Mutual Fund Investment: म्युच्युअल फंडमध्ये प्रत्येक महिन्याला 10 हजार रुपयांची एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक केली असता, ती रक्कम जवळपास 21.50 लाख रुपये झाली असती आणि त्याचे आताचे मूल्य जवळपास 1 कोटीहून अधिक झाले असते.
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कशी करतात किंवा यामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर परतावा किती मिळतो. याबद्दल आपण वेळोवेळी जाणून घेतले आहे. पण आज आपण एका म्युच्युअल फंडमधील स्कीमने त्याच्या स्थापनेपासून गुंतवणूकदारांना कशाप्रकारे फायदा मिळवून दिला. याबद्दल जाणून घेणार आहोत.
SIP तून 18 वर्षांत 1.1 कोटी रुपये
आपण आदित्य बिर्ला सन लाईफ इंडिया जेननेक्स्ट (Aditya Birla Sun Life India GenNext Fund) फंडबद्दल माहिती घेणार आहोत. या फंडाची स्थापना म्हणजेच सुरुवात 5 ऑगस्ट, 2005 मध्ये झाली होती. त्याला उद्या बरोबर 18 वर्षे पूर्ण होतील. या फंडाने गुंतवणूकदारांना वर्षाला चक्रवाढ पद्धतीने 16.20 टक्क्यांपर्यंत रिटर्न दिले आहेत. म्हणजेच या फंडाच्या सुरुवातीला एखाद्या गुंतवणूकदाराने 10 हजार रुपयांची गुंतवणूक केली असती, तर ती आज 18 वर्षांनंतर त्याचे मूल्य 1.55 लाख रुपये झाले असते. पण एखाद्या गुंतवणूकदाराने या फंडामध्ये एकत्रित गुंतवणूक करण्याऐवजी प्रत्येक महिन्याला सिस्टेमॅटिक पद्धतीने 10 हजार रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आज त्याचे मूल्य जवळपास 1.1 कोटी रुपये इतके असते.
म्युच्युअल फंडमधील एसआयपी गुंतवणूक पद्धतीतून अशाप्रकारे मिळणारा परतावा गुंतवणूकदारांना अधिकाधिक आकर्षित करत आहे. ज्या गुंतवणूकदाराने या स्कीमध्ये एसआयपीद्वारे प्रत्येक महिन्याला 10 हजार रुपयांची गुंतवणूक केली. त्याची यामध्ये एकूण 21.50 लाख रुपयांची गुंतवणूक झाली असती आणि त्याचे मूल्य 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले असते.
सध्या आदित्य बिर्ला सन लाईफ इंडिया जेन नेक्स्ट फंडामध्ये जमा झालेली गुंतवणूक ही 30 जून, 2023 पर्यंत एकूण 3,855.80 कोटी रुपये आहे. हा जमा झालेला निधी तरुणांद्वारे वापरल्या जाणाऱ्या विविध स्कीम आणि योजनांमधील कंपन्यांमध्ये गुंतवला जातो. या फंडाच्या नावातच GenNext असल्यामुळे हा निधी भविष्यातील गरज ओळखून गुंतवला जात आहे.
मार्केटमधील मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक
Aditya Birla Sun Life India GenNext फंडाने सुरुवातीपासून ते आतापर्यंत गुंतवणूकदारांना 16.20 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. 3 ऑगस्ट रोजी या फंडाचा एनएव्ही (नेट अॅसेट व्हॅल्यू) 158.74 रुपये होती. तर यामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना येणाऱ्या खर्चाचे प्रमाण 1.92 टक्के आहे. या फंडाने गुंतवणूकदारांना अधिकाधिक नफा मिळवून देण्यासाठी मार्केटमधील स्ट्राँग कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. यामध्ये आयटीसी, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, भारती एअरटेल, अॅक्सिस बँक, मारुती सुझुकी इंडिया, युनायटेड स्पिरिट्स, नेस्टले इंडिया आणि टाटा मोटर्स आदी कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली.
(डिसक्लेमर : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)