International Mutual Funds: इंटरनॅशनल म्युच्युअल फंड हे रेग्युलर म्युच्युअल फंडासारखेच काम करतात. मात्र, नावाप्रमाणे इंटरनॅशनल कंपन्यांमध्ये फंड मॅनेजर गुंतवणूक करतो. भारतामध्ये 100 पेक्षा जास्त इंटरनॅशनल म्युच्युअल फंड्स आहेत. यामधील एकूण गुंतवणूक 82 हजार कोटींपेक्षा जास्त आहे. या लेखात पाहूया मागील वर्षभरात कोणत्या फंड्सने सर्वाधिक परतावा दिला.
भारतीय भांडवली बाजार नियामक सेबीच्या नियमानुसार थीमवर आधारित जे फंड असतात त्यांना 80% रक्कम त्या क्षेत्रातील कंपन्यांमध्येच गुंतवावी लागते. (Top Ten International Mutual funds) म्हणजेच इंटरनॅशनल म्युच्युअल फंडांना 80% पेक्षा जास्त रक्कम आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या इक्विटी शेअर्समध्ये गुंतवावी लागते. भौगोलिक मर्यादा ओलांडून कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्याने जोखीमही कमी होते.
मागील एक वर्षाचा विचार करता आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंड्सने सरासरी 19% परतावा दिला आहे. या कालावधीत काही ठराविक फंडांनी 40% पर्यंत परतावा दिला आहे. 2023 वर्षात इंटरनॅशनल फंड्सची प्रगती 15 टक्क्यांनी झाली.
मागील 12 महिन्यात मिराई अॅसेट फंडने सर्वाधिक 69% परतावा दिला आहे. या म्युच्युअल फंडद्वारे अलिबाबा, फेसबुक, अल्फाबेट, अॅपल, बायडू, नावेडिया, अॅमझॉन, नेटफ्लिक्स, मायक्रोसॉफ्ट आणि टेस्ला या दहा बड्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यात येते. या फंडाद्वारे आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळते.
किरकोळ गुंतवणूकदार अॅमेझॉन, गुगल, अलिबाबा अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू शकत नाही. कारण या कंपन्यांच्या शेअर्सचे मूल्य खूप जास्त आहे. मात्र, इंटरनॅशनल म्युच्युअल फंडच्या युनिट्द्वारे सर्वसामान्य गुंतवणूकदारही ग्लोबल कंपन्यांच्या समभागधारक होऊ शकतो.
प्रत्येक आंतरराष्ट्रीय कंपनीत गुंतवणूकदारांना गुंतवणूक करता येत नाही. काही क्षेत्र गुंतवणुकीसाठी खुली नसतात. कोणतीही अॅसेट मॅनेजमेंट कंपनी 1 बिलियन डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक इंटरनॅशनल कंपन्यांमध्ये करू शकत नाहीत, असा सेबीचा नियम आहे.