आपल्या मराठीत म्हणच आहे की थेंबे थेंबे तळे साचे, जर आपण या म्हणीनुसार आधीपासूनच म्हणजे तरुण वयातच गुंतवणुकीला सुरूवात केली तर ती भविष्यात महत्वाच्या कामासाठी नक्कीच कामी येईल. त्यामुळे गुंतवणुकीचा दूर दृष्टीकोन प्रत्येक तरुणाकडे असायला पाहिजे. भविष्यात आलेल्या आर्थिक संकटांना तोंड द्यायचे असल्यास, तुम्हाला त्याची तयारी आत्तापासूनच करावी लागेल. चला तर मग कोणत्या ठिकाणी गुंतवणूक करायची हे पाहूया.
Table of contents [Show]
PPF (पब्लिक प्रोव्हिडंट फंड)
तुम्ही जर वयाची तिशी पार केली नसल्यास, PPF हा तुमच्यासाठी गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. कारण, यात गुंतवणूक केल्यास, तुम्हाला 100 टक्के रिटर्नची हमी मिळेल. तसेच, यात पैसा गुंतवल्यास तुमची टॅक्समध्ये ही बचत होणार आहे. पण, तुम्हाला लगेच पैसे मिळणार नाहीत. या योजनेचा लाॅक इन कालावधी 15 वर्षांचा आहे. मात्र, 7 वर्षांनतर तुम्ही यातून काही रक्कम काढू शकता. त्यामुळे दीर्घ मुदतीचे ध्येय ठेवत असल्यास, तुम्ही यात गुंतवणूक करू शकता.
NPS (नॅशनल पेन्शन स्कीम)
राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच NPS या योजनेचे लक्ष्य रिटायरमेंट असून यात गुंतवणूक केल्यास, रिटायरमेंट नंतर तुम्हाला चांगला रिटर्न मिळू शकतो. त्यामुळे बरेच नोकरदार गुंतवणुकीसाठी हा पर्याय निवडतात. कारण, यात गुंतवणूक केल्यास तुम्हाला टॅक्समध्ये सवलत मिळते आणि तुम्हाला सुलभरित्या गुंतवणूक ही करता येते. तुम्ही जर रिटायरमेंट नंतर काही प्लॅनिंग करू इच्छित असल्यास, या योजनेत गुंतवणूक करू शकता.
ELSS (इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम)
तुम्ही जर रिस्क घ्यायला तयार असल्यास, ELSS फंडमध्ये गुंतवणूक करू शकता. हे म्युच्युअल फंडचा एक प्रकार आहे. यात तुम्ही गुंतवणूक केल्यास इन्कम टॅक्स अॅक्टच्या 80 C नुसार तुम्हाला करावर सवलत मिळते. मात्र, या फंडाचा लाॅक इन कालावधी 3 वर्षाचा असतो. त्यामुळे तोपर्यंत तुम्हाला या फंडातून पैसे काढता येणार नाहीत. म्हणूनच तुमच्या बजेटचे प्लॅनिंग करून तुम्ही यात गुंतवणूक करू शकता.
FD (फिक्स्ड डिपाॅझिट)
सर्वांत सुरक्षित गुंतवणूक म्हणून FD कडे पाहिले जाते. त्याचमुळे सर्वच गुंतवणुकदार FD मध्ये जास्त गुंतवणूक करतात. FD मध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार एक ठोक रक्कम दीर्घ मुदतीसाठी गुंतवू शकता. त्यावर बॅंक जे व्याज देते, ते तुमच्या FD ची मुदत संपल्यावर थेट तुमच्या खात्यात जमा होते. ज्या बँकेत तुमचे खाते आहे. त्या बँकेत जाऊन किंवा ऑनलाईन बॅंकिगद्वारे तुम्ही FD उघडू शकता.
SIP (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन)
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा SIP सर्वांत चांगला पर्याय आहे. याद्वारे तुम्ही 100 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. त्यामुळे SIP म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जास्त लोकप्रिय झाला आहे. दीर्घ मुदतीसाठी SIP मध्ये गुंतवणूक केल्यास, तुम्हाला यातून चांगला रिटर्न मिळू शकतो. यात गुंतवणूक करण्याआधी तुम्हाला मार्केटमधील फंड्सविषयी जाणून घेणे आवश्यक आहे.