Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ponniyin selvan 2 साठी ऐश्वर्या राय-बच्चन ठरली दुसरी सर्वात महागडी कलाकार; पहिला नंबर कोणाचा जाणून घ्या

Ponniyin Selvan 2

Image Source : www.moviecrow.com

Ponniyin selvan 2: 2022 मधील बिग बजेट चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘पोन्नियिन सेल्वन भाग - 1’. याचाच दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला 28 एप्रिलला येणार आहे. नुकताच त्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यानिमित्ताने या चित्रपटातील स्टार कलाकारांनी नेमके किती मानधन घेतले आहे, याबद्दल आज जाणून घेऊयात.

हल्ली सिनेसृष्टीत दक्षिणात्य चित्रपटांचा दबदबा पाहायला मिळत आहे. उत्तम कथानक आणि बिग बजेटमुळे हे चित्रपट चांगलेत चर्चेत आहेत. याच बिग बजेट चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘पोन्नियिन सेल्वन’ (Ponniyin Selvan).  2022 साली दिग्दर्शक मणिरत्नम (Mani Ratnam) यांनी दिग्दर्शित केलेला ‘पोन्नियिन सेल्वन भाग - 1’ (Ponniyin Selvan-1) प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीला उतरला. या चित्रपटाने 400 कोटीहून जास्तीची कमाई करून नावलौकिकही मिळवला. याच चित्रपटाचा पोन्नियिन सेल्वन भाग- 2, 28 एप्रिलला  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच त्याचा ट्रेलरही  रिलीज झाला आहे.

पोन्नियिन सेल्वन भाग 1 मध्ये विक्रम, जयम रवी, ऐश्वर्या राय-बच्चन, त्रिशा इ. कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या होत्या. www.cine-tales.com या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाच्या दोन्ही भागाचे बजेट 500 करोड होते. विशेष कौतुकाची गोष्ट म्हणजे ऐश्वर्या राय- बच्चन ही या स्टार कास्टमधील सर्वात महागडी दुसऱ्या क्रमांकाची कलाकार ठरली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरच्या निमित्ताने पोन्नियिन सेल्वन भाग- 2 साठी कलाकारांनी किती मानधन घेतलं, ते आजच्या लेखातून जाणून घेऊयात.

पोन्नियिन सेल्वन भाग- 2 साठीचे कलाकारांचे मानधन

ऐश्वर्या राय- बच्चन (Aishwarya Rai-Bachchan)

aishwarya-rai.jpg
www.cine-tales.com

पोन्नियिन सेल्वन भाग- 1 मध्ये ऐश्वर्या राय-बच्चनच्या मनमोहक सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पडली होती. ‘नंदिनी’ या पात्राची तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीला उतरली. आता पोन्नियिन सेल्वन भाग- 2 मध्ये देखील ऐश्वर्या पाहायला मिळणार आहे. ऐश्वर्याने पोन्नियिन सेल्वन भाग- 2 साठी 10 कोटींचे मानधन घेतले आहे. त्यामुळेच ती या चित्रपटाच्या स्टार कास्टमधील सर्वात महागडी दुसऱ्या क्रमांकाची कलाकार ठरली आहे.

विक्रम (Vikram)

vikram.jpg
www.pinkvilla.com

दक्षिणात्य अभिनेता विक्रम (Vikram) चित्रपटातील कथानकाचा मुख्य चेहरा आहे. या अगोदर साकारलेल्या रोलपेक्षा विक्रमाचा हा रोल थोडा वेगळा आहे, ज्यामुळे तो प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे. पोन्नियिन सेल्वन भाग- 2 साठी विक्रमने 12 कोटींचे मानधन घेतले आहे. ज्यामुळे तो या चित्रपटाच्या स्टार कास्टमधील सर्वात महागडा अभिनेता ठरला आहे.

जयम रवी (Jayam Ravi)

jayaram-ravi.jpg
www.koimoi.com

पोनीच्या सेल्वन कथेचा नायक म्हणून जयम रवीने (Jayam Ravi) यामध्ये काम केले आहे. या चित्रपटात त्याने अरुणमोझीवर्मन ही भूमिका साकारली आहे. महत्वाचं म्हणजे मणिरत्नम (Mani Ratnam) यांच्या बरोबर जयम रवीने पहिल्यांदाच काम केले आहे. या भूमिकेसाठी जयम रवीने 8 करोड रुपयांचे  मानधन घेतले आहे.

कार्थी (Karthi)

karthi.jpg
www.moviegalleri.net

तमिळ सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता कार्थी (Karthi) हा देखील पोन्नियिन सेल्वन भाग- 2 मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात त्याने वल्लवनारायण वंदियादेवनची भूमिका साकारली आहे. त्यासाठी त्याने 5 कोटी रुपयांचे मानधन घेतले आहे.

त्रिशा कृष्णन (Trisha Krishnan)

trisha-krishnan.jpg
www.pinkvilla.com

दक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन (Trisha Krishnan) हिने देखील पोन्नियिन सेल्वन भाग- 2 मध्ये राजकुमारी कुंदावईची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटासाठी त्रिशाने मद्रास स्कूल ऑफ इक्विटेशनमधून व्यावसायिक घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेतले आहे. या रोलसाठी तिने 2.5 करोड रुपये मानधन स्वीकारले आहे. 

‘Ponniyin Selvan 2’ चा ट्रेलर तुम्ही येथे पाहू शकता.