बिसलेरी ही बाटलीबंद पाण्याची सेवा देणारी भारतातील सर्वांत मोठी कंपनी आहे. या कंपनीतील मोठा भाग खरेदी करण्याची इच्छा टाटा समुहाने दाखवली होती. पण या चर्चेला मूर्त स्वरूप येत नव्हते. ही चर्चा मुल्यांकनावर अडकल्याचे बोलले जाते. बिसलरीचे मालक यांना या करारातून 1 अब्ज डॉलरची अपेक्षा होती. पण दोन्ही कंपन्यांमध्ये यावर सहमती होत नसल्याने चर्चा पुढेच जात नव्हती. ही चर्चा अजूनही पुढे जाऊ शकते, असे मार्केटमधील काही जणांचे मत आहे. पण प्रत्यक्षात मात्र यावर टाटा आणि बिसलरी समुहातून यावर कोणीच भाष्य केलेले नाही.
बिसलेरी वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, जयंतीलाल चौहान यांनी 1949 मध्ये सॉफ्ट ड्रिंक्सची निर्मिती करणाऱ्या पार्ले ग्रुपची स्थापना केली होती. या ग्रुपद्वारे चौहान यांनी 1969 मध्ये इटलीच्या कंपनीकडून बिसलेरी कंपनी विकत घेतली होती. भारतातील बाटलीबंद पिण्याच्या व्यवसायामध्ये बिसलेरीचा वाटा 60 टक्क्यांहून अधिक आहे. बिसलेरीचे मालक यांचे वय 82 वर्षे झाल्याने त्यांना हा व्यवसाय आता सांभाळणे कठीण होऊ लागले आहे. त्यात चौहीन यांची मुलगी जयंती चौहान हिने हा व्यवसाय सांभाळण्यास नकार दिल्याने बिसलेरी विकण्याचा निर्णय चौहान यांनी घेतल्याचे बोलले जाते. दरम्यान, याबाबत बिसलेरी कंपनी टाटा समुहाला विकण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे चौहान यांनी नोव्हेंबर 2022 मध्ये एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.
रमेश चौहान कोण आहेत?
बिसलेरी कंपनीचे संचालक असलेले रमेश चौहान यांनी पार्ले ग्रुपद्वारे कोल्ड्रिन्क्समधील अनेक ब्रॅण्डस नावारूपाला आणले. त्यांनी बिसलेरीमार्फेत मिनरल वॉटरबरोबरच फोन्झो, स्पाईसी, लिमोनाटा, पिनाकोलाडा आदी ब्रॅण्ड्स मार्केटमध्ये आणले आहेत. चौहान यांनी थम्सअप, गोल्डस्पॉट, माझा, लिम्का आदी ब्रॅण्ड नावारूपास आणले होते.
जयंती चौहानने का दिला नकार!
रमेश चौहान यांची एकुलती एक मुलगी आहे, जयंती चौहान. तिचे वय 37 वर्षे असून ती बिसलेरी इंटरनॅशनल कंपनीची व्हाईस चेअरपर्सन आहे. ती तिच्या 24 व्या वर्षांपासून या व्यावसायात आहे. पण तिला आता वडिलांच्या पारंपरिक व्यावसायात इंटरेस्ट नाही. त्यामुळे रमेश चौहान यांनी हा व्यवसाय विकण्याची तयारी दर्शवली आहे.
टाटा समूहाकडून बिसलेरी कंपनी ताब्यात घेतल्यास भारतातील बाटलीबंद पाण्याच्या व्यवसायात टाटा ग्रुपची मक्तेदारी होऊ शकते. कारण एकट्या बिसलेरीचा मार्केटमधील वाटा 60 टक्के आहे. सध्या टाटा समुहाकडे हिमालयन नॅचरल मिनरल वॉटर आणि टाटा वॉटर प्लस हे पिण्याच्या पाण्याचे ब्रॅण्ड आहेत.