सॅंडविच, बर्गर, व्हेजिटेबल्स रॅप या सारख्या फास्टफूडने ग्राहकांच्या जिभेचा ताबा मिळवणाऱ्या 'Subway' या अमेरिकन फास्टफूड रेस्टॉरंट कंपनीची अखेर विक्री झाली. रोआर्क कॅपिटल ग्रुपने 'Subway' साठी एकूण 9.55 बिलियन डॉलर्स (भारतीय चलनात 78000 कोटी रुपये) मोजले आहेत. हा व्यवहार पूर्ण झाल्याचे निवेदन 'Subway' ने जाहीर केले. यामुळे जवळपास 100 देशांत विस्तारलेल्या 37000 'Subway'रेस्टॉरंट सुरु राहणार की बंद होणार याची ग्राहकांमध्ये उत्सुकता लागली आहे. (Roark Capital Group Acquired SubWay)
सन 1965 मध्ये अमेरिकेतील ब्रिजपोर्ट शहरात फ्रेड डेलुका यांनी 'Subway'ची सुरुवात केली होती. पीटर बर्ग यांनी 'Subway'साठी सुरुवातीला अर्थसहाय्य केले होते. पुढे फ्रेड डेलुका आणि पीटर बक यांनी भागिदारी आणखी मजबूत करत जगभर 'Subway' फ्रॅंचाईजचा विस्तार केला.
मात्र फ्रेड डेलुका आणि पीटर बर्ग यांच्यात वारसांत मतभेद झाल्याने 'Subway' ची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. फेब्रुवारी 2023 पासून 'Subway'च्या विक्रीसाठी गुंतवणूकदारांकडून प्रस्ताव मागवण्यात आले होते. यात टीडीआर कॅपिटल, Sycamore Partners आणि Roark Capital Group यांच्यात स्पर्धा होती. अखेर Roark Capital Group चा प्रस्ताव सरस ठरला.
मागील 58 वर्षात 'Subway'ने 100 हून अधिक देशांत फ्रॅंचाईजचा विस्तार केला आहे. वर्ष 2022 अखेर 'Subway'चे 37000 हून अधिक रेस्टॉरंट सुरु असून जगभरात 4 लाख 10 हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.
फास्टफूड मार्केटमध्ये Roark Capital Group चे वर्चस्व
'Subway' कंपनीला ताब्यात घेण्यापूर्वी Roark Capital Group ने अमेरिकेतील अनेक फास्ट फूड कंपन्यांना खरेदी केले आहे. यात डंकिन डोनेट्स, बास्किन रॉबिन्स, Arby's आणि बफालो वाईल्ड विंग्जसारख्या फास्टफूड मेकर्स कंपन्यांवर ताबा मिळवला आहे. आता यात 'Subway'चा समावेश झाल्याने अमेरिकेतील सर्वात मोठी फूड चेन Roark Capital Group कडे असल्याचे बोलले जाते.फास्टफूड फ्रॅंचाईज मॉडेलमध्ये Roark Capital Group आघाडीवर आहे. Roark Capital Group कडे एकूण 37 बिलियन डॉलर्सची मालमत्ता व्यवस्थानाअंतर्गत आहे.
अखेर 60 वर्षांची भागिदारी संपुष्टात
- अमेरिकेतील ब्रिजपोर्ट शहरात सन 1965 मध्ये फ्रेड डेलुका यांनी 'Subway'हे छोटेखानी रेस्टॉरंट सुरु केले.
- त्यांचे कौटुंबिक मित्र पीटर बक यांनी या व्यवसायाला आर्थिक मदत केली होती.
- 'Subway'ने काही दशकांत अमेरिकेत आपला जम बसवला.
- डेलुका आणि पीटर बर्ग दोघे 50% हिश्श्यासह 'Subway'मधील पार्टनर झाले.
- पुढे दोघांचे निधन झाले.फ्रेड डेलुका यांनी 'Subway'मधील 50% हिस्सा पत्नी एलिसाबेथ आणि मुलगा जोनाथन यांच्या नावे केला.
- पीटर बक यांनी 50% हिस्सा त्यांची मुले ख्रिस्तोफर आणि विल्यम यांच्या नावे केला आहे.
- मात्र दोन्ही कुटुंबांच्या वारसांमध्ये मतभेद झाल्याने 'Subway'ची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला.
- Roark Capital Group ने 'Subway'साठी सर्वोत्तम खरेदीचा प्रस्ताव सादर केला.
- 'Subway'च्या विक्रीने फ्रेड डेलुका आणि पीटर बक यांच्यातील 60 वर्षांची भागिदारी संपुष्टात आली.