Table of contents [Show]
ग्राहकांना मनस्ताप
नेटवर्क आउटेजची समस्या ही ग्राहकांना अनेकवेळा सहन करावी लागते. विशेषत: प्रवासात असताना. त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीच्यावेळीदेखील नेटवर्क गायब होत असते. दूरसंचार कंपन्यांकडून कधीकधी तांत्रिक व्यवस्था कोलमडून गेलेली असते. अशावेळी दूरसंचार कंपन्या भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायकडे (TRAI) धाव घेत नाहीत. दूरसंचार कंपन्या अशाप्रकारे ट्रायला माहिती देत नाहीत. तर नेटवर्क आउटेजचा संबंधित व्यक्तीला मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. आता मात्र ट्रायनं निर्देश जारी केले आहेत. तांत्रिक, नैसर्गिक किंवा इतर कोणत्याही कारणानं नेटवर्क आउटेज झाल्यास दूरसंचार सेवा प्रदात्यांनी ट्रायला याची माहिती द्यावी, असे सांगण्यात आले आहे.
गुणवत्तेवर परिणाम
वारंवार नेटवर्क आउटेज उपलब्धतेवर किंवा गुणवत्तेवर विपरित परिणाम करीत असतात. सीमा त्याचप्रमाणे डोंगराळ भागात, बोगदा अशा आडमार्गावर नेटवर्कची समस्या ही आता सामान्य झालीय. मात्र यामुळे ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. कधी कधी नैसर्गिक असं कोणतंही कारण नसतं. मात्र नेटवर्क कोलमडतं. नियामक प्राधिकरणानं अशा मोठ्या नेटवर्क आउटेजचं मूळ कारण समजून घेण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी आणि सेवा प्रदात्यांना विस्तारित स्थानिक प्राधिकरणांकडून संबंधित समर्थन मिळविण्यासाठी जिल्हा स्तरावर अशा कोणत्याही आउटेजची माहिती संकलित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दीर्घकाळासाठी नेटवर्कची समस्या असेल तर स्थानिक प्राधिकरणाकडून, जिल्हा स्तरावर काही सहाय्य घेता येवू शकते. त्यासंबंधीची माहिती ट्रायकडून घेतली जात आहे.
प्रेस विज्ञप्ति सं0 29/2023 दूरसंचार सेवा प्रदाताओं (टीएसपी) को प्रमुख नेटवर्क आउटेज रिपोर्ट ट्राई को देने के संबंध में निर्देश
— TRAI (@TRAI) March 28, 2023
PR No. 29/2023 regarding directions to All Telecom Service Providers (TSPs) to report major network outages to TRAI https://t.co/N1LPbPR6MQ...
काय निर्देश?
- सलग चार तासांहून अधिक काळ जर नेटवर्क गायब होत असेल तर अशावेळी 24 तासांच्या आत यासंबंधी ट्रायला माहिती द्यावी.
- जास्त प्रमाणात नेटवर्क आउटेज होत असेल तर त्याचं मूळ कारण आणि त्याबाबत केलेली सुधारात्मक कृती याबाबतची माहिती 72 तासांच्या आत द्यावी
- हा निर्देश तत्काळ लागू होणार, प्रसिद्धीपत्रकात नमूद...
स्पॅम कॉलचा घेतला होता निर्णय
अनावश्यक कॉल्समुळे ग्राहकांना होत असलेल्या त्रासाची दखल ट्रायनं घेतली. नेटवर्कवरच असले अनवॉन्टेड कॉल ब्लॉक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी मुदतही देण्यात आलीय. आर्टिफिशिअल इन्टेलिजन्सच्या माध्यमातून स्पॅम फिल्टर बसवले जाणार आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर कॉल येण्याच्या आधीच तो ब्लॉक केला जाणार आहे. अनेकवेळा व्यावसायिक कारणांसाठी असे कॉल्स येत असतात. त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर स्पॅम कॉल्स ब्लॉक होणार आहेत. 1 मेपासून ही सेवा सुरू होणार आहे. सध्या जे बँका, विविध आस्थापना कॉल करतात, त्यांना स्वतंत्र क्रमांकाची सिरीज दिली जाणार आहे. त्यामुळे त्रासदायक ठरणारे आणि गरजेचे कॉल्स समजणं कठीण होणार नाही.