Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Top Five Gadgets of 2022: हे पाच गॅझेट्स जे तुमच्याजवळ असायलाच हवेत

5 best tech gadgets of 2022

Top Five Gadgets of 2022: तंत्रज्ञानाच्या अविष्कारने रोजचे जगणे सोपे केले आहे. अशी काही गॅझेट्स आहेत ज्यांनी 2022 वर्ष गाजवले. ही गॅझेट खिशाला परडवणारी असून त्यांची वैशिष्ट्ये देखील अनेक आहेत.

दरवर्षी तंत्रज्ञानामध्ये अनेक बदल होत असतात. जशी टेक्नॉलॉजी अद्ययावत होते तशी बाजारात नवीन गॅझेट्स दाखल होतात. 2022 मध्ये अशीच काही निवडक गॅझेट्स बाजारात आली ज्यांनी स्वताची एक वेगळी ओळख निर्माण केली. यात स्मार्टवॉच, इअरफोन्स, हेडफोन्स यांतील भन्नाट ब्रॅंड्चा आपण आढावा घेऊया. 

प्लेगो ड्युअलपॉड्स (PLAYGO DUALPODS)

इअरपॉड्सच्या श्रेणीतील सर्वात लोकप्रिक आणि परवडणारा ब्रॅंड म्हणून प्लेगो ड्युअलपॉड्सची ओळख आहे. ड्युअल ड्रायव्हर टीडब्ल्यूएसमुळे या इअरपॉड्समधील आवाजाची अप्रतिम क्वालिटी या गॅझेट्सची जमेची बाजू आहे. बास वाढवलणे आणि हाय सेन्सिटिव्हिटी ड्रायव्हर डिझाईनमुळे उच्च दर्जाचा आवाज यातून ऐकायला मिळतो. कानाला कोणताही त्रास न होता अगदी सहजपणे वापरले जाणारे या इअरपॉड्समधील आवाजाची पातळी कंट्रोल करणे देखील सोपे आहे.  प्लेगो ड्युअलपॉड्सची किंमत 1799 ते 3999 रुपयांच्या दरम्यान आहे.

बोट एक्सटेंड स्मार्टवॉच (Boat Xtend Smartwatch)

बोट वेव्हअॅपच्या मदतीने या स्मार्टफोनमध्ये 50 हून अधिक फेस अॅक्सिस करु शकतात.बोट एक्सटेंड स्मार्टवॉचमध्ये 1.69 इंचाची एलसीडी स्क्रीन आहे. यात फिटनेस मॉनिटर असून त्यातून हार्टचेक, SPo2 आणि तुमच्या झोपेच्या पॅटर्नबाबत अद्ययावत माहिती पुरवेल. त्याशिवाय या स्मार्टवॉचमध्ये क्रिकेट, जिम वर्कआऊट, सायकलिंग, हायकिंग, स्विमिंग या सारख्या अॅक्टिव्हीटींना ट्रॅक करेल. या स्मार्टवॉचमध्ये 300 mAh बॅटरी आहे. अॅमेझॉन, क्रोमा, विजय सेल्स या स्टोअर्समध्ये हे स्मार्टवॉच 2999 ते 7990 रुपयांच्या दरम्यान उपलब्ध आहे.

सोनी डब्ल्यूएच-1000 एक्सएम5 वायरलेस हेडफोन्स (Sony WH-1000XM5 wireless headphones)

संगीत ऐकण्याच्या पद्धतीमध्ये सोनी डब्ल्यूएच-1000 एक्सएम5 या वायरलेस हेडफोन्सने क्रांती आणली आहे. या हेडफोन्समध्ये ऑटो एनसी ऑप्टिमायझर आहे जो आजबाजुच्या परिस्थितीनुसार आवाजाची पातळी स्वयंचलित पद्धतीने बदलतो. ज्यामुळे युजर्सला आवाजाची पातळी स्थिर ऐकू येते. त्याचबरोबर सोनी डब्ल्यूएच-1000 एक्सएम5 मघ्ये 8 नॉन कॅन्सलिंग मायक्रोफोन्स असून प्रत्येक साईडला 4 आहेत. यात व्हॉईसपिकअप टेक्नॉलॉजीचा समावेश आहे. हे उत्पादन ई-कॉमर्स आणि स्टोअर्समध्ये 29990 ते 34990 रुपयांदरम्यान उपलब्ध आहे.

वनप्लस बड्स झेड2 (OnePlus Buds Z2)

हेडफोन्समधील प्रिमीयम श्रेणीत वनप्लस बड्स झेड2 (OnePlus Buds Z2) या गॅझेट्सचा समावेश होतो. यात तीन मायक्रोफोन असून 11mm ड्रायव्हर युनिट आहेत. हे गॅझेट्स 5.2 ब्लुटूथला सपोर्ट करते. याशिवाय अॅक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन आणि 80 dB पर्यंत यातून आवाज ऐकता येऊ शकतो. याची बॅटरी 7 तास चालेल तर एकूण बॅटरी लाईफ ही 38 तासांची आहे, असा दावा कंपनीने केला आहे. हे प्रोडक्ट अॅमेझॉन, क्रोमा, विजय सेल्समध्ये 4997 ते 5999 रुपयांदरम्यान उपलब्ध आहे.

प्लेफिट स्लिम (PLAYFIT SLIM)

मेड इन इंडिया स्मार्टवॉच असलेल्या प्लेफिट स्लिममध्ये 1.28 इंचाचा IPS एलसीडी स्क्रीन आहे. IP 67 हे धूळ आणि पाण्यापासून स्मार्टवॉचचा बचाव करते. हार्ट रेट तपासणे, फिटनेस ट्रॅकर स्लीप आणि SPO2 मॉनिटर असून ब्लुटूथ नोटिफिकेशन युजर्सला पाहता येतात. यात 180 mAh बॅटरी असून 7 दिवसांचाी बॅटरी लाईफ आणि 15 दिवसांचा स्टॅंडबाय टाईम मिळोतो. प्लेफिट स्लिम स्मार्टवॉचची किंमत 2999 ते 4999 रुपये या दरम्यान आहे.