Tata Mutual Fund: टाटा म्युच्युअल फंड हाऊसच्या टाटा बॅंकिंग ॲण्ड फायनान्शिअल सर्व्हिस फंड (Tata Banking & Financial Service Fund)मध्ये सुरूवातीपासून गुंतवणूकदारांनी 10 हजार रुपये प्रति महिना अशी गुंतवणूक केली असती तर आजच्या घडीला त्याची किमान 8.40 लाख रुपयांची गुंतवणूक झाली असती आणि आजच्या मार्केट व्हॅल्युनुसार त्याची किंमत 13 लाख रुपये झाली असती. म्हणजे या फंडमधून गुंतवणूकदारा 7 वर्षांत 4.60 लाख रुपयांचा नफा मिळाला असता.
टाटा बॅंकिंग ॲण्ड फायनान्शिअल सर्व्हिस फंडचा इतिहास काय?
भारतातील बॅंकिंग आणि फायनान्शिअल सर्व्हिस इंडस्ट्रीमधील कंपन्यांमध्ये किमान 80 टक्के गुंतवणूक, हा या फंडचा प्राथमिक उद्देश आहे. टाटा बॅंकिंग ॲण्ड फायनान्शिअल सर्व्हिस फंड हा 28 डिसेंबर, 2015 मध्ये ओपन झाला होता. आता या फंडला 7 वर्षे पूर्ण झाली आहेत. या फंडला व्हॅल्यू रिसर्च (Value Research) या संस्थेकडून थ्री स्टार रेटिंग देण्यात आले आहे. 30 ऑक्टोबर, 2022च्या फॅक्टशीटनुसार, या म्युच्युअल फंडचा कम्पाऊंट अॅन्युअल ग्रोथ रेट (CAGR) हा सुरूवातापासून 13.57 टक्के राहिला आहे.
टाटा बॅंकिंग ॲण्ड फायनान्शिअल सर्व्हिस फंडची कामगिरी!
प्रत्येक महिन्याला 10 हजार रुपयांच्या एसआयपीद्वारे तुमची या फंडमध्ये प्रत्येक वर्षीला 1.20 लाख रुपयांची गुंतवणूक होते. या गुंतवणुकीच्या रकमेवर अर्थात प्रत्येक गुंतवणूकदाराला वाढ अपेक्षित आहे. म्हणजे मी गुंतवलेल्या रकमेपेक्षा त्यावर अधिक परतावा मिळाला पाहिजे. एका वर्षात तुम्ही गुंतवलेल्या रकमेवर वार्षिक 20.42 टक्के परताव्याने 1.20 लाख रुपयांचे 1.32 लाख रुपये होतील. तिच गुंतवणूक तुम्ही 3 वर्षांसाठी केल्यास तुमचे गुंतवणूक 3.60 लाख रुपये होईल आणि 3 वर्षात 17.09 टक्के दराने परतावा मिळाल्यास तुमची एकूण गुंतवणूक 4.63 लाख रूपये होऊ शकते.
5 वर्षांत 6 लाखाच्या गुंतवणुकीचे मूल्य 8.37 लाख रुपये!
तर गेल्या 5 वर्षात टाटा फंड हाऊसच्या या बॅंकिंग आणि फायनान्स फंडने 13.30 टक्के परतावा दिला आहे. जर प्रत्येक महिन्याला 10 हजार रुपयांची एसआयपी केली असती तर या 5 वर्षांत 6 लाख रुपयांची गुंतवणूक झाली असती आणि त्या गुंतवणुकीची व्हॅल्यू 8.37 लाख रुपये झाली असती. म्हणजेच हा फंड ओपन झाल्यापासून यामध्ये प्रत्येक महिन्याला 10 हजार रुपयांची गुंतवणूक केली असती तर 13.57 टक्क्यांच्या हिशोबाने गुंतवणूकदाराचे 8.20 लाख रुपयांचे 13.13 लाख रुपये व्हॅल्यू झाली असती.
डिसक्लेमर: या बातमीमधून कोणताही आर्थिक किंवा व्यावसायिक सल्ला दिलेला नाही. आर्थिक किंवा व्यवसायिक विषयांशी संबंधित सल्ला हवा असल्यास आपण नोंदणीकृत वित्त सल्लागाराची मदत घ्यावी.