Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IPO : फेब्रुवारी 2023 मध्ये, या कंपन्यांसाठी आयपीओ लॉन्च करण्याची अंतिम मुदत संपणार!

IPO

2023 मध्ये शेअर बाजारात (Share Market) प्रचंड चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अशा स्थितीत कंपन्या आता आयपीओ आणण्यापासून टाळाटाळ करत आहेत.

2023 मध्ये शेअर बाजारात (Share Market) प्रचंड चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अशा स्थितीत कंपन्या आता आयपीओ आणण्यापासून टाळाटाळ करत आहेत. कंपन्यांना भीती वाटत होती की त्यांचा (IPO – Innitial Public Offering) गुंतवणूकदारांनी नाकारला तर, IPO ला हलका प्रतिसाद मिळेल. यामुळेच शेअर बाजार नियामक सेबीकडून मंजुरी मिळूनही कंपन्या IPO आणण्याचा निर्णय घेताना दिसत नाही आहेत.

आयपीओ लॉंच न केल्यास काय होते?

गेल्या सहा महिन्यांत सेबी (SEBI – Securities and Exchange Board of India) कडून मंजुरी मिळूनही 27 कंपन्या बाजाराच्या खराब मूडमुळे आयपीओ आणू शकल्या नाहीत. सेबीकडून या कंपन्यांना मिळालेली मान्यता रद्द झाली. पुढील महिन्यातही 5 कंपन्यांसाठी आयपीओ आणण्याची मुदत संपणार आहे. सेबीकडून मंजुरी मिळाल्यानंतर एका वर्षाच्या आत कंपनीला आयपीओ लाँच करावा लागतो. जर कंपन्यांनी या कालावधीत आयपीओ आणला नाही तर त्यांना पुन्हा रेग्युलेटरकडे ड्राफ्ट पेपर दाखल करावा लागतो.

या कंपन्यांचे आयपीओ येणार होते

ज्या कंपन्यांसाठी आयपीओची अंतिम मुदत फेब्रुवारीमध्ये संपणार आहे त्यामध्ये एपीआय होल्डिंग्स प्रमुख आहेत. कंपनीला 17 फेब्रुवारी 2022 रोजी आयपीओ आणण्यासाठी सेबीकडून मंजुरी मिळाली होती. एपीआय होल्डिंग्सची आयपीओद्वारे बाजारातून 6250 कोटी रुपये उभारण्याची योजना होती. सीएमआर ग्रीन टेक (CMR Green Tech IPO) च्या IPO ला सेबीने 16 फेब्रुवारी 2022 पासून मान्यता दिली होती. कंपनीची योजना बाजारातून 2000 कोटी रुपये उभारण्याची होती. वेलनेस फॉरएव्हर (Wellness Forever IPO) च्या IPO ला सेबीने 16 फेब्रुवारी 2022 रोजी मान्यता दिली. कंपनीची योजना 1500 कोटी रुपये उभारण्याची होती. पण जर कंपनीने फेब्रुवारी 2023 पर्यंत आयपीओ आणला नाही तर ड्राफ्ट पेपर पुन्हा भरावा लागेल. कॅपिटल स्मॉल फायनान्स बँकेचा IPO (Capital Small Finance Bank IPO) SEBI ने 8 फेब्रुवारी 2022 रोजी मंजूर केला. कंपनी IPO च्या माध्यमातून 1000 कोटी रुपये उभारण्याच्या प्रक्रियेत होती. पण आयपीओ आणण्याची मुदतही पुढील महिन्यात संपणार आहे. जेसन्स इंडस्ट्रीज (Jesons Industries) आयपीओ द्वारे 900 कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत होती आणि कंपनीला 8 फेब्रुवारी 2022 रोजी आयपीओ आणण्यासाठी सेबीकडून मंजुरी मिळाली. आता यासाठी आयपीओ आणण्याची मुदत फेब्रुवारीमध्ये संपणार आहे.