Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

पगारदार कर्मचाऱ्यांसाठी टॅक्स बचतीचे पर्याय

पगारदार कर्मचाऱ्यांसाठी टॅक्स बचतीचे पर्याय

तुम्ही पगारदार कर्मचारी असाल तर या पर्यायांचा वापर करून टॅक्समध्ये सवलत मिळवू शकता. काय आहेत हे पर्याय त्याबद्दल अधिक जाणून घेऊया.

तुम्ही जर पगारदार कर्मचारी आहात तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. प्रत्येक महिन्याला आपल्या हाती पगार येतो. पण या पगाराचे आपण आर्थिकदृष्ट्या योग्यप्रकारे नियोजन केले नाही तर वर्षाच्या शेवटी तुम्हाला नियोजित उत्त्पन्नापेक्षा अधिक उत्पन्न स्वीकारल्याबद्दल सरकारला टॅक्स द्यावा लागेल. टॅक्स भरणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहेच. पण योग्य पद्धतीने टॅक्स वाचवणे हा प्रत्येकाचा अधिकार ही आहे. यासाठी आलेल्या पगारामधून योग्यप्रकारे गुंतवणूक करून त्याचा निवृत्तीवेतन म्हणून वापर करता येऊ शकतो. चला तर गुंतवणुकीच्या अशाच उपयुक्त योजनांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड (EPF)
भारतातील ही सर्वात लोकप्रिय टॅक्स बचत योजना आहे. या योजनेतील निधीमध्ये कंपनी आणि कर्मचारी असे दोघांचेही योगदान असते. कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यात जमा झालेल्या पैशांवर आणि त्याद्वारे मिळणाऱ्या व्याजावर कोणताही टॅक्स आकारला जात नाही.

पीपीएफ (Public Provident Fund)
पीपीएप ला सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणतात. पगारदार लोक पीपीएफमध्ये गुंतवणूक करून टॅक्स वाचवू शकतात. या योजनेतून गुंतवणुकीसह बचत करण्याचा पर्याय मिळतो. नोकरीतून रिटायर झाल्यानंतर निवृत्तीच्यावेळी पीपीएफकडून गॅरेंटेड रिटर्न मिळतात. पीपीएफ हा EEE (Exempt-Exempt-Exempt) प्रकारात येतो. म्हणजेच या योजनेतील मूळ रक्कम, त्यावर मिळणारे व्याज आणि त्यातून पैसे काढल्यावर कोणताही टॅक्स भरावा लागत नाही.

ईएलएसएस (Equity Linked Saving Scheme)
ELSS ही इक्विटीशी संबंधित बचत योजना आहे. पगारदार कर्मचाऱ्यांसाठी टॅक्स वाचविण्याचा आणि बचतीचा हा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. आपण पगारदार कर्मचारी असाल तर आपल्या पगाराच्या करपात्र उत्पन्नास 80C अंतर्गत सूट देण्यात आली आहे. या अंतर्गत गुंतवलेल्या पैशांवर कर आकारला जात नाही. जर या योजनेतून मिळणारा परतावा 1 लाख रुपयांपेक्षा अधिल असेल तर त्यावर 10 टक्के टॅक्स लागू होतो.

एनपीएस (National Pension System)
राष्ट्रीय बचत योजना म्हणजेच एनपीएस ही एक दीर्घकालीन बचत योजना आहे. ज्यांना नोकरीतून लवकर सेवानिवृत्ती घ्यायची आहे ते या योजनेत गुंतवणूक करू शकतात. एनपीएस योजना पीपीएफ आणि एफडी पेक्षा जास्त परतावा देते. एनपीएस अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतची करात सवलत मिळते.

टॅक्स बचत एफडी (Tax Saving FD)
टॅक्स सेव्हिंग फिक्स्ड डिपॉझिट एफडीमध्ये गुंतवणूक करून पैसे ही वाचवू शकता आणि भविष्यासाठी मोठा कॉर्पस फंड देखील तयार करू शकता. ही एक प्रकारची एफडी योजना आहे. या अंतर्गत 1.5 लाख रुपयांची करात सवलत मिळते. पगारदार कर्मचाऱ्यांसाठी 5 वर्षांची टॅक्स बचत एफडी सर्वोत्तम मानली जाते. यामध्ये गुंतवलेल्या पैशांवर टॅक्समध्ये सूट मिळते.

जीवन विमा (Life Insurance)
पगारदार कर्मचारी जीवन विमा घेऊन टॅक्स वाचवू शकतात. यामध्ये विमा संरक्षणासह टॅक्स बचतीची संधी आहे. इन्कम टॅक्स कलम 80C अंतर्गत जीवन विमा पॉलिसीच्या प्रीमियमवर टॅक्स सवलत मिळते. ही रक्कम जास्तीत जास्त 1.5 लाखापर्यंत असू शकते. सर्व्हायवल बेनिफिट (Survival Benefit) आणि डेथ बेनिफिट (Death Benefit) च्या रुपात मिळालेले पैसेही टॅक्स फ्री असतात.

आरोग्य विमा (Health Insurance)
पगारदार कर्मचाऱ्याने स्वत:साठी किंवा कुटुंबासाठी आरोग्य विमा काढला असेल तर त्या विम्याच्या प्रीमियमवर कोणताही टॅक्स लागत नाही. यामुळे कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला विमा संरक्षण आणि त्याला टॅक्समध्ये सवलत मिळते.

घरभाडे भत्ता (House Rent Allowance)
पगारदार कर्मचारी भाड्याच्या घरात राहत असेल तर घरमालकाला दिल्या जाणाऱ्या भाड्यावर टॅक्स सवलत मिळते. घरभाडे भत्ता हा कर्मचाऱ्याच्या पगाराचा एक भाग आहे. ज्यावर पूर्णणे टॅक्स लावला जात नाही. पण जर कर्मचारी स्वत: च्या घरात राहून कंपनीकडून घरभाडे भत्ता घेत असेल तर त्याला कोणत्याही प्रकारची टॅक्स सवलत मिळत नाही.

प्रवास भत्ता (Travelling Allowance)
पगारदार कर्मचाऱ्यांना प्रवास भत्ता मिळतो. कर्मचाऱ्याला देशांतर्गत प्रवासाच्या खर्चावर टॅक्स सवलत मिळू शकते. कर्मचाऱ्याने बस किंवा रेल्वेने प्रवास केला असेल तरच त्याला याचा लाभ घेता येतो.