प्राप्तिकर भरण्यासाठी आयकर विभागाने केल्या काही महिन्यांपासून विशेष मोहीम राबवली होती. आर्थिक वर्ष 2022-23 साठी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023, म्हणजे आज आहे. तुम्ही तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न भरलाय का? नसेल तर आजची भरून घ्या. याविषयी तुम्हांला सविस्तर माहिती हवी असल्यास महामनी डॉट कॉमवर तुम्हांला संपूर्ण डीटेल्स मिळतील.
जर तुम्ही अजूनही तुमचा इन्कम टॅक्स भरला नसेल तर येत्या 31 डिसेंबर 2023 पर्यंत विलंब शुल्कासह तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकणार आहात. परंतु नसत्या भानगडीत न पडता आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आपण वेळेतच आयकर भरला पाहिजे.
कायदा काय सांगतो?
काही अपरिहार्य कारणांमुळे जर तुम्हांला वेळेत इन्कम टॅक्स रिटर्न भरता आला नसेल तर तुमच्याकडे अजूनही एक विकल्प शिल्लक आहे हे लक्षात असू द्या. आयकर कायद्याच्या कलम 139(1), 234F अंतर्गत जर तुम्हांला इन्कम टॅक्स रिटर्न वेळेत भरता आला नसेल तर विलंब शुल्कासह तुम्हांला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करता येणार आहे.
ITR late fees #incometax #IncomeTax #incometaxreturn #incometaxfiling #ITRAY2324 #incometaxseason pic.twitter.com/CFEGkZcsBG
— PracticeGuru - Grow Tax Practice (@practice_guru) July 25, 2023
किती दंड भरावा लागेल?
कायद्यानुसार दंडाची रक्कम देखील नमूद करण्यात आली आहे. आयकर भरणाऱ्या व्यक्तीचे एकूण उत्पन्न जर 5 लाखांपेक्षा जास्त नसेल तर त्याला 1000 रुपये दंड भरावा लागेल.तसेच इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्या व्यक्तीचे एकूण उत्पन्न जर 5 लाखांपेक्षा जास्त असेल तर 5,000 रुपये दंड भरावा लागणार आहे. तसेच ज्या व्यक्तींचे उत्पन्न अडीज लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल तर अशा व्यक्तींना विलंब शुल्क न देता इन्कम टॅक्स रिटर्न भरता येणार आहे.
दंड आणि व्याजदेखील भरावे लागेल…
यात आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरायला उशीर झाला असेल तर तुम्ही तो दंडात्मक शुल्क आकारून भरू शकता. मात्र यासोबतच तुम्ही तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न भरायला जितका वेळ लावाल, त्या महिन्यांचे व्याज देखील तुमच्याकडून वसूल केले जाते हे लक्षात असू द्या. होय, तुमच्याकडून दंडासोबतच व्याजही आकारले जाणार आहे. जर तुम्ही देय तारखेला किंवा त्यापूर्वी रिटर्न भरले नाही तर, आयकर कायद्याच्या कलम 234A अंतर्गत प्रत्येक महिन्यासाठी किंवा महिन्याच्या काही भागासाठी एक टक्का दराने थकबाकी करावर व्याज भरावे लागणार आहे. सोबतच जर तुम्ही कर भरला नाही तर ITR देखील दाखल करता येत नाही, हे लक्षात असू द्या.