Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tamilnad Mercantile Bank IPO; सबस्क्राईब करण्यापूर्वी 'या' 15 गोष्टी जाणून घ्या!

Tamilnad Mercantile Bank IPO; सबस्क्राईब करण्यापूर्वी 'या' 15 गोष्टी जाणून घ्या!

Tamilnad Mercantile Bank IPO : तमिळनाड मर्केंनटाईल बॅंकेचा आयपीओ सबस्क्रीप्शन बुधवारी (दि.7 सप्टेंबर) बंद होणार आहे. पण या आयपीओसाठी सबस्क्राईब करण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घेणं तुमच्या फायद्याचं ठरू शकतं.

Tamilnad Mercantile Bank IPO : तमिळनाड मर्केंटाईल बॅंकेचा आयपीओ (Initial Public Offer-IPO) पुढील आठवड्यात 5 सप्टेंबरला ओपन होणार आहे. तमिळनाड बॅंकेला सुमारे 100 वर्षांची परंपरा असून, ही बॅंक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना कर्ज देते. तमिळनाड बॅंकेने आयपीओची प्राईस ब्रॅण्ड व्हॅल्यू 500 ते 525 रुपये ठेवली तर इश्यू साईज 28 असणार आहे. आयपीओच्या माध्यमातून कंपनीने 831.6 कोटी रुपये उभारण्याचा मानस केला आहे. या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घेणं फायद्याचं ठरू शकतं.

Table of contents [Show]

तमिळनाड मर्केंटाईल बॅंकेचा आयपीओ कधी ओपन होणार आहे?

तमिळनाड मर्केंटाईल बॅंकेचा आयपीओ सोमवारी (दि. 5 सप्टेंबर) सबस्क्रीप्शनसाठी ओपन होणार आहे.

तमिळनाड मर्केंटाईल बॅंकेच्या आयपीओ सबस्क्रीप्शन कधी बंद होणार?

तमिळनाड मर्केंटाईल बॅंकेच्या आयपीओचे सबस्क्रीप्शन बुधवारी (दि. 7 सप्टेंबर) बंद होईल.

आयपीओचा प्राईस ब्रॅण्ड काय आहे?

तमिळनाड मर्केंटाईल बॅंकेच्या आयपीओ प्राईस बॅण्ड 500 ते 525 रुपये अशी निश्चित करण्यात आली.

तमिळनाड बॅंकेच्या आयपीओचा इश्यू साईज काय आहे?

बॅंकेने 10 रूपयांच्या प्रारंभिक मूल्याचे एकूण 1,58,40,000 इक्विटी शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. प्राईस बॅण्डच्या अप्पर किमतीतून कंपनी 831.60 कोटी रुपये उभारणार आहे.

आयपीओच्या माध्यमातून जमा झालेल्या निधीतून तमिळनाड बॅंकेचे प्लॅन काय आहेत?

तमिळनाड मर्केंटाईल बॅंक आयपीओच्या माध्यमातून मिळालेल्या निधीचा उपयोग बॅंकेच्या भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी करणार आहे. 


तमिळनाड मर्केंटाईल बॅंकेच्या आयपीओचा लॉट साईज काय आहे?

तमिळनाड बॅंक आयपीओच्या एका इश्यूमध्ये 28 लॉट असणार असून याची किंमत 14,700 रुपये आहे. किरकोळ गुंतवणूकदार जास्तीत जास्त 13 लॉटसाठी नोंदणी करू शकतात.

तमिळनाड मर्केंटाईल बॅंकेचा मागील वर्षातील कामगिरी कशी होती?

तमिळनाड बॅंकेने 31 मार्च, 2022 रोजी संपलेल्या वर्षात 821.9 कोटी रूपयांच्या नफा मिळवला होता. तर 4,654.44 कोटी रूपयांच्या महसुलाची नोंद केली होती. तर त्या अगोदरच्या वर्षात 603.33 कोटी रुपयांच्या नफ्यासह 4,253.4 कोटी रुपयांच्या महसुलाची नोंद केली होती.

तमिळनाड मर्केंटाईल बॅंक नेमकं काय करते?

तमिळनाड मर्केंटाईल बॅंक (Tamilnad Mercantile Bank) ही भारतातील सर्वांत जुनी खाजगी बॅंक आहे. ही बॅंक किरकोळ ग्राहकांसाठी बॅंकिंग सेवा आणि वेगवेगळ्या फायनान्शिअल सेवा पुरवते. तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना कर्ज पुरवते. बॅंकेला सुमारे 100 वर्षांचा इतिहास असून किरकोळ गुंतवणूकदारांसह शेती आणि लहान उद्योग कंपन्या बॅंकेचे ग्राहक आहेत.

तमिळनाड मर्केंटाईल बॅंकेचे नेटवर्क कसे आहे?

तमिळनाड बॅंकेचे एकूण 50.8 लाख ग्राहक आहेत; त्यातील 41.8 लाख म्हणजेच सुमारे 85 टक्के ग्राहक हे तमिळानाडूमधून आहेत. याव्यतिरिक्त बॅंकेच्या गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि दिल्ली इथे शाखा आहेत. 31 मार्च, 2022 नुसार बॅंकेच्या एकूण 509 शाखा असून त्यातील 106 शाखा ग्रामीण भागात, 247 शाखा निमशहरी भागात, 80 शाखा शहरांत आणि 76 शाखा मेट्रो शहरांमध्ये आहे.

तमिळनाड मर्केंटाईल बॅंकेची आर्थिक स्थिती कशी आहे?

आर्थिक वर्ष 2022 मध्ये बॅंकेची एकूण नॉन-परफॉर्मिंग असेट 1.69 टक्के आहे; जी त्या अगोदरच्या वर्षी 3.44 टक्के होती. बॅंकेचा चालू खाते आणि बचत खात्याच्या प्रमाणात (CASA Ratio) 2022 मध्ये सुधारणा झाली. मागील वर्षी हे प्रमाण 28.52 टक्के होते. जे आता 30.5 टक्के आहे. बॅंकेकडे एकूण 44,933.12 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.

तमिळनाड मर्केंटाईल बॅंकेच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी किती हिस्सा राखीव आहे?

तमिळनाड बॅंकेने आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 10 टक्के राखीव कोटा ठेवला आहे. पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (Qualified Institutional Buyer-QIB) 75 टक्के कोटा आणि बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (Non-Institutional Investor-NII) 15 टक्के कोटा आहे.

तमिळनाड मर्केंटाईल बॅंकेच्या आयपीओचे वाटप केव्हा होईल?

तमिळनाड बॅंकेच्या आयपीओचे वाटप 12 सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल आणि 13 सप्टेंबरपर्यंत ज्यांना लॉट लागला नाही. त्यांचे पैसे परत केले जातील. त्यानंतर 14 सप्टेंबरपर्यंत लॉट लागलेल्या गुंतवणूकदारांच्या डीमॅट खात्यात शेअर्स जमा होतील.

तमिळनाड मर्केंटाईल बॅंकेचे लिस्टिंग केव्हा होईल?

तमिळनाड मर्केंटाईल बॅंकेचे शेअर मार्केटमध्ये 15 सप्टेंबर, 2022 रोजी लिस्टिंग होऊ शकते.

तमिळनाड मर्केंटाईल बॅंकेच्या आयपीओचे स्थिती (Status) कुठे पाहता येईल?

गुंतवणूकदारांना तमिळनाड मर्केंटाईल बॅंकेच्या आयपीओची स्थिती लिंक इनटाईम इंडिया या वेबसाईटवर पाहता येऊ शकेल.

तमिळनाड बॅंकेच्या आयपीओचे बुकिंग मॅनेजर कोण आहेत?

अ‍ॅक्सिस कॅपिटल (Axis Capital), मोतीलाल ओसवाल (Motilal Oswal) आणि एसबीआय कॅपिटल मार्केट (SBI Capital Market) या कंपन्या लीड मॅनेजर म्हणून काम पाहणार आहेत.