• 05 Feb, 2023 12:54

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

TV stars Fees : ‘हे’ प्रसिद्ध टीव्ही स्टार्स घेतात सर्वाधिक फी

TV stars Fees

आपल्या आवडत्या टीव्ही कलाकाराच्या (TV Actors) बाबतीतील अनेक गोष्टी जाणून घ्यायला त्याच्या चाहत्यांना नेहमीच आवडते. आज आपण टीव्ही इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक मानधन घेणारे स्टार्स कोण? आणि ते किती मानधन घेतात? हे पाहूया.

बॉलिवूडप्रमाणेच (Bollywood) टीव्ही स्टार्सची (TV Stars) लाईफस्टाईल नेहमीच चर्चेत असते. कमाईच्या बाबतीत टीव्ही स्टार्स बॉलिवूड स्टार्सच्या मागे नाहीत. नेहमी टीव्ही शोमध्ये दिसणारे हे स्टार्स चित्रपट कलाकारांपेक्षाही जास्त मानधन घेतात. टीव्ही आणि चित्रपट दुनियेतील स्टार्सच्या मानधनात तसा फारसा फरक दिसत नाही. टीव्ही स्टार्सच्या चाहत्यांची संख्या ही कोणत्याही बॉलिवूड स्टारच्या चाहत्यांच्या संख्येपेक्षा कमी नाही. आज आपण टीव्ही क्षेत्रात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या स्टार्सबद्दल जाणून घेऊया. ('These' famous TV stars charge the highest fees)

अभिनेत्री साक्षी तन्वर

अभिनेत्री साक्षी तन्वर ‘कहानी घर घर की’ या सिरियलद्वारे घराघरात पोहोचली. त्यानंतर क्राईम शोज् आणि चित्रपटांमध्येही दिसली. साक्षीने अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘दंगल’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावलेली अभिनेत्री साक्षी तन्वर एका एपिसोडसाठी जवळपास 1.25 लाख रुपये फी घेते.

अभिनेता मनीष पॉल

मनीष पॉल हा उत्कृष्ट अभिनेता असण्यासोबतच उत्तम होस्ट देखील आहे. त्याने विविध रिअॅलिटी शो होस्ट केले आहेत. मनीष पॉल एका एपिसोडसाठी 1.5 कोटी रुपये फी घेतो.

अभिनेता राम कपूर

अभिनेता राम कपूर हा टीव्ही इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांच्या यादीत येतो. त्याने टीव्हीप्रमाणेच चित्रपटातही काम केले आहे. ‘बडे अच्छे लगते हैं’, ‘कसम से’, ‘करले तू भी मोहब्बत’ आणि इतर अनेक शोमध्ये काम केले आहे. अभिनेता राम कपूर एका दिवसासाठी कमीत कमी 1.25 लाख रुपये घेतात.

अभिनेते शिवाजी साटम

सीआयडीमध्ये ‘कुछ तो गडबड है दया’ म्हणून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेले अभिनेते शिवाजी साटम यांनी अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री मधुरा वेलणकर ही त्यांची सून. अभिनेते शिवाजी साटम टीव्ही मालिकांमधील एका एपिसोडसाठी जवळपास एक लाख रुपये घेतात.

अभिनेत्री हिना खान

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत आदर्श सूनबाईची भूमिका बजावलेली अभिनेत्री हिना खान करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये एका प्रोजेक्टसाठी 80 हजार रुपये ते 1 लाख रुपये फी घेत होती. पण आज तिचे मानधन वाढले असून एका एपिसोडसाठी ती किमान 2 लाख रुपये आकारते.

अभिनेता सुनील ग्रोव्हर

विनोदवीर सुनील ग्रोव्हर याने ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांना खळखळून हसण्यास भाग पाडले. यासोबतच अभिनेता सुनिल ग्रोव्हर काही चित्रपटांमध्ये देखील दिसला. बराच काळ जोडला सुनील दिवसाला सुमारे 10 ते 12 लाख रुपये फी आकारतो.

अभिनेता मोहित रैना

‘देवों के देव महादेव’ या मालिकेतून तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या अभिनेता मोहित रैनासुद्धा कोणत्याही शोच्या एका एपिसोडसाठी एक लाख रुपये मानधन घेतो.

अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी

‘बनू में तेरी दुल्हन’ आणि ‘ये है मोहब्बते’ या मालिकांनी अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीला घराघरात पोहचवले. तिचा खूप मोठा चाहता वर्गदेखील आहे. तिने जाहिरातीतदेखील काम केले आहे. अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी एका दिवसाच्या एपिसोडसाठी 1.5 लाख रुपये घेते.

अभिनेता रोनित रॉय

चित्रपट आणि टीव्ही शो मधील प्रसिद्ध चेहरा म्हणून अभिनेता रोनित रॉय यांची ओळख आहे. अभिनेता रोनित रॉय जवळपास एका दिवसासाठी 1.25 लाख रुपये फी आकारतात.

अभिनेता कपिल शर्मा

विनोदाचा बादशाह कपिल शर्माचा जगभरात चाहतावर्ग आहे. अभिनेता कपिल शर्मा टीव्ही शोच्या एका एपिसोडसाठी 60 ते 80 लाख रुपये मानधन घेतो.