Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Jawan Box Office Collection: जवान चित्रपटाने अवघ्या 9 दिवसांत पार केला 700 कोटींचा टप्पा

Jawan Box Office Collection

Image Source : www.youtube.com

Jawan Box Office Collection: अभिनेता शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेल्या जवान चित्रपटाने एका आठवड्यात 468 कोटींचा तर 9 दिवसांत 700 कोटींचा टप्पा पार केला आहे.

Jawan Box Office Collection: मागील आठवड्यात 7 तारखेला भारतासह जगभरात रिलिज झालेल्या जवान चित्रपटाने बॉक्स ऑफिसमधून जबरदस्त गल्ला जमा केला आहे. या चित्रपटाने अवघ्या एका आठवड्यात 468 कोटी रुपये मिळवले होते. त्यानंतर आता 9 दिवसात 700 कोटी रुपयांचा पल्ला पार केला आहे.

जवान या चित्रपटामध्ये शाहरुख खानसोबत नयनतारा आणि विजय सेतुपती हे सुद्धा प्रमुख भूमिकेत आहेत. याशिवाय दिपिका पदुकोण, संजय दत्त, गिरिजा ओक, सुनील ग्रोव्हर हे सुद्धा आहेत. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर याच्या पहिल्या आठवड्यातील रविवारी याचने जवळपास 81 कोटी रुपयांची कमाई केली होती. पहिल्या आठवड्यातील रविवारची ही सर्वाधिक कमाई मानली जाते.

शाहरुखचा जवान रिलिज होण्यापूर्वी बॉक्स ऑफिसवर सनी देओलच्या गदर 2 चित्रपटाची जोरदार कमाई चालली होती. या चित्रपटाने कमाईचा नवीन रेकॉर्ड केला आहे. पण गदर 2 चित्रपट बनवण्यासाठी अवघा 60 कोटी रुपये खर्च आला होता आणि या चित्रपटाने 500 कोटींपेक्षा अधिक कमाई केली. तर जवान चित्रपटासाठी 200 कोटींच्या आसपास खर्च आल्याचे सांगितले जाते आणि या चित्रपटाने आतापर्यंत 700 कोटींची गल्ला मिळवला आहे. नवीन चित्रपट रिलिज होईपर्यंत याची धामधूम अशीच चालू राहणार यात शंका नाही.

जवान चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तमिळ आणि तेलुगुमध्येही प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक अॅटली यांनी केले आहे. त्याचबरोबर या चित्रपटामध्ये साऊथचा हिरो विजय सेतुपती हा सुद्धा आहे. त्यामुळे साऊथमध्येही याला चांगले यश मिळत असल्याचे दिसून येते.