Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

क्रेडीट कार्डवर EMI पर्याय वापरताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी

Credit Card EMI

प्रत्येकाच्या जीवनाची मनोरथं असतात. कोणाला ड्रीम वेकेशनवर जायचे असते, तर कोणाला ऑनलाईन कोर्स करायचा असतो. एखाद्याला सर्वोत्तम डीएसएलआर कॅमेरा विकत घ्यायचा असतो किंवा कोणाला आईकरिता अत्याधुनिक आयफोन किंवा मॉडर्न रेफ्रीजरेटर किंवा ओव्हन खरेदी करायचा असतो. अशा परिस्थितीत क्रेडीट कार्ड अतिशय उपयुक्त ठरतात. अर्थात त्यांचा वापर शहाणपणाने आणि काळजीपूर्वक करावा लागतो.

क्रेडीट कार्ड फार सुलभता प्रदान करतात. त्यामुळे पेमेंट करणे सोपे होते. सतत हातात पैसे ठेवण्याची गरज लागत नाही. त्याचप्रमाणे तुमच्या क्रेडीट कार्डचे व्यवहार सुरळीत मासिक हप्त्यांमध्ये म्हणजेच EMI मध्ये करणे शक्य आहे. जर एखादी मोठ्या रकमेची खरेदी करायची असेल तर त्यासाठी खिसा रिकामा करण्याची आवश्यकता नाही. मोठ्या रकमेची उत्पादने ईएमआयवर खरेदी करणे शक्य होत असल्याने लोकांचा क्रेडीट कार्डकडे वाढता कल असतो.    

खरेदी  EMI मध्ये कधी परावर्तीत करावी

क्रेडीट कार्डवरील ईएमआय उपयुक्त आणि सुलभ असू शकतो, तरीच काही परिस्थितीत ही सुविधा वापरण्याचा सल्ला देण्यात येतो. तुमच्या बँकेतील रक्कम खरेदीला हातभार लावणारी नसते, त्यावेळी ईएमआय उपयुक्त ठरतो. त्याशिवाय, जेव्हा तुम्ही क्रेडीट कार्डवर अधिक खर्च करता, त्यावेळी ईएमआय सर्वाधिक व्याज दरांपासून तुमचे रक्षण करतो. या स्थितीत, ईएमआय पर्यायाचा उपयोग केल्याने तुमचा व्याज दर अर्ध्याहून कमी होऊ शकतो. तसेच हे पर्याय एका क्लिकवर किंवा एका कॉलवर उपलब्ध आहेत. त्याकरिता कोणत्याही स्वरूपाचे अतिरिक्त दस्तावेज किंवा प्रक्रियेची आवश्यकता नाही. बऱ्याचदा अगदी तुमची क्रेडीट कार्ड स्टेटमेंट हा पर्याय शोधण्याकरिता मदत करेल. (No Cost EMI)

EMI पर्याय स्वीकारताना या गोष्टी लक्षात ठेवा

प्रोसेसिंग फी

ईएमआय योजनांकरिता क्षुल्लक प्रोसेसिंग फी मोजावी लागते. कृपया पर्याय निवडताना तपासा. त्याशिवाय अनेक बँका शून्य ईएमआय देऊ करतात, ज्याचा फायदा तुम्हाला घेता येईल.  

उपलब्ध कर्ज

आपल्या क्रेडीट कार्डमध्ये पुरेसे क्रेडीट असल्याची खातरजमा करा, जेणेकरून तुमची ईएमआय विनंती नाकारली जाणार नाही. ईएमआय परावर्तित करायचा झाल्यास क्रेडीट रक्कम त्या रकमेपेक्षा अधिक किंवा समान असणे आवश्यक ठरते.

कर्ज मर्यादेची तात्पुरती घट

ईएमआय योजना सुरू केल्यावर बँकेकडून तात्पुरत्या स्वरूपात ही रक्कम ब्लॉक करण्यात येईल. ज्याप्रमाणे तुम्ही मासिक हफ्त्यांची परतफेड कराल. त्याप्रमाणे बँकेकडून क्रेडिट मर्यादा पुन्हा वाढवण्यात येईल.  

काय परावर्तित करता येते आणि काय करता येत नाही

वेगळ्या बँका वेगळ्या गोष्टी आणि घटक देऊ करतात, सुलभ मासिक हफ्त्यांत रक्कम चुकती करण्याची संमती देतात. खरेदी इलेक्ट्रॉनिक उपकरणाची असो, प्रवासाचा खर्च असो किंवा कपड्यांची खरेदी, जीवनशैली विषयक खर्च, विमा खर्च इत्यादी. तरीच बहुतांशी बँका ग्राहकांना दागिने खरेदी, सोने, चांदी इत्यादी मौल्यवान धातू खरेदीची परवानगी देत नाहीत.

खरेदी आता करा आणि सुलभ हप्त्याने पैसे भरा

व्यवस्थापन करता येईल ईएमआय पर्याय: सुलभ मासिक हफ्ता सुविधा निवडताना ग्राहक ठरावीक कालावधीत कर्ज चुकवू शकतो, त्यामुळे स्वत:च्या पैशाचे व्यवस्थापन करण्यास त्यांना मदत होते. क्रेडीट प्रोफाईल सुधारते: ईएमआयने रक्कम चुकती केल्यास, कर्जधारक कर्ज थकवण्याचा प्रकार क्वचितच घडतो. त्यामुळे दरम्यानच्या काळात व्यक्तिची कर्जविषयक पार्श्वभूमी सुधारण्यास मदत होते.

आकर्षक व्याज दर: ईएमआय सुविधा स्वीकारल्यास त्यावर ठरावीक व्याज दर आकरण्यात येतो. तरीच खरेदीकरिता परावर्तित करण्यात आलेल्या रकमेच्या तुलनेत हा दर बराच अल्प ठरतो. काही बँका तुमच्या खरेदी ईएमआयवर कोणतेही व्याज आकरत नाहीत.

कर्ज चुकते करण्याच्या कालावधीत लवचिकता

ग्राहकांना त्यांच्या खरेदीवरील कर्जाच्या कालावधीची निवड करण्याचे स्वातंत्र्य असते. कर्जाची परतफेड करण्याचा सर्वसामान्य कालावधी 3 महिने, 6 महिने,  9 महिने आणि 12 महिन्यांचा असू शकतो. क्रेडीट कार्डमुळे तुमच्या व्यवहारांकरिता झटपट वित्तीय कर्ज मिळू शकते. भारतात ऑक्टोबर 2021 मध्ये क्रेडीट कार्डच्या माध्यमातून 1 लाख कोटींपर्यंतच्या खरेदीची नोंद झाली. हा एक नवा उच्चांक आहे. 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, क्रेडीट कार्ड व्यवहाराचे मूल्य महिना-दरमहिना 26% वाढून ऑक्टोबर महिन्यात सणासुदीच्या धर्तीवर 1,00,943 कोटींपर्यंत पोहोचले. मात्र एक लक्षात घेण्याजोगी महत्त्वाची बाब म्हणजे जर परतफेड करण्याच्या निर्धारित तारखेपर्यंत रक्कम चुकती केल्यास कार्ड जारीकर्ता कोणतेही व्याज, उच्च व्याज किंवा (तारखेनंतर रक्कम चुकती केल्यास) प्रलंबित शुल्क आकरत नाही. त्यामुळे तुम्ही नेहमीच क्रेडीट कार्डची बिलं वेळेवर भरा. जर कधी रक्कम वेळेवर चुकती करण्यात अडचण आली, तर दीर्घकालीन भरणा कालावधी असलेले ईएमआय व्यवहार करू शकता.