Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

तमिळनाड मर्केंनटाईल बॅंकेचा 5 सप्टेंबरला येतोय आयपीओ, जाणून घ्या सर्वकाही!

Tamilnad Mercantile Bank IPO

Tamilnad Mercantile Bank IPO : तमिलनाड मर्केंटाईल बॅंकेचा आयपीओ (Initial Public Offer-IPO) पुढील आठवड्यात येत आहे. या बॅंकेला सुमारे 100 वर्षांची परंपरा असून, तमिलनाड बॅंक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना कर्ज देते.

Tamilnad Mercantile Bank IPO : खाजगी क्षेत्रातील उद्योगांना मोठ्या प्रमाणात कर्ज देणारी तमिळनाड मर्केंटाईल बॅंक पुढील आठवड्यात आयपीओ (Initial Public Offer-IPO) आणत आहे. तमिळनाड मर्केंटाईल बॅंक ही सुमारे 100 वर्ष जुनी बॅंक आहे. या बॅंकेचा 5 सप्टेंबर रोजी आयपीओ ओपन होणार असून तो 7 सप्टेंबरला बंद होणार आहे.

तमिळनाड मर्केंटाईल बॅंकेने आयपीओची प्राईस ब्रॅण्ड व्हॅल्यू 500 ते 525 रुपये ठेवली तर इश्यू साईज 28 असणार आहे. आयपीओच्या माध्यमातून कंपनी 831.6 कोटी रुपये उभे करणार असल्याचे समजते. अ‍ॅक्सिस कॅपिटल (Axis Capital), मोतीलाल ओसवाल (Motilal Oswal) आणि एसबीआय कॅपिटल मार्केट (SBI Capital Market) या कंपन्या लीड मॅनेजर म्हणून काम पाहणार आहेत.


तमिळनाड मर्केंटाईल बॅंकेचा इतिहास

तमिळनाडूमधील तुतीकोरिन या शाखेपासून सुरूवात झालेल्या तमिळनाड मर्केंटाईल बॅंक (Tamilnad Mercantile Bank) ही देशातील सर्वांत जुन्या खाजगी बॅंकांपैकी एक आहे. या बॅंकेला 100 वर्षांचा इतिहास असून ही प्रामुख्याने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगधंद्यांना (MSME), कृषि आणि किरकोळ ग्राहकांना बॅंकिंगसेवेसोबतच कर्ज पुरवठा करते. तमिळनाड मर्केंटाईल बॅंकेच्या 30 जून, 2021 पर्यंत बॅंकेच्या 509 शाखा आहेत. यातील 106 शाखा ग्रामीण भागात, 247 शाखा निम्न शहरी भागात, तर 80 शाखा शहरी भागात आणि 76 शाखा या महानगरांमध्ये आहेत.

तमिळनाड मर्केंटाईल बॅंकेच्या आयपीओचे अ‍ॅंकर बुकिंग 2 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. तर 14 सप्टेंबरला आयपीओचा इश्यू मिळालेल्या गुंतवणूकदारांच्या खात्यात इश्यू जमा होतील आणि 15 सप्टेंबरपासून मार्केटमध्ये त्याचे लिस्टिंग होईल.