Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Study in Abroad: जर्मनीतील विद्यापीठांमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना शिकवणी शुल्कच भरावे लागत नाही...

Study in Abroad

Study in Abroad: डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळे(Depreciation of Rupee against Dollar) परदेशात शिक्षण घेणे आता महाग झाले आहे. परदेशात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी इंग्लंड, अमेरिकेपेक्षा जर्मनीला देतायत अधिक पसंती.

Study in Abroad: डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळे(Depreciation of Rupee against Dollar) परदेशात शिक्षण घेणे आता महाग झाले आहे. एका विद्यार्थ्यांसाठी अमेरिकेत हाच शिक्षणाचा खर्च वर्षाला दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत वाढला गेला आहे. याशिवाय अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षण शुल्काच्या दरात 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे परदेशात शिक्षण(Education) घेणे आता महाग झाले आहे. तुम्हाला माहित आहे का? जर्मनीतील राज्य-अनुदानित विद्यापीठांमध्ये(State-funded universities in Germany) शिकणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना शिकवणीसाठी शुल्क भरावे लागत नाही. जर्मनीतील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी हा सर्वात मोठा फायदा असल्याने भारतीय विद्यार्थ्यांसाठी हा मोठा दिलासा ठरत आहे.

जर्मन सरकारकडून शिक्षणावर मिळणार अनुदान

जर्मनीसारखे देश परवडणाऱ्या किमतीमध्ये भारतीय विद्यार्थ्यांसाठी विविध अभ्यासक्रम उपलब्ध करून देतात. जर्मन शैक्षणिक विनिमय सेवाच्या (DAAD) अलीकडील अहवालानुसार, जर्मनीमध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या 2017 मध्ये 17,570 वरून 2021 मध्ये 34,134 पर्यंत पोहचली आहे. जर्मन सरकार शिक्षणासाठी देत असलेल्या अनुदानामुळे विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. 
तुम्हाला माहित आहे का? जर्मनीतील राज्य-अनुदानित विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना(International Students) शिकवणीसाठी शुल्क(Education Fees) भरावे लागत नाही. जर्मनीतील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी हा सर्वात मोठा फायदा असल्याने भारतीय विद्यार्थ्यांसाठी हा मोठा दिलासा ठरत आहे.

स्टुडंट व्हिसा मिळण्यास बराच विलंब

भारतातील लाखो विद्यार्थ्यांना यूएस, यूके, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये जाण्यासाठी अजूनही स्टुडंट व्हिसा(Student Visa) मिळाला नाहीये, तो मिळण्यास बराच विलंब होत आहे, तर ज्या विद्यार्थ्यांना मान्यता मिळाली आहे त्यांना डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळे महागाईचा सामना करावा लागणार आहे. याशिवाय हॉस्टेल(Hostel) आणि होमस्टेच्या(Homestay) किंमतीही वाढल्यामुळे परदेशात राहणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांना राहण्यासाठी जागा शोधण्यात अडचणी निर्माण होणार आहेत. इतर देशांकडून स्टुडंट व्हिसाच्या मंजुरीला विलंब होत असल्याने त्याचाच फायदा जर्मनीला होताना दिसत आहे.

व्हिसाच्या विलंबामुळे विद्यार्थ्यांची निवड बदलत चालली आहे

बरेच विद्यार्थी STEM अभ्यासक्रमांसाठी युनायटेड स्टेट्सला पसंत करतात तर गैर-STEM अभ्यासक्रमांसाठी युनायटेड स्टेट्स आणि ऑस्ट्रेलियाला पसंती दर्शवतात.   पूर्वी यूएस, यूके, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या देशांना विद्यार्थ्यांची पहिली पसंती असायची मात्र सध्या व्हिसाच्या विलंबामुळे जर्मनी, स्पेन, फ्रान्स, पोर्तुगाल आणि यूएई सारखे देश उच्च शिक्षणासाठी पसंतीचे ठिकाण म्हणून नव्याने उदयास आले आहेत. 
उद्योग तज्ज्ञांच्या मते, यूएस, यूके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड आणि न्यूझीलंड यांसारख्या देशांमध्ये जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या 2022 च्या सुरुवातीला सुमारे 10 लाख होती जी महामारी पूर्व पातळीच्या जवळपास दुप्पट होती. त्याचप्रमाणे व्हिसा अर्जांची संख्या पूर्वीपेक्षा खूप वाढली असून त्यामुळे व्हिसाच्या मंजुरीला विलंब होत आहे.