Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tata Technologies IPO : टाटा टेक आयपीओची तयारी सुरू!

Tata Technologies IPO

Image Source : www.telugu.abplive.com

आयपीओवर नजर असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच आणखी एक आयपीओ (IPO) बाजारात दाखर होणार आहे. जवळपास 18 वर्षांनंतर टाटा समूह आयपीओ बाजारात उतरणार आहे. त्याबद्दल माहिती घेऊया.

टाटा समूहाने (TATA Group) ग्रुप कंपनी टाटा टेक्नॉलॉजीजची स्टॉक एक्स्चेंजवर लिस्टिंगची तयारी वेगवान केली आहे. टाटा समूह टाटा टेकच्या आयपीओची (Tata Technologies IPO) प्रक्रिया पार पाडण्यात व्यस्त आहे. कंपनी आयपीओ (IPO) च्या माध्यमातून बाजारातून 3500 ते 4000 कोटी रुपये उभे करू शकते. आयपीओ आणण्यासाठी कंपनीने दोन सल्लागारांची नियुक्ती केली असून तिसर्‍याची नियुक्ती करण्याची तयारी सुरू आहे.

योग्य वेळी आयपीओ आणणार

डिसेंबरमध्ये मूळ कंपनी टाटा मोटर्सने आयपीओद्वारे टाटा टेक्नॉलॉजीजमधील स्टेक विकण्यास मान्यता दिली होती. रेग्युलेटरी फाइलिंगमध्ये, टाटा मोटर्सने एक्सचेंजला सांगितले की टाटा टेकचा आयपीओ सर्व मंजूरी आणि नियामक मंजुरी मिळाल्यानंतर योग्य वेळी आणले जाईल. टाटा टेक्नॉलॉजीजमध्ये टाटा मोटर्सचा 74.42 टक्के हिस्सा आहे. या व्यतिरिक्त, टाटा कॅपिटल अॅडव्हायझर्सद्वारे व्यवस्थापित केलेली सिंगापूरस्थित गुंतवणूक कंपनी अल्फा टीसी होल्डिंग्स पीटीई लिमिटेड कडे 8.96 टक्के, तर टाटा कॅपिटल ग्रोथ कडे 4.48 टक्के हिस्सा आहे. याशिवाय टाटा मोटर्स फायनान्स, टाटा एंटरप्रायझेस ओव्हरसीज, रतन टाटा आणि एस रामादोराई यांच्याकडेही कंपनीचे शेअर्स आहेत.

टाटा टेक्नॉलॉजीजची आर्थिक स्थिती

टाटा टेक्नॉलॉजीज, 1989 मध्ये स्थापित, ऑटोमोटिव्ह, एरोस्पेस, औद्योगिक यंत्रसामग्री आणि संबंधित क्षेत्रांमध्ये उपस्थिती असलेली एक अभियांत्रिकी डिझाइन आणि तंत्रज्ञान सेवा कंपनी आहे. कंपनीचे संपूर्ण युरोप, उत्तर अमेरिका आणि आशिया-पॅसिफिकमध्ये एकूण 9300 कर्मचारी आहेत. तसे, आयपीओ येण्याआधी, टाटा टेक्नॉलॉजीजच्या स्टॉकमध्ये लिस्टिंग न होता प्रचंड तेजी आहे. अनलिस्टेड मार्केटमध्ये टाटा टेक्नॉलॉजीजच्या शेअर्समध्ये मोठी उसळी आली आहे. जेव्हापासून टाटा मोटर्सने टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओला मान्यता दिली आहे, तेव्हापासून अनलिस्टेड मार्केटमध्ये स्टॉक वाढत आहे. टाटा टेक्नॉलॉजीजच्या आर्थिक निकालांवर नजर टाकल्यास, 2021-22 मध्ये कंपनीचा महसूल 3529.6 कोटी रुपये होता. ज्यावर 645.6 कोटी रुपयांचा ऑपरेटिव्ह नफा आणि 437 कोटी रुपयांचा नफा झाला.

18 वर्षांपूर्वी आला होता आयपीओ

टाटा समूहाने बराच काळ बाजारात कोणताही आयपीओ आणलेला नाही. देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चा आयपीओ 18 वर्षांपूर्वी आला होता. तेव्हा रतन टाटा समूहाचे अध्यक्ष होते. पण एन चंद्रशेखरन टाटा सन्सचे अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच टाटा समूहाच्या कंपनीचा आयपीओ येणार आहे.