मंगळवारी क्रिप्टो बाजार उच्च पातळीवर व्यवहार करत होता. सर्व प्रमुख क्रिप्टोकरन्सीमध्ये खरेदी दिसून आली आणि एकूण क्रिप्टो मार्केट-कॅपने $800 बिलियन डॉलर्सचा टप्पा ओलांडला. एकूणच क्रिप्टो मार्केट-कॅपने $800 अब्जचा टप्पा ओलांडला, बिटकॉइन आणि इथर सारख्या हेवीवेट क्रिप्टोकरन्सीच्या प्रयत्नाने हा टप्पा ओलांडण्याचा महत्वाची भूमिका बजावली. FTX घोटाळ्यामुळे चर्चेत आलेल्या सोलानाने २४ तासांत १२% पेक्षा जास्त वाढ दाखवल्यानंतर दुहेरी अंकी वाढ दाखवल्याने एकूण मार्केट आज खुश होते. सोलानाला इथरियमच्या संस्थापकाकडून सकारात्मक ट्विटचे समर्थन मिळाले ज्यामुळे सोलानाभोवती सकारात्मक गुंतवणूकदार भावना निर्माण झालेल्या दिसल्या.
जागतिक क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅप सुमारे $806.83 अब्ज वर पोहोचले असून, गेल्या 24 तासांमध्ये 1.03% वाढ मार्केटने अनुभवली.
DeFi मधील एकूण व्हॉल्यूम सध्या $1.72 बिलियन डॉलर्स असून, एकूण क्रिप्टो मार्केटच्या 24-तासातील व्हॉल्यूमच्या 7.30% टक्के आहे. सर्व स्टेबलकॉइन्सचा व्हॉल्यूम आता $21.19 बिलियन आहे, एकूण क्रिप्टो मार्केटचा 24-तासातील व्हॉल्यूम 90.05%. CoinMarketCap नुसार, Bitcoin, या जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सीची किंमत सुमारे $321 अब्ज होती, ज्याचे वर्चस्व सुमारे 39.86% टक्के होते, आज दिवसभरात 0.24% ची घट यामध्ये झालेली दिसून आली.
आजच्या क्रिप्टोकरन्सींच्या किंमती (Cryptocurrency Prices Today)
बिटकॉईन (Bitcoin): क्रिप्टोमधल्या या महत्त्वाच्या नाण्याची किंमत 3 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता 16 हजार 737.83 युएस डॉलर एवढी किंमत होती. मागील चोवीस तासात या नाण्याच्या किंमतीत 0.12 टक्के वाढ झाली आहे.
इथरियम (Ethereum): या विश्वासार्ह क्रिप्टो नाण्याच्या किंमत 1216.26 डॉलर्स एवढी असून त्यामध्ये 0.08 टक्क्यांची घसरण दिसून आली. वझीरएक्सनुसार (WazirX), आज या नाण्याचा भारतीय दर 1.09 लाख एवढा आहे.
डॉजकॉईन (Dogecoin): या नाण्याची किंमत 0.0717 युएस डॉलरवर सकाळी ट्रेड करत होती. या नाण्याचा दर मागील चोवीस तासात 0.50 टक्क्यांनी घसरला आहे. मधल्या काळात एलॉन मस्क यांच्या ट्विटरमुळे लाईमलाईटमध्ये आलेले हे नाणे सध्या किंमतीत घसरत चालले आहे. वझीरएक्सनुसार (WazirX), भारतातील डोजकॉईनची किंमत 5.94 रुपये आहे.
लाइटकॉईन (Litecoin): मागील चोवीस तासांमध्ये या नाण्याच्या दरात 0.90 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर या नाण्याची किंमत 75.65 युएस डॉलर होती. भारतात या नाण्याची किंमत 6 हजार 268 रुपये आहे.
सोलाना (Solana): या नाण्याच्या किंमतीत मागील चोवीस तासांत 6.05 टक्क्यांची वाढ झाली असून, याची किंमत 11.83 युएस डॉलर एवढी आहे. तर याची भारतीय किंमत 980 रुपये एवढी आहे.