उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, टाटा मोटर्सच्या नेक्सन ईव्ही (Tata Nexon EV) या इलेक्ट्रिक कारनं ग्राहकांना भुरळ घातली आहे. सर्वसामान्य नागरिकांची या कारला पसंती मिळत असल्याचं दिसत आहे. या कारचे अल्पावधीतच 50000 यूनिट्स विकले गेले आहेत. सध्याच्या घडीला नेक्सन ईव्ही देशातल्या 500हून अधिक शहरांत विकली जात आहे. तर देशातल्या विविध भागांत या इलेक्ट्रिक एसयूव्हीला (Sport utility vehicle) जवळपास 900 मिलियन किलोमीटरहून अधिकवेळा चालवण्यात आलं आहे.
वाढलेल्या चार्जिंग स्टेशन्समुळे अधिक प्रतिसाद
वाढलेल्या विक्रीबद्दल कंपनीनं सविस्तर माहिती दिली. कंपनीने सांगितलं, की नेक्सन ईव्हीचे चालक सरासरी 100 ते 400 किमीपर्यंत इंटरसिटी आणि आऊटस्टेशन ट्रिपवर एक महिन्यामध्ये जवळपास 6.3 किलोमीटरचं ड्राइव्हिंग करत आहेत. वाढलेल्या चार्जिंग स्टेशनमुळे हे शक्य होत आहे. आर्थिक वर्ष 2011 आणि 2013 यादरम्यान 150 टक्के अधिक वाढ दिसून येत आहे. सध्या देशात 6000पेक्षा जास्त चार्जिंग स्टेशन आहेत.
Together, #NexonEV50kCommunity is forging a new path, one that's powered by electric dreams and a passion for change. Join us as we continue to drive towards a greener, cleaner, and more exhilarating future. Cheers to 50,000 and beyond!#50kCommunity #TATAMotors #TATA #NexonEV pic.twitter.com/KHZIKB8J9F
— Tata Passenger Electric Mobility Limited (@Tatamotorsev) June 27, 2023
स्टायलिश अन् प्रॅक्टिकल
टाटा नेक्सननं जे साध्य केलं त्यावर टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे (Tata Passenger Electric Mobility Ltd) मार्केटिंग, सेल्स आणि सर्व्हिस स्ट्राटेजी हेड विवेक श्रीवत्स यांनी सांगितलं, की नेक्सन ईव्हीला एक उत्कृष्ट, स्टायलिश, प्रॅक्टिकल आणि रियल वर्ल्ड सॉल्यूशनच्या उद्देशानं इलेक्ट्रिक एसयूव्ही प्रकारात बनवण्यात आलं आहे.
तीन व्हेरिएंट्स
भारतीय बाजारात नेक्सन ईव्ही तीन वेरिएंट्स प्राइम, मॅक्स आणि डार्कमध्ये उपलब्ध आहे. सुरुवातीची किंमत 14.50 लाख (एक्स-शोरूम) आहे. एका चार्जिंगमध्ये 453 किलोमीटरपर्यंत ती चालू शकते. टाटा मोटर्सनं अलिकडेच नेक्सन ईव्ही मॅक्स एक्सझेड प्लस एलयूएक्स (EV MAX XZ+ LUX) 18.9 लाख रुपये (एक्स-शोरूम, 3.3 किलोवाट एसी चार्जर) सुरुवातीच्या किंमतीसह सादर केली.