचत करण्याचा योग्य मार्ग (55+ वयोगट) 

सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्यसेवानिवृत्तीनंतर जोखीम स्विकारण्याची क्षमता कमी झालेली असते. उत्पन्न बंद झालेले असल्याने नुकसान झाल्यास ते भरून काढणे शक्य होत नाही. त्यामुळे या कालावधीमध्ये सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य द्यायला हवे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या तुलनेत मुदत ठेव, सोने, रिअल इस्टेट अशा सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करावी.
बचतीचा करा योग्य वापरसेवानिवृत्तीनंतर उत्पन्नाचा मार्ग बंद होतो. त्यामुळे नोकरी करताना आतापर्यंत केले बचतीचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. पीएफ, ग्रॅच्युएटी रक्कमेचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. एकरकमी स्वरुपात मिळालेली ही रक्कम खर्च न करता, सुरक्षित गुंतवणूक करावी. यामुळे गरज पडल्यास या गुंतवणुकीचा वापर करता येईल.
आरोग्याकडे द्या लक्षवाढत्या वयानुसार आरोग्याच्या समस्या जाणवतात. यामुळे बचत केलेली संपूर्ण रक्कम हॉस्पिटलचे बिल भरण्यातच खर्च होते. त्यामुळे या काळात आरोग्याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. तसेच, आरोग्य सेवांवर होणारा खर्च लक्षात घेऊन बचत करावी. आरोग्य, जीवन विम्यात गुंतवणूक करावी.
SWPनिवृत्तीनंतर सिस्टेमॅटिक विड्रॉल प्लॅनची (SWP) मदत घेतल्यास फायदा होऊ शकतो. तुम्ही म्युच्युअल फंड अथवा पेन्शन योजनाच्या मदतीने दरमहिन्याला ठराविक रक्कम मिळत राहील, हे सुनिश्चित करू शकता. दरमहिन्याला SWP च्या माध्यमातून मिळणाऱ्या रक्कमेचा वापर गरजा पूर्ण करण्यासाठी करू शकता व यामुळे अनावश्यक खर्च टाळण्यास मदत होऊ शकते.
मालमत्तेची नियोजनया कालावधीमध्ये मालमत्तेची योग्यप्रकारे नियोजन करणे गरजेचे आहे. तुम्ही मृत्यूपत्राद्वारे मालमत्तेची मालकी कुटुंबातील इतर सदस्यांना देऊ शकता. याशिवाय, एकापेक्षा अधिक मालमत्ता असल्यास त्याची विक्री करून आर्थिक गरजा पूर्ण करता येतील. घर भाड्याने दिल्यास त्यातून मिळणारे उत्पन्न इतर ठिकाणी गुंतवू शकता.

गरजेनुसार बचत योजनेत करा बदल

लक्षात घ्या की, बचत हे बंधनकारक नसले तरीही तुमच्या सुरक्षित भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. बचतीमध्ये लवकचिता असणे गरजेचे असून, गरज पडेल त्यानुसार वेळोवेळी त्यात बदल करायला हवा. 

नोकरी जाणे, आजारपण, कार दुरुस्ती सारख्या अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीमध्ये सेव्हिंग प्लॅन्सवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आपत्कालीन निधीची तरतूद करायलाच हवी. गरजेनुसार या निधीमधील रक्कम कमी जास्त करू शकता.तुम्ही खर्च, गुंतवणुकीबाबत आर्थिक सल्लागाराची मदत घेऊ शकता. तसेच, तुमच्या गुंतवणुकीमध्ये सातत्य सर्वात महत्त्वाचे आहे.