Mention Your Foreign Income In ITR: इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी अंतिम तारीख जवळ आली आहे. अशावेळी योग्य उत्पन्न दाखवून त्यावर कर भरणे गरजेचे आहे. लोकांचे अनेक प्रकारचे उत्पन्न असते. काही लोक देशात राहून कमावतात, तर काही परदेशात नोकरी करून पैसे कमवतात. असे बरेच लोक आहेत जे काही काळ भारतात काम करतात आणि चांगली ऑफर मिळाल्यावर परदेशात जातात. त्यांच्यासमोर एक समस्या आहे की, आयकर भरायचा की नाही? भरायचाच असेल तर भरायचा कसा? कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात? तेव्हा अशा नागरिकांची समस्या दूर करण्यास जाणून घेऊया काही माहिती.
Table of contents [Show]
काय आहेत नियम?
तुम्ही आर्थिक वर्षात 182 दिवस देशात (भारत) राहिल्यास, तुम्हाला निवासी समजले जाते. रहिवासी भारतीयाचे जागतिक उत्पन्न म्हणजे जगभरातील उत्पन्न कराच्या कक्षेत येते. जर तुम्ही भारतीय नागरिक असाल, तर तुमची कमाई देशात आणि परदेशात करपात्र असेल. भारतात नोकरी करणाऱ्या व्यक्तीला लागू असलेले समान आयकर दर त्या व्यक्तीलाही लागू होतात.
दुहेरी कराचा लाभ घेऊ शकता
तर परदेशात मिळणारा पगार प्रमुख उत्पन्नात दाखवावा लागतो. तुम्हाला परकीय चलनात मिळणारा पगार रुपयात रूपांतरित करावा लागेल. ज्या कंपनीत तुम्ही नोकरी करीत होतात, तिथला तपशील द्यावा लागेल. जर या पगारावर कोणत्याही प्रकारचा कर कापला गेला असेल, तर तुम्ही रिटर्नमध्ये दाखवून टॅक्स क्रेडिटचा दावा करू शकता. दुहेरी कर टाळण्याचा करार (DTAA) चा लाभ घेऊन तुम्ही दुहेरी कर टाळू शकता. तुम्ही काम करत असलेल्या देशासोबत Double Taxation Avoidance Agreement नसेल, तर कलम 91 अंतर्गत दिलासा मिळू शकतो.
परदेशातील खात्याची माहिती द्या
जर तुम्ही 80C किंवा 80D अंतर्गत कोणतीही गुंतवणूक केली असेल, तर तुम्ही कर सूट घेऊ शकता. तुम्ही येथे परदेशात मिळालेल्या सवलतीचा वापर करू शकणार नाही. परदेशात कमाई केल्यावर, तुम्हाला आयकर रिटर्नमध्ये एफए म्हणजेच विदेशी मालमत्तेची माहिती द्यावी लागेल. परदेशात तुमची कोणतीही मालमत्ता किंवा बँक खाते असल्यास त्याची योग्य माहिती आयकर विभागाला द्या.
काय सांगते आयकर विभाग?
या संदर्भात आयकर विभागाने पुन्हा सर्व करदात्यांना सतर्क केले आहे. विभागाने अलीकडील ट्विटमध्ये म्हटले आहे की, ज्या करदात्यांचे देशाबाहेर बँक खाते आहे किंवा इतर कोणतीही मालमत्ता किंवा उत्पन्न आहे, त्यांनी आर्थिक वर्ष 2023-24 साठी आयकर रिटर्न भरताना परदेशी मालमत्ता शेड्यूल भरणे आवश्यक आहे. अशा प्रकरणांमध्ये करदात्यांनी त्यांच्या सर्व परदेशी मालमत्ता आणि उत्पन्नाचे स्रोत घोषित केले आहेत की नाही, याची खात्री करावी.
होऊ शकते 10 लाखाचा दंड
जर करदात्याला परदेशातील उत्पन्नाची योग्य माहिती दिली नाही. तर आयकर विभाग त्याच्यावर कारवाई करू शकतो. विभागाचे म्हणणे आहे की, अशा प्रकरणांमध्ये काळा पैसा (अघोषित विदेशी उत्पन्न आणि मालमत्ता) आणि कर कायदा 2015 अंतर्गत 10 लाख रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो.