Top 10 Small Cap Mutual Fund: गेल्या 10 वर्षात म्युच्युअल फंड या गुंतवणूक पर्यायातील काही स्मॉल कॅप म्युच्युअल फंड कंपन्यांनी खूपच चांगला परतावा (Return) दिला आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया (Association of Mutual Funds in India-AMFI) या म्युच्युअल फंडशी संबंधित असलेल्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, गेल्या 10 वर्षात स्मॉल कॅप म्युच्युअल फंड कॅटेगरीतील किमान 10 फंडांनी 15 टक्क्यांच्यावर परतावा दिला आहे. तर इतर फंडांनी 15 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.
म्युच्युअल फंडमधील स्मॉल कॅप फंडमधून इथून पुढे इतक्या मोठ्या प्रमाणात परतावा मिळेलच याची शाश्वती नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना सेबी अधिकृत आर्थिक सल्लागाराची मदत घेऊनच त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घ्यावा. कारण म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. तरीही अॅम्फी (AMFI)च्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, स्मॉल कॅप फंडने 10 वर्षात चांगला परतावा दिला आहे. तर या कोणत्या कंपन्या आहेत; त्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
Table of contents [Show]
- निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड (Nippon India Small Cap Fund)
- एसबीआय स्मॉल कॅप फंड (SBI Small Cap Fund)
- डीएसपी स्मॉल कॅप फंड (DSP Small Cap Fund)
- फ्रॅन्कलिन इंडिया स्मॉलर कंपनीज (Franklin Indian Smaller Companies Fund)
- कोटक स्मॉल कॅप फंड (Kotak Small Cap Fund)
- सुंदरम स्मॉल कॅप फंड (Sundaram Small Cap Fund)
- एचडीएफसी स्मॉल कॅप फंड (HDFC Small Cap Fund)
- आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल स्मॉल कॅप (ICICI Prudential Small Cap Fund)
- आदित्य बिर्ला सन लाईफ स्मॉल कॅप (Aditya Birla Sun Life Small Cap Fund)
- क्वांट स्मॉल कॅप फंड (Quant Small Cap Fund)
निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड (Nippon India Small Cap Fund)
निप्पॉन इंडिया कंपनीतील स्मॉल कॅप फंडने डायरेक्ट गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना गेल्या 10 वर्षात 26.87 टक्के परतावा दिला आहे. तर रेग्युलर प्लॅनधून 25.67 टक्के रिटर्न दिले आहेत.
एसबीआय स्मॉल कॅप फंड (SBI Small Cap Fund)
एसबीआयच्या स्मॉल कॅप फंडमध्ये डायरेक्ट प्रक्रियेतून केलेल्या गुंतवणुकीवर गेल्या 10 वर्षात 26.09 टक्के परतावा दिला आहे. तर रेग्युलर योजनेंतर्गत 24.68 टक्के रिटर्न दिले आहेत.
डीएसपी स्मॉल कॅप फंड (DSP Small Cap Fund)
डीएसपी स्मॉल कॅप फंडने डायरेक्ट गुंतवणुकीतून गेल्या 10 वर्षांत गुंतवणूकदारांना 23.14 टक्क्यांपर्यंत रिटर्न दिले आहेत. तर रेग्युलर गुंतवणुकीमधून 22.25 टक्के रिटर्न दिले आहेत.
फ्रॅन्कलिन इंडिया स्मॉलर कंपनीज (Franklin Indian Smaller Companies Fund)
फ्रॅन्कलिन इंडिया स्मॉलर कंपनी फंडने गेल्या 10 वर्षात 21.41 टक्के परतावा दिला आहे. तर रेग्युलर गुंतवणुकीतून 20.17 टक्के परतावा दिला आहे.
कोटक स्मॉल कॅप फंड (Kotak Small Cap Fund)
कोटक म्युच्युअल फंड हाऊसमधील कोटक स्मॉल कॅप फंडने गेल्या 10 वर्षात डायरेक्ट गुंतवणुकीमधून 21.44 टक्के तर रेग्युलर गुंतवणुकीतून 19.87 टक्के परतावा दिला आहे.
सुंदरम स्मॉल कॅप फंड (Sundaram Small Cap Fund)
सुंदरम स्मॉल कॅप फंडमध्ये मागील 10 वर्षात डायरेक्ट पर्यायाने गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना 19.37 टक्के तर रेग्युलर गुंतवणुकीतून 18.43 टक्के परतावा दिला आहे.
एचडीएफसी स्मॉल कॅप फंड (HDFC Small Cap Fund)
एचडीएफसी स्मॉल कॅप फंडने डायरेक्ट गुंतवणुकीतून गुंतवणूकदारांना गेल्या 10 वर्षात 19.7 टक्के तर रेग्युलर गुंतवणुकीतून 18.43 टक्के रिटर्न्स दिले आहेत.
आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल स्मॉल कॅप (ICICI Prudential Small Cap Fund)
आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल स्मॉल कॅप फंडने गुंतवणूकदारांना डायरेक्ट इन्वेस्टमेंटमधून गुंतवणूकदारांना 10 वर्षात 17.57 टक्के तर रेग्युलर इन्वेस्टमेंटमधून 16.51 टक्के परतावा दिला आहे.
आदित्य बिर्ला सन लाईफ स्मॉल कॅप (Aditya Birla Sun Life Small Cap Fund)
आदित्य बिर्ला सन लाईफ स्मॉल कॅपमध्ये डायरेक्ट पर्यायाने गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना गेल्या 10 वर्षात 16.91 टक्के तर रेग्युलर गुंतवणुकीतून 15.72 टक्के परतावा दिला आहे.
क्वांट स्मॉल कॅप फंड (Quant Small Cap Fund)
क्वांट स्मॉल कॅप फंडच्या डायरेक्ट गुंतवणुकीवर 10 वर्षात गुंतवणूकदारांना 15.79 टक्के तर रेग्युलर गुंतवणुकीवर 15.10 टक्के परतावा दिला आहे.
(डिसक्लेमर: वरील बातमीमध्ये दिलेली आकडेवारी ही AMFI वेबसाईटवरील 21 एप्रिल, 2023 या तारखेची आहे. तसेच 'महामनी' कोणताही आर्थिक किंवा व्यावसायिक सल्ला देत नाही. गुंतवणुकी संदर्भात सल्ला हवा असल्यास आपण नोंदणीकृत वित्त सल्लागाराची मदत घ्यावी.)
Source: www.financialexpress.com