• 31 Mar, 2023 08:55

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tax Saving Ideas: तुम्ही घर भाड्याने दिले असेल तर भाड्याच्या उत्पन्नावरही होऊ शकते कर बचत!

Income Tax On Rental House

Income Tax on Rental House: जर तुम्ही योग्य कर नियोजन केले नाही, तर घर भाड्याच्या (House Rent) उत्पन्नाचा मोठा भाग कर (Tax) म्हणून भरावा लागू शकतो. लोकांनी घराच्या मालमत्तेत किंवा जमिनीत गुंतवणूक करावी यासाठी सरकार विशेष सवलत प्रदान करते. जाणून घेऊया कशी होते भाड्याच्या उत्पन्नावर कर बचत.

जर तुम्ही भाड्याच्या (House Rent) घरातून उत्पन्न मिळवत असाल, तर तुम्हाला त्या भाड्याच्या उत्पन्नावर कर भरावा लागेल. भाड्याच्या उत्पन्नावरील कर इतर उत्पन्नाप्रमाणे आकारला जातो. कर मर्यादेतील कुठल्याही उत्पन्नावर कर भरावा लागतो. भाड्याचे उत्पन्न म्हणजे घर, मालमत्ता किंवा भाड्याने दिलेली जमीन यातून मिळणारे उत्पन्न करपात्र उत्पन्नाच्या कक्षेत येते, ज्याची इन्कम टॅक्स कायदा, 1961 च्या कलम 24 (Section 24) मध्ये तरतूद आहे. जर तुम्ही घर भाड्यातून उत्पन्न मिळवत असाल तर तुम्ही नियमांच्या कक्षेत राहून त्यातून टॅक्स सवलत मिळवू शकता, कसे ते जाणून घेऊया.

भाडे उत्पन्नावर कर गणना कशी केली जाते (How Tax Calculated on Rental Income?)

घर भाड्याच्‍या मिळकतीवरील टॅक्सची गणना ही नगरपालिका कर, गृहकर्जाचे व्‍याज यानुसार केली जाते. घर भाड्याने दिले जाते तेव्हा फक्त घर भाड्यातून मिळणारे उत्पन्न फक्त मोजले जाते. भाडेकरुने काही कारणास्तव भाडे दिले नाही किंवा खोली रिकामी केली तर घरमालकाला या कालावधीसाठी कर भरावा लागत नाही. तसेच, भाड्यातून मिळणारे तुमचे करपात्र उत्पन्न 2.5 लाख (नवीन कर प्रणालीनूसार 3 लाख) पेक्षा कमी असल्यास तुम्हाला यावेळी कर भरावा लागणार नाही. घर भाड्यात जर मेंटेनन्स शुल्क जोडले असेल तर ते तुमच्या उत्पन्नातही जोडले जाते. भाडेकरूच्या करारात याची नोंद करून टॅक्समध्ये सवलत मिळवता येऊ शकते.

गृहकर्जावर कर सवलत (Tax Exemption on Home Loan)

तुम्हाला गृहकर्जावर 2 लाखांपर्यंत कर सवलत मिळते. जर तुम्ही गृहकर्ज घेऊन घर विकत घेतले असेल आणि नंतर ते भाड्याने दिले असेल तर तुम्हाला कलम 24 (b) अंतर्गत त्यावर भरलेल्या व्याजावर देखील 2 लाखांपर्यंत कर सूट मिळते. जर तुम्ही कलम 80EEA अंतर्गत नियमांनूसार पात्र असाल तर तुम्हाला 1.5 लाखांचा स्वतंत्र कर लाभ मिळू शकतो. 

नगरपालिका कर कपात (Municipal Tax Deduction)

तुमच्याकडे सांडपाणी कर, भाड्याच्या उत्पन्नावरील करातून मालमत्ता कर यांसारखे नगरपालिका कर वजा करून प्राप्तिकर मूल्य कमी करण्याचा पर्याय देखील आहे. अनेकांना याबाबत माहिती नसते. नगरपालिका ही वर्षभरात उपलब्ध करून देण्यात आलेल्या अनेक सेवांवर कर आकारत असते. नगरपालिकेत अशी नोंद केल्यास कर कपात होईल.