TATA Motors Discount Offers : गेल्या काही वर्षांत टाटा मोटर्स कंपनीने ग्राहकांच्या मागणीनुसार गाड्यांचे नवनवीन मॉडेल लॉण्च केले आहेत. यामुळे भारतीय कार मार्केटमध्ये टाटा मोटर्स कंपनीचा वाटा वाढला आहे. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीनंतर टाट कंपनीने मार्केटमध्ये पुन्हा एकदा आपले स्थान मजबूत करण्यावर भर दिला आहे. याचाच भाग म्हणून कंपनीने आपल्या काही निवडक मॉडेल्सवर 40 हजार रूपयांची सवलत ऑफर जाहीर केली आहे. जर तुम्ही 31 ऑगस्टपूर्वी टाटाची कार खरेदी करत असाल तर ही तुमच्यासाठी नक्कीच फायद्याची बातमी ठरेल.
टाटा टिगोर (Tata Tigor)
टाटा कंपनीने Tata Tigor या श्रेणीतील XE आणि XM प्रकारच्या कारवर 10 हजार रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट मिळणार आहे. तर दुसरीकडे XZ आणि त्यावरील व्हेरियंटवर ग्राहक योजने अंतर्गत 10 हजार आणि एक्सचेंज डिस्काउंटचे 10 हजार अशी एकूण 20 हजार रूपयांची सूट मिळणार आहे. याशिवाय या कारवर 3 हजार रुपयांची कॉर्पोरेट सूट देखील आहे. पण ही सवलत CNG प्रकारांवर लागू नाही.
टाटा नेक्सॉन (Tata Nexon)
टाटाच्या वेगवेगळ्या मॉडेलमधील ही नेक्सॉन ही SUV विभागातील सर्वात लोकप्रिय कार मानली जाते. Tata Nexon ही कार 5 हजार रूपयांपर्यंतच्या ऑफरसह उपलब्ध आहे. नेक्सॉनच्या पेट्रोल व्हेरियंटवर 3 हजार तर डिझेल व्हेरियंटवर 5 हजार रुपयांपर्यंतची सूट मिळते.
टाटा टियागो (TATA Tiago)
Tata Tiago या मॉडेलवर 33 हजार रुपयांपर्यंतची सवलत ऑफर उपलब्ध आहे. तर टियागोच्या XE, XM, आणि XT या प्रकारांमध्ये 10 हजार रूपयांची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. तसेच XZ आणि त्यावरील श्रेणीच्या कारवर ग्राहक योजने अंतर्गत 20 हजार रूपयांचा लाभ मिळू शकणार आहे. याशिवाय पेट्रोल कारवर 3 हजार रूपयांची सूट मिळणार आहे. ही सवलत योजना CNG गाड्यांवर लागू नाही.
टाटा सफारी (TATA SAFARI )
न्यू-जेन टाटा सफारी ही कार 40 हजार रूपयांच्या सवलतीसह उपलब्ध आहे. या कारवर ग्राहकांना इतर लाभ घेता येणार नाहीत.
टाटा हॅरियर (TATA HARRIER)
Tata Harrier या कारवर खरेदीदारांना 31 ऑगस्टपर्यंत 40 हजार रूपयांचा एक्स्चेंज डिस्काउंट मिळणार असून याव्यतिरिक्त 5 हजार रूपयांचा अतिरिक्त कॉर्पोरेट फायदा ही मिळणार.
image source : https://tinyurl.com/ymzvjdm2