Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Big Budget Bollywood Movie 2023: प्रेक्षकांसाठी नवीन वर्ष असणार खास, बॉलिवुडचे येणार बिग बजेट चित्रपट

Big Budget Bollywood Movie 2023

Bollywood Movie in 2023: बॉलिवुडसाठी 2023 हे वर्ष खूप खास असणार आहे. सोबतच प्रेक्षकांचीदेखील धमाल असणार आहे. कारण बॉलिवुड या नवीन वर्षात घेऊन येत आहेत, एकापेक्षा एक झक्कास चित्रपट. प्रेक्षकांचे होणार फुल टू मनोरजंन. चला, तर पाहूयात 2023 या नवीन वर्षातील बिग बजेट बॉलिवुड चित्रपट.

Big Budget Bollywood Movie: 2023 मध्ये बॉलिवुडने साऊथ चित्रपटांना ठक्कर देण्यासाठी, यावर्षी बिग बजेट चित्रपट हाती घेतले आहे. हे चित्रपट प्रेक्षकांचे फूल टू मनोरंजन करणार आहे. बॉलिवुडचे बिग बजेट चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे, हे थोडक्यात जाणून घेऊ.

पठाण (Pathan)

सिध्दार्थ आनंद दिग्दर्शित ‘पठाण’ हा चित्रपट 25 जानेवारी 2023 ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रमुख भुमिकेत शाहरूख खान, जॉन अब्राहिम व दिपिका पदुकोन झळकणार आहे. सध्या या चित्रपटाची खूप चर्चा सुरू आहे. यातील गाणीदेखील सुपरहीट होताना दिसत आहे. हा चित्रपट बिग बजेट असून, हा चित्रपट बनविण्यासाठी साधारण 250 कोटी खर्च करण्यात आले आहे.

Pathan
http://www.primenewslive.com/

कुत्ते (Kutte) 

2023 च्या सुरूवातीलाच बॉलिवुडचा पहिला चित्रपट ‘कुत्ते’ प्रदर्शित होणार आहे. 13 जानेवारी 2023 हा चित्रपट सिनेमागृहात पाहायला मिळेल. आसमान भारव्दाज दिग्दर्शित हा चित्रपट आहे. या चित्रपटात अर्जुन कपूर. तब्बू, कोंकणा सेन, नसीरुद्दीन शाह झळकणार आहे. हा चित्रपट बनविण्यासाठी जवळपास 25 करोड इतका खर्च आला.

kuttey
http://www.india.com/

मैदान (Maidan) 

बॉलिवुडचा सुपरस्टार अजय देवगणचा आगामी चित्रपट ‘मैदान’ हा आहे. हा चित्रपट 17 फेब्रुवारी 2023 ला प्रदर्शित होणार आहे. सैय्यद अब्दुल रहीम यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा असणार आहे. अमित शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट आहे. या चित्रपटाचेदेखील बजेट कोटींच्या घरात पोहोचले आहे.

Maidaan
http://www.amarujala.com/

सेल्फी (Selfie) 

24 फेब्रुवारी 2023 ला  ‘सेल्फी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. बॉलिवुडचा खिलाडी अक्षय कुमार आणि इमरान हाशमी हे या सिनेमात मुख्य भुमिकेत पाहायला मिळणार आहे. ही एक नवीन वर्षातील बिग बजेट फिल्म असणार आहे. हा चित्रपट तयार करण्यासाठी 100 करोडपेक्षा जास्त खर्च करण्यात आला आहे. 

Selfie
http://www.youtube.com/

किसी का भाई किसी की जान (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) 

बॉलिवुडचा दबंग सलमान खानचा आगामी चित्रपट 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने प्रतिक्षा करीत आहे. हा सिनेमा 21 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 300 करोडमध्ये तयार करण्यात आला आहे.

kiska bhai kisi jaan
http://www.youtube.com/