मागील काही वर्षांपासून क्रिप्टोकरन्सी मार्केट (Crypto Currency Market) अधिक लोकप्रिय होत आहे. क्रिप्टोकरन्सीजच्या बाजारातील उच्च अस्थिरतेमुळे, अनेक गुंतवणूकदार कोणत्या क्रिप्टोकरन्सीजची सर्वाधिक ट्रेडिंग होते याच्या शोधात असतात. त्यामुळे याज आम्ही तुम्हाला प्रचंड नफा कमावून देणाऱ्या टॉप क्रिप्टो करन्सीजची माहिती देणार आहोत.
Table of contents [Show]
इथेरियम (Ethereum)
इथेरियमच्या वॉल्यूमचा विचार केल्यास दुसरी सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी आहे. इथेरियमचा प्रमुख क्रिप्टोकरन्सीच्या यादीमध्ये समावेश होतो. यामागील प्रमुख कारण म्हणजे त्याचे अॅप्लिकेशन ज्यामध्ये स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स प्रमुख आहेत. यामुळे इतर ऑल्टकॉइन्स (altcoins) पेक्षा इथेरियम (Ethereum) वेगळे असून यामध्ये भरपूर नफा मिळवून देण्याची क्षमता आहे.
शिबा इनू (Shiba Inu)
जिथे डोगेकॉइनचा (Dogecoin) प्रश्न येतो, तिथे शिबा इनू (Shiba Inu) चे नाव नक्कीच आहे. ही क्रिप्टोकरन्सी डॉगेकॉइनची सर्वात मोठे प्रतिस्पर्धी आहे. या क्रिप्टोकरन्सीने गुंतवणूकदारांना प्रचंड नफा कमवून दिला आहे. अनेकदा असे दिसून येते की Dogecoin ची किंमत वाढल्याने SHIBA च्या किंमतीत देखील सुधारणा होते.
कार्डानो (Cardano)
एक मजबूत दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून ADA (Cardano) कडे पाहिले जाते. जी येत्या काही वर्षांत चांगली वाढू शकते. Cardano कडे सर्वात प्रगत प्रूफ-ऑफ-वर्क अल्गोरिदम आहे, जे सुरक्षितता आणि विकेंद्रीकरणाच्या दृष्टीने या क्रिप्टाकरन्सीला मजबूत बनवते.
पॉलिगॉन (Polygon)
इथेरियम स्केलिंग आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी पॉलिगॉन हे पहिले सु-संरचित, वापरण्यास सुलभ प्लॅटफॉर्म आहे. MATIC टोकन अस्तित्वात राहील आणि सिस्टम सुरक्षित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. त्यामुळे गुंतवणुकीसाठीही हा एक चांगला पर्याय आहे.
एक्सआरपी (XRP)
अॅनालिटिक्स इनसाइटच्या (Analytics Insight) मते, हे 1 डॉलर अंतर्गत सर्वोत्तम क्रिप्टोपैकी एक आहे. सुमारे 200 वित्तीय संस्थांसोबत त्याचे चांगले बँकिंग संबंध आहेत. शिवाय, त्याच्या कायदेशीर स्थितीतील कोणताही फायदेशीर बदल त्याचे मूल्य वाढवू शकतो.
डॉजकॉइन (Dogecoin)
Dogecoin ची नफा मिळण्याची क्षमता जास्त आहे. कारण अनेक प्रमुख altcoin एक्सचेंजेसवर तो ट्रेड होतो.
टिथर (Tether)
हे व्हॉल्यूमनुसार सर्वात मोठे स्टेबलकॉइन आहे आणि जगभरातील अनेक क्रिप्टो गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. स्टेबलकॉइन्स मुळात बर्याच प्रमाणात स्थिर असतात आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगल्या मानल्या जातात. Tether चे मार्केट कॅप येत्या काही महिन्यांत खूप वेगाने वाढण्याची अपेक्षा आहे.