Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

डाएट किती महाग रे बाबा!

yoga day diet 2022

उत्तम योग, उत्तम स्वास्थ्य, उत्तम आरोग्य यासोबतच उत्तम आहार देखील महत्त्वाचा असतो. यासाठी आपण बराच वेळ आणि पैसा सुद्धा खर्च करतो. पण डाएटसाठी होणारा खर्च हा सगळ्यांसाठीच परवडणारा असेल असं नाही. म्हणून भारतीय आहारावर लक्ष केंद्रीत करून आपण योग्य तो आहार घ्यायला हवा..

जागतिक योग दिन दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येकजण योग (Yoga) करताना दिसतो. तथापि, आपण सर्वांनी योगासने आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनवला पाहिजे. या दिवसाचा उद्देश म्हणजे आध्यात्मिक आणि शारीरिक साधनेच्या फायद्यांबद्दल जागरूकता पसरवणे हा आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिन 2022 ची थीम काय आहे?

आंतरराष्ट्रीय योग दिन 2022 (International Yoga Day 2022) 'मानवतेसाठीचा योग' या थीमखाली साजरा केला जात आहे. युनायटेड नेशन्सचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस (António Guterres, United Nations Secretary-General) यांनी 2022 साठी त्यांच्या योग संदेशात म्हटले आहे की, या वर्षाची थीम प्रत्येकाला "योग खरोखर सार्वत्रिक कसा आहे" याची आठवण करून देते. कोविड-19 साथीच्या आजारादरम्यान योगाने लोकांना कशी मदत केली याबद्दल ते पुढे म्हणाले, “जगभरातील कोट्यवधी लोकांसाठी, कोविड-19 साथीच्या काळात योग ही एक अत्यावश्यक जीवनरेखा देखील आहे, ज्यामुळे सामाजिक आव्हानांचा सामना करण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे. 

उत्तम आरोग्य मिळवण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असतो. योग हा आपल्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण भाग आहे. योग्य केल्याने जीवनात अनेक फायदे होतच असतात पण सोबतच आपला आहार संतुलित केल्याने आपल्याला आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. आपण डॉक्टर, डाएटिशन यांचे सल्ले घेऊन डाएटची सुरूवात करतो. डाएटमध्ये समाविष्ट असलेले पाश्चात्य देशातील पदार्थ, भाज्या, रेडिमेड फूड यावर होणारा जास्तीचा खर्च, जास्तीचा लागणारा वेळ यामुळे आरोग्याकडे तसे पाहायला गेलं तर दुर्लक्षच करतो. 

पण आपण कधी हा विचार केलाय का की परदेशात पिकवल्या जाणाऱ्या भाज्या भारतात राहणाऱ्या व्यक्तीला कितपत सूट होऊ शकतात?

परदेशातील ब्रोकोली 100 ते 150 रुपये पाव किलो या दराने विकली जाते. ब्रोकोली रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवते, प्रतिकारशक्ती वाढवते आणि हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन देते. पण आपली फुलकोबी म्हणजे फ्लॉवर 50 ते 60 रुपये प्रति किलो दराने मिळते. फ्लॉवरमध्ये सुद्धा कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो. जो रक्तातील साखरेचे नियमन करण्यास मदत करतो. भारतातील हंगामानुसार पिकवल्या जाणाऱ्या भाज्यांचा फायदा भारतात राहणाऱ्या लोकांच्या आरोग्यावर लवकरात लवकर होतो.

परदेशी भाजी vs भारतीय भाजी                

Indian diet : yoga day 2022

परदेशातील भाज्या या भारतात उगवलेल्या भाज्यांच्याचेच एक वेगळे रूप असते. परदेशातील भाज्यांचे रंग, रूप आणि किंमत हे नेहमीच भारतीय बाजारात वरचढ ठरली आहे. त्या तुलनेत देशी भाज्यांमधून मिळणारी प्रथिने सारखीच असतात. भारतात मिळणारा फ्लॉवर आणि परदेशात आलेली ब्रोकोली दिसायला सारखीच पण रंगाने वेगळी तसेच चेरी टोमॅटो, रेड कॅबेज, बेल पेपर, झुचिनी, सेलरी या भाज्या परदेशातून इथे आल्या. भारतात यांना अनुक्रमे टोमॅटो, कोबी, शिमलामिरची, काकडी, हिरवा कांदा असे म्हणतात.

परदेशातून भारतात निर्यात केल्या जाणाऱ्या भाज्यांवर सरकार टॅक्स लावते. सोबतच व्यापारी डिलिव्हरी चार्ज,  पॅकेजिंग, लेबर चार्ज देखील लावतात. त्यामुळे 100 रूपयांची भाजी ग्राहकांना 200 रूपयांना विकली जाते. त्या तुलनेत भारतात पिकणाऱ्या भाज्या या  शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावल्या जातात. यामुळे भारतात पिकवली जाणारी भाजी ही स्वस्तात उपलब्ध होते. त्यामुळे समान पोषकद्रव्ये असलेली आणि तुलनेने स्वस्तात मिळणारी भाजी आपण आपल्या डाएटमध्ये घेऊ शकतो. यामुळे पैसे तर वाचतात. त्याबरोबर स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देखील होऊ शकते.

आपलं आरोग्य जपण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करत असतो. पण वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट कोसळले आहे. अशावेळी खर्चिक डाएटच्यानावाखाली भरमसाठ खर्च टाळून अस्सल देशी पर्यायांचा वापर करून आपले आरोग्य सुदृढ ठेवू शकतो.