Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ashneer Grover New Show : शार्क टॅंक इंडियामधून हकालपट्टी करण्यात आलेल्या जजची ‘या’ शो मध्ये एन्ट्री

Ashneer Grover New Show

Shark Tank India 2: शार्क टँक इंडिया हा शो नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवडयात सुरू होत आहे. मात्र या शो मधून हकालपट्टी करण्यात आलेल्या अश्नीर ग्रोव्हर आता एका नवीन शोसह टी.व्ही वर पुन्हा झळकणार आहे. स्वत: अश्नीर यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे.

Shark Tank India 2 : भारत पे (Bhart Pay) चे  माजी एमडी अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) यांना शार्क टँक इंडियाच्या दुसऱ्या सत्रातून वगळण्यात आले आहे. सीझन 1  मध्ये शार्क टँक इंडियाचे जज अश्नीर ग्रोवर खूप चर्चेत आले होते, त्यांचे डायलॉग्सही खूप लोकप्रिय झाले होते, पण भारत पे यांच्याशी झालेल्या वादानंतर त्यांना दुसऱ्या सीझनमध्ये शो मधून बाहेर ठेवण्यात आले आहे. आता अश्नीरने नवीन शो सह टीव्हीवर धमाकेदार एंट्री केली आहे. त्यांच्या या नवीन शो बाबत जाणून घेऊ.

अश्नीर ग्रोवर चा नवीन शो

शार्क टँक इंडियामधून बाहेर काढलेला अश्नीर ग्रोव्हर नवीन शोद्वारे धमाका करत आहे. अश्नीर ग्रोव्हर आता ‘टीव्हीएफ पिचर्स’ या लोकप्रिय मालिकेच्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसत आहे. TVF पिचर्सचा नवीन सीझन 23 डिसेंबर रोजी सुरू झाला. ज्यामध्ये अश्नीर ग्रोव्हर मुख्य भूमिकेत आहे. तत्पूर्वी, स्वत: अश्नीर ग्रोव्हरने ट्विट करून ट्रेलर अतिशय मजेशीर पद्धतीने शेअर केला होता. त्यांनी लिहिले 'जब तक है ग्रोवर, इट्स नॉट ओवर!

दोगलापन पुस्तकामुळे चर्चेत

शार्क टँक इंडिया सोनी टीव्हीवर येत आहे, तर त्याच्याशी स्पर्धा करण्यासाठी अश्नीर ग्रोव्हरचा शो Zee5 वर प्रसारित केला जात आहे. अशनीर सध्या त्याच्या 'दोगलापन' या पुस्तकामुळे खूप चर्चेत आहे. त्यांच्या पुस्तकाबद्दल वेगवेगळ्या प्रकारे ट्विट करत आहेत. अश्नीर त्याच्या वन-लाइनर्समुळे लोकप्रिय झाला आहे. शार्क टँक इंडियानंतर अश्नीर आता टीव्हीएफ पिचर्समध्ये झळकत आहे. 23 डिसेंबरपासून सुरू झालेल्या, या शोमध्ये स्टार्टअप्स स्वतःहून निधीसाठी प्रयत्न करताना दिसतील. या शोमध्ये अश्नीर ग्रोव्हरच्या एंट्रीमुळे शो ची क्रेझ वाढली आहे.