Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Price Of Pani Puri: हेल्थी पाणीपुरी खाण्याचा कल वाढत आहे, कितीला मिळते ही हेल्थी पाणीपुरी?

How much does healthy Panipuri cost

Price Of Pani Puri: पाणीपुरी हा चाटचा प्रकार अनेकांच्या आवडीचा आहे. मात्र तो तितकासा हेल्थी नाही, सध्या हेल्थी पुऱ्या बाजारात मोठ्या प्रमाणात मिळू लागल्याआहेत. तर काही पाणीपुरीची दुकाने हेल्थी पाणीपुरी विकू लागले आहेत. सध्या या पाणीपुरीची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे, तर जाणून घ्या हेल्थी पाणीपुरीबद्दल...

Price Of Pani Puri: पाणीपुरी कोणाला आवडत नाही? पाणीपुरीचे नाव काढले तरी तोंडाला पाणी सुटते. मात्र पाणी पुरीची पुरी ही मैद्याची बनवलेली असते. सध्या सर्वजण हेल्थकॉन्शिअस झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक पदार्थ खाताना विचारपूर्वक खाल्ला जात आहे. चीट डेला सर्वचजण, सगळ्याच पदार्थांवर ताव मारतात, पण इतर दिवशी खूप हेल्थचा विचार करून डाएट केले जाते, त्यामुळे हल्ली ऑफिसमध्ये डब्यातही सॅलेड, स्वीट, स्नॅक्स असे सगळेच नेले जाते. पण पाणीपुरी तर आवडते मग हेल्थी कशी करायची हा विचारही करण्याची गरज नाही, सध्या बाजारात एकसे एक हेल्थी पाणीपुरीचे पर्याय आलेले आहेत.

हेल्थी पाणीपुरीची किंमत किती? (How much does healthy Panipuri cost?)

हेल्थी आणि पाणीपुरी असा प्रश्न पडला असेल तर काळजी नसावी मॉल किंवा डिपार्टमेंटल स्टोअरमधील पाणीपुरी खायला गेलात तेथे असे पर्याय मिळू लागले आहेत. यात ज्वारीची, कणीक-रवा मिश्रित, नाचणीची, पालकची, बीटाची, सोयाबीनची आदी अशा विविध प्रकारच्या पाणीपुरीच्या पुऱ्या मिळतात. यात मैद्याचा वापर केलेला नसतो. तर हल्ली रस्त्यावरील दुकानावर मिळणाऱ्या पाणीपुरीमध्ये पॅक्ड ड्रिकिंग वॉटर वापरले जाते. तर पाणीपुरी वाढणारी व्यक्ती हातात फूडग्रेडचे गल्व्हज घालते, त्यामुळे आता पाणी पुरी हायजिनिक आणि हेल्थी झालेली आहे.

पाणीपुरीच्या या हेल्थी पुऱ्या कोणत्याही सुपरमार्केटमध्ये सहज उपलब्ध होतात. याची 50 पुऱ्यांची किंमत 80 रुपयांपासून सुरू होते. नाचणीच्या पुऱ्यांची किंमत सर्वाधिक 150 रुपये आहे. पाणीपुरीच्या मैद्याच्या पुऱ्यांची किंमत 1 रुपयाला 1 पुरी किंवा 50 पैशाला 1 पुरी असा हिशेब आहे, मात्र या पुऱ्यांची किंमत जास्त मात्र हेल्थी, ऑरगॅनिक अशी लेबल लागल्यामुळे आणि पुऱ्या नाचणी, ज्वारीच्या असल्यामुळे महाग आहेत. सर्व धान्यांमध्ये नाचणीची किंमत सर्वाधिक 80 ते 100 रुपये किलो आहे. त्यामुळे याच्या पुऱ्याही खूप महाग आहेत.

सुपरमार्केट किंवा डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये मिळणारी हेल्थी पाणीपुरी 100 रुपयाला एक प्लेट मिळते, ज्यात सहा पुऱ्या येतात. तर काही ठिकाणी याची किंमत 150 ते 200 रुपयांपर्यंत आहे. ताज महाल पॅलेसच्या सी लाऊंज रेस्टॉरंटमध्ये पाणी पुरी 750 रुपयांना मिळते.

मुंबईच्या पाणीपुरी गरम का असते? (Why is Panipuri hot in Mumbai?)

मुंबईत मिळते ती पाणीपुरी, कोलकात्याला मिळतो पुचका, दिल्लीत गोलगप्पा, युपी-बिहारमध्ये पानी के बत्ताशे, नॉर्थईस्टमध्ये फुलकी अशी अनेक नावे पाणीपुरीला आहेत. तसेच त्या - त्या प्रदेशानुसार पाणी पुरीची चवही बदलते, त्यातील सामग्री, पदार्थही बदलतात. मुंबईत पाणीपुरी मिळते ती मध्यप्रदेशसारखी, पुरी, त्यात गरम डाळ, दोन प्रकारच्या चटण्या असतात. मुंबईच्या वातावरणात पाणीपुरी खाऊन घसा खराब होऊ नये म्हणून येथे गरम पाणी पुरी खाण्याची प्रथा पडली, तर यातील चटण्या आणि त्यातील सामग्रीही पोट साफ करायला मदत करते, त्यामुळे स्वच्छ ठिकाणची पाणी पुरी कधीतरी खाण्यास हरकत नाही, असे आयुर्वेदीक वैद्या स्विटी पै यांनी सांगितले.