Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

आर्थिक वर्ष संपत आलंय! अजूनही गुंतवणूक केली नसेल तर ‘हे’ जरूर वाचा!

आर्थिक वर्ष संपत आलंय! अजूनही गुंतवणूक केली नसेल तर ‘हे’ जरूर वाचा!

2021-22 हे आर्थिक वर्ष संपायला आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. टॅक्स बचतीसाठी सुरुवातीपासूनच गुंतवणूक करणे चांगले असते. तरीही अनेक जण शेवटच्या क्षणी टॅक्स वाचवण्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये पैसे गुंतवतात. अशा लोकांना गुंतवणुकीविषयी अधिक मार्गदर्शन करणारी माहिती आपल्यासाठी देत आहोत.

आर्थिक वर्ष 2021-2022 जवळजवळ आता संपत आले आहे. तुम्ही आता तुमचा टॅक्स वाचवण्याचे आणि तुमचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत असाल. तुमची ही गरज लक्षात घेऊन आम्ही तुमच्यासाठी तुमचे आर्थिक नियोजन अधिक सक्षम व्हावे यासाठी गुंतवणुकीच्या काही योजना घेऊन आलो आहोत. ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

फिक्स्ड् मॅच्युरिटी प्लॅनद्वारे (FMP) मिळवा इंडेक्सशनचे फायदे
तुम्हाला जर तुमच्या डेब्ट फंडाच्या सुरक्षिततेविषयी चिंता वाटत असेल तर तुम्ही फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन (FMP) निवडू शकता. क्लोज-एंडेड डेब्ट फंड एफएमपी योजना चांगला परतावा तर देतातच पण त्या डेब्ट फंडावरील व्याजदरातील चढ-उतारांमुळे उद्भवणारे धोके कमी करण्यास मदत ही करतात. साधारणपणे, फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅनमधून मिळणारा परतावा हा अल्प-मुदतीचा नफा म्हणून गणला जातो. इतर कोणत्याही डेब्ट योजनेतील परताव्या प्रमाणेच यावर टॅक्स आकारला जातो. पण जर तुम्ही तुमचा फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन किमान 3 वर्षे सुरू ठेवला तर तो दीर्घकालीन लाभ म्हणून गणला जातो आणि त्याच्यावर कमी टॅक्स आकारला जातो.

NPS आणि PPF मध्ये किमान गुंतवणूक करा 
नॅशनल पेन्शन योजना आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना या भारतातील सर्वांत लोकप्रिय बचत योजना आहेत. या योजनांमधून तुम्हाला निवृत्तीसाठी बचतीच्या संधी सोबतच टॅक्सची सवलत ही मिळते. PPF योजनेमधून 1.5 लाख रूपयांची टॅक्स सवलत मिळते. तर NPS च्या कलम 80CCD(1), 80CCD(2) आणि 80CCD(1B) द्वारे सुमारे 2 लाख रूपयांपर्यंतची सवलत मिळू शकते.

1 लाखाच्या आतील नफा बुक करा
तुम्ही जर दीर्घकालीन गुंतवणूकदार असाल तर तुम्ही स्टॉक आणि इक्विटीमध्ये गुंतवणूक करा. या गुंतवणुकीतून तुम्हाला जर एका आर्थिक वर्षात 1 लाखापर्यंत नफा मिळत असेल तर तुम्हाला त्यावर टॅक्स लागू शकतो. तो टाळण्यासाठी तुम्ही आर्थिक वर्षाच्या शेवटी 1 लाखाच्या आतील नफा प्राप्त करून घ्यावा आणि पुढील आर्थिक वर्षात पुन्हा नव्याने स्टॉक किंवा इक्विटीमध्ये गुंतवणूक करा.

मागील वर्षांची टॅक्स रिटर्न फाइल करा 
तुम्ही जर मागील आर्थिक वर्षातील टॅक्स रिटर्न भरले नसतील तर ते लगेच भरून टाका. अन्यथा तुम्हाला विविध अडचणींना सामोरे जावे लागेल. त्यासाठी दिलेल्या मुदतीत दंड भरून मागील वर्षांचे टॅक्स रिटर्न फाइल करून घ्या. यामुळे तुमचे बॅंकिंगचे व्यवहार सुरळीत होण्यास मदत होईल.

चांगले व्याजदर देणाऱ्या एफडी योजनांचा लाभ घ्या 
शेअर बाजारात वेगवेगळ्या घटनांमुळे जेव्हा अस्थिरता निर्माण होते. तेव्हा मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करून तुमची गुंतवणूक सुरक्षित करण्याची हीच योग्य वेळ असते. अशा वेळी चांगले व्याजदर देणाऱ्या फिक्सड् डिपॉझिट योजनांमध्ये पैसे गुंतवून त्याचा लाभ घ्यावा.