Paid Stamp Duty Of Apartment : Eternal Sunshine Production Pvt Ltd या प्रोडक्शन हाऊसने मुंबईतील पाली हिल येथे घेतलेल्या अपार्टमेंटची किंमत 37 कोटी 80 लाख रुपये आहे. आलियाने भट्टच्या प्रोडक्शन हाऊसने हे अपार्टमेंट घेतले आहे. हे अपार्टमेंट 2,497 चौरस फुटांचे आहे. एरियल व्ह्यू कोऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी, वांद्रे पश्चिम येथे हे अपार्टमेंट आहे. आलियाच्या प्रोडक्शन हाऊसने केलेला हा सौदा सगळ्यात महागड्या अपार्टमेंट पैकी एक होता. हे एक रहीवासी अपार्टमेंट आहे.
बहीणीला दिले दोन अपार्टमेंट गिफ्ट
Eternal Sunshine Production Pvt Ltd या प्रोडक्शन हाऊसने हे अपार्टमेंट गोल्ड स्ट्रीट मर्कंटाइल कंपनी प्रायव्हेट लिमिटेडकडून खरेदी केले आहे. तर या अपार्टमेंटचे मुद्रांक शुल्क (Stamp Duty) 2 कोटी 26 लाख रुपये भरले आहे. तर याच अपार्टमेंटची रजिस्ट्री झाली, त्याच दिवशी आलियाने तिची बहीण शाहीन भट्टला मुंबई मध्येच दोन आपार्टमेंट गिफ्ट केले. प्राप्त माहितीनुसार, या दोन आपार्टमेंटची किंमतही जवळपास 7 कोटी 68 लाख रुपये आहे.
आलियाकडे एकूण 299 कोटीची संपत्ती
आलियाची कानपूर समर्थित D2C वेलनेस कंपनी नावाच्या ब्रँडमध्ये गुंतवणूक आहे. ती Nykaa मधील सुरुवातीच्या गुंतवणूकदारांपैकी एक आहे, ज्यामधून तिने प्रचंड नफा मिळविला. तिने तिच्या स्व कमाईने एकुण 299 कोटी रुपयांची संपत्ती जमविली आहे. तसेच आलिया कडे BMW 7, Audi A6, Audi Q7 आणि रेंज रोव्हर वोगसह अनेक अशी वाहने आहेत, ज्याची एकुण अंदाजे किंमत 3 कोटी रुपये आहे. करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयरमधून पदार्पण केल्यानंतर आलिया भट्टच्या करिअरने प्रचंड जोर धरला. तिचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाले. आता परत तिचा एक रणवीर सिंगसोबतचा चित्रपट येणार आहे.