केरळमधली गो ईसी ऑटोटेक प्रायव्हेट लिमिटेड (GO EC Autotech Pvt Ltd) या स्टार्टअप कंपनीनं इलेक्ट्रिक वाहन खरेदीदारांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. देशभरात 1000 इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन (Super fast charging stations) उभारण्याचा निर्णय घेतला आहे, असं कंपनीनं जाहीर केलं आहे. सध्या कंपनीचे केरळमध्ये (Kerala) 70 चार्जिंग स्टेशन्स कार्यरत आहेत. तर देशभरात 33 चार्जिंग स्टेशन आहेत. 33 चार्जिंग स्टेशन्सनंतर आता कंपनीची 1000 चार्जिंग स्टेशन्स उभे करण्याचं नियोजन आहे. इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी ही एक मोठी दिलासा देणारी बाब आहे.
Table of contents [Show]
कोणत्या शहरांत सुविधा?
कंपनीनं यासंदर्भात एक निवेदन दिलं आहे. त्यात म्हटलं आहे, की नव्या प्रोजेक्ट्ससह कंपनी राजधानी, राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गावर टप्प्याटप्प्यानं विस्तार करणार आहे. देशातल्या टियर-2 आणि टियर-3 शहरं आणि ग्रामीण भागात चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचं कंपनीनं ठरवलं आहे. यासंदर्भातली घोषणादेखील केली आहे.
शंभराहून अधिक स्टेशन्स कार्यरत
कंपनीचं लक्ष रिमोट लोकेशन लोकांच्या गरजा पूर्ण करण्यावर आहे. कंपनीच्या नव्या घोषणेमुळे लोकांना इलेक्ट्रिक वाहनं स्वीकारणं अधिक सोपं होणार आहे. कंपनीनं देशात आधीच 103 चार्जिंग स्टेशन इन्स्टॉल केली आहेत.
Kerala-based start-up GO EC Autotech Pvt Ltd has announced the installation of 1,000 electric vehicle (EV) super-fast charging stations across the country.https://t.co/ficJKvQRUC
— HT Auto (@HTAutotweets) June 26, 2023
इलेक्ट्रिक वाहनांच्या प्रचारावर भर
गो ईसीचे कार्यकारी संचालक आणि सीईओ पीजी रामनाथ यांनी कंपनीच्या या घोषणेवर सांगितलं, की कंपनीचं ध्येय सस्टेनेबल चार्जिंग सोल्यूशन्स देणं हे आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहन वापरणाऱ्यांना सुलभता देईल, प्रोत्साहन मिळेल. याशिवाय हरित भविष्याचाही प्रचार करायचा आहे.
वाहन खरेदीदारांची अडचण दूर करण्याचा प्रयत्न
चार्जिंग वाहन खरेदीदारांना कमी चार्जिंग स्टेशन्समुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. चार्जिंग स्टेशनची संख्या कमी असल्यानं इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्यांना लांबचं अंतर कापणं ही मोठी अडचण असते. याच बाबींचा आम्ही विचार केला आणि या समस्येवर मात करण्यासाठी कंपनीनं 1000 इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स बसवण्याची घोषणा केली आहे, असं सांगण्यात आलं आहे.
सरकारकडून प्रोत्साहन
इलेक्ट्रिक वाहन वापरणाऱ्यांसाठी अडचण येवू नये म्हणून सरकारकडूनही या चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासंबंधी योजना सुरू करण्यात येत आहेत. फेम योजनेअंतर्गत चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी निधी दिला जाणार आहे. तेल कंपन्यांना हा निधी दिला जाणार आहे. या माध्यमातून 1000 स्टेशन्स उभारण्याचं लक्ष्य असणार आहे.