Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Travelling after Retirement: निवृत्तीनंतर कमी खर्चात प्रवास करावा? जाणून घ्या

Travelling after Retirement

Image Source : https://www.freepik.com/

तरूणपणी नोकरीमुळे प्रवास करायला जमत नाही. अशावेळी, निवृत्तीनंतर प्रवास करण्याचा अनेकांचा विचार असतो. मात्र, प्रवासासाठी पैशांची गरज असते. त्यामुळे आधीपासूनच बचतीची सवय लावणे गरजेचे आहे.

प्रवास करायला कोणाला आवडत नाही? नवीन शहरांना भेट देणे, तेथील संस्कृती, राहणीमान, खाणपान अशा गोष्टींचा अनुभव घ्यायला प्रत्येकालाच आवडते. मात्र, तरूण असताना नोकरीमुळे प्रवास करायला जमत नाही. अशावेळी, निवृत्तीनंतर प्रवास करण्याचा अनेकांचा विचार असतो. मात्र, प्रवासासाठी पैशांची गरज असते. त्यामुळे आधीपासूनच बचतीची सवय लावणे गरजेचे आहे. प्रवासासाठी बचत कशी करावी व निवृत्तीनंतर कमी खर्चात कशाप्रकारे प्रवास करणे शक्य आहे? याविषयी या लेखातून जाणून घेऊयात. 

प्रवासासाठी करा बचत

निवृत्तीनंतर प्रवास करण्याचा अनुभव अविस्मरणीय ठरू शकतो. मात्र, अशा प्रवासासाठी आधीपासूनच बचत करणे गरजेचे आहे. किती पैसे वाचवायला हवे, हे तुमच्या प्रवासानुसार ठरते. इतर देशातील प्रवासाच्या तुलनेत देशांतर्गत प्रवास करायला कमी खर्च येतो. 

सर्वातआधी तुम्हाला कोणत्या ठिकाणी प्रवास करायचा आहे व यासाठी किती खर्च येऊ शकतो, याबाबत माहिती घ्या. प्रवासाचे उद्दिष्ट ठरवून बचत केल्यास त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. तुम्ही दरमहिन्याला पगारातील काही रक्कम प्रवासासाठी बाजूला काढून ठेऊ शकता. 
तुम्ही जर कोणतीही बचत केलेली नसल्यास निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शनमधील काही रक्कमेचा वापरही प्रवासासाठी करू शकता. अनेकदा नियमित बचत करणे शक्य होत नाही. अशावेळी ऑटोमॅटिक सेव्हिंगचा पर्यायही निवडू शकता.

निवृत्तीनंतर कमी खर्चात कसा कराल प्रवास?

आधीच करा बुकिंग प्रवासाची आधीपासूनच योजना आखल्यास निश्चितच फायदा होऊ शकतो. ऑफ-सीझनमध्ये प्रवास केल्यास विमान, रेल्वे भाडे स्वस्त पडते. प्रवास करताना सर्वाधिक खर्च हा वाहतुकीसाठीच होतो. मात्र, तुम्ही योग्य नियोजन करून काही महिने आधीच रेल्वे अथवा विमानाचे तिकीट बुक केल्यास कमी खर्चात प्रवास करता येईल.
सार्वजनिक वाहतूक कमी खर्चात प्रवास करायचा असल्यास सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा. खासगी वाहनाने प्रवास करताना जास्त खर्च येतो. त्यातुलनेत बस, रेल्वे अशा सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर केल्यास नक्कीच पैशांची बचत होईल व तुम्ही कमी खर्चात जास्तीत जास्त प्रवास करू शकता.
डिस्काउंटचा घ्या फायदाअनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना सवलत दिली जाते. हॉटेल्स, एअरलाइन्स, पर्यटन स्थळी ज्येष्ठ नागरिकांना सवलत देतात. तुम्ही जर निवृत्तीनंतर प्रवास करत असाल तर अशा डिस्काउंटचा नक्कीच फायदा घेऊ शकता.
इतरांसोबत करा प्रवास

इतरांसोबत प्रवास करताना कमी खर्च येतो. मित्र-मैत्रिणी, कुटुंबातील सदस्यांसोबत प्रवास केल्यास वाहतुकीपासून ते प्रवासापर्यंत प्रत्येक खर्चाचे विभाजन होते. याशिवाय, अनेक शहरांमध्ये काही क्लब अथवा संस्था वेगवेगळ्या ट्रिपचे आयोजन करतात. या माध्यमातूनही कमी खर्चात प्रवास करता येईल. 

राहण्यासाठी देखील स्वस्त हॉटेल्सचा पर्याय निवडावा. अ‍ॅप्सच्या माध्यमातून हॉटेलचे बुकिंग करता येते. अशावेळी वेगवेगळ्या हॉटेल्समधील जेवण व राहण्यासाठीच्या खर्चाची तुलनात करून योग्य पर्याय निवडावा.