इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये मिड कॅप-लार्ज कॅप यांच्यापेक्षा जास्त रिस्क स्माॅल कॅप फंडमध्ये आहे. त्यांची कामगिरी व्यवस्थित राहिली तर मार्केट स्थिर राहायला मदत होते. त्यांची कामगिरी ढासळली तर मार्केट अस्थिर व्हायला वेळ लागत नाही. पर्सनल फायनान्स तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तुमच्याजवळ जास्त संयम आणि रिस्क घेण्याची क्षमता असल्यास, तुम्ही दीर्घकाळासाठी या फंड्समध्ये गुंतवणूक करू शकता. कारण, या फंड्समध्ये दीर्घकाळात जास्त रिटर्न देण्याची क्षमता आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता या फंड्सनी एका वर्षांत जबरदस्त रिटर्न गुंतवणुकदारांना दिला आहे.
Table of contents [Show]
स्माॅल कॅप फंडची धमाकेदार कामगिरी
व्हॅल्यू रिसर्चवरील डेटानुसार, 1 वर्षात सर्वांत जास्त रिटर्न देणारे 5 स्माॅल कॅप गुंतवणुकदारांसाठी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये HDFC स्माॅल कॅप, Quant स्माॅल कॅप, फ्रॅंकलिन इंडिया स्माॅलर कंपनीज, निप्पाॅन इंडिया स्माॅल कॅप, टाटा स्माॅल कॅप यांचा समावेश आहे. तसेच, कोणत्या फंडाचा एक्सपेन्स रेशो चांगला आहे, त्यांची गुंतवणूक कुठे सर्वांत जास्त आहे. याविषयी माहिती फंड्सच्या रिटर्नसह दिली आहे.
HDFC स्माॅल कॅप फंड
या फंडने सर्वाधिक रिटर्न म्हणजेच 39. 16 % दिला आहे. तसेच, यांची सर्वांत जास्त गुंतवणूक 91.21% इक्विटीमध्ये आहे आणि उरलेली कॅश व कॅश इक्विटीमध्ये आहे. फंडचा एक्सपेन्स रेशो 0.77 % आहे. कमीतकमी 100 रुपयांपासून तुम्ही एसआयपी सुरू करू शकता. त्यामुळे गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे गुंतवण्याची गरज नाही. सुरुवातीला अगदी कमी रकमेपासून तुम्ही गुंतवणूक करू शकता.
Quant स्माॅल कॅप फंड
या फंडचा नंबर दुसरा लागतो. या फंडनेही HDFC च्या खालोखाल 38.03 % रिटर्न एका वर्षात दिला आहे. तसेच, यांची सर्वांत जास्त गुंतवणूक 83.93% इक्विटीमध्ये आहे आणि 8.89 डेब्टमध्ये आहे. बाकीची कॅश व कॅश इक्विटीमध्ये आहे. फंडचा एक्सपेन्स रेशो 0.67 % आहे. कमीतकमी 1000 रुपयांपासून तुम्ही एसआयपी सुरू करू शकता.
फ्रँकलिन इंडिया स्माॅलर कंपनीज
या फंडनेही 1 वर्षात 35.29% रिटर्न दिला आहे. तसेच, यांची सर्वांत जास्त गुंतवणूक 93.99% इक्विटीमध्ये आहे. बाकीची कॅश व कॅश इक्विटीमध्ये आहे. फंडचा एक्सपेन्स रेशो 0.82 % आहे. कमीतकमी 500 रुपयांपासून तुम्ही एसआयपी सुरू करू शकता.
निप्पाॅन इंडिया स्माॅल कॅप
या फंडनेही या यादीत बाजी मारली असून 1 वर्षात 33.17% रिटर्न दिला आहे. तसेच, यांची सर्वांत जास्त गुंतवणूक 96.08% इक्विटीमध्ये आहे. बाकीची कॅश, कॅश इक्विटी व डेब्टमध्ये आहे. फंडचा एक्सपेन्स रेशो 0.75 % आहे. कमीतकमी 100 रुपयांपासून तुम्ही एसआयपी सुरू करू शकता.
टाटा स्माॅल कॅप
या फंडनेही 1 वर्षात 33.39% रिटर्न दिला आहे. तसेच, यांची सर्वांत जास्त गुंतवणूक 83.78% इक्विटीमध्ये आहे. बाकीची कॅश, कॅश इक्विटी व डेब्टमध्ये आहे. फंडचा एक्सपेन्स रेशो 0.44 % आहे. कमीतकमी 150 रुपयांपासून तुम्ही एसआयपी सुरू करू शकता.
फंड्सचा 1 वर्षाचा रिटर्न खाली दिला आहे.