Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Stock Market Opening: आयटी कंपन्यांचे शेअर्स कोसळले! शेअर बाजारात संमिश्र व्यवहार सुरू!

Stock Market Opening

Stock Market Opening Bell Today: आज, दिनांक 10 जानेवारी रोजी शेअर बाजार सुरू झाल्यानंतर काय घडले? कोणते स्टॉक वधारले, कोणत्या स्टॉकने उतरता क्रम घेतला ते या बातमीतून जाणून घ्या.

Trade setup for today: कालच्या वाढीनंतर, आज दिनांक 10 जानेवारी रोजी शेअर बाजारात मंद हालचाली सुरू आहेत. बाजार सुरु होताच, सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकात घसरण झाली आहे. सेन्सेक्स सुमारे 200 अंकांची घसरण झाली. त्याच वेळी निफ्टी देखील 18 हजार 50 च्या आसपास व्यवहार करत होता. मात्र त्यानंतर काही वेळातच, चित्र बदलले सेन्सेक्स 186 अंकांनी वधारला असून तो 60 हजार 561.22 च्या पातळीवर आहे. तर निफ्टी 45 ​​अंकांनी वाढून 18057 च्या पातळीवर पोहोचला. सध्या आयटीचे शेअर्स सर्वाधिक विकले जात आहेत. आज बहुतांश आशियाई बाजार लाल रंगात दिसून आले आहेत.

आजच्या व्यवसायात वाहन (Auto) आणि धातू (Metal) समभागात खरेदी आहे. निफ्टीवर दोन्ही निर्देशांक अर्ध्या टक्क्यांहून अधिक मजबूत झाले आहेत. तर आयटी निर्देशांक 1 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. फार्मा आणि रियल्टी निर्देशांक सपाट आहेत तर बँक (Bank), वित्तीय (Financial) आणि रोजच्या वापरातील उपभोग्य वस्तू (FMCG: Fast-moving consumer goods) लाल चिन्हात आहेत.

कोणत्या शेअर्सचे दर वधारले आणि कोणते खालावले? (Which stocks rose and which fell?)

आज सेन्सेक्समध्ये 19 समभाग लाल रंगात व्यवहार करत आहेत. तर, 11 हिरव्या रंगात व्यवहार करत आहेत. आजच्या टॉप गेनर्समध्, टाटा मोटर्स (TATA MOTORS), टाटा स्टील (TATA STEEL), एम अँड एम (M&M), सन फार्मा (SUNPHARMA), बजाज फायनॅन्स (BAJ FINANCE), हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL: Hindustan Unilever Limited) यांचा समावेश आहे. सर्वाधिक नुकसान झालेल्यांमध्ये टिसीएस (TCS: Tata Consultancy Services), इन्फॉसिस (Infosys), एचडीएफसी बँक (HDFC Bank), टेक महिंद्रा (Tech Mahindra), विप्रो (Wipro), आयटीसी (ITC), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) यांचा समावेश आहे.

आशियातील स्टॉक मार्केटची स्थिती (The State of Asia's Stock Markets)

आजच्या व्यवहारात प्रमुख आशियाई बाजारांमध्ये संमिश्र कल दिसून येत आहे. एसजीएक्स (SGX: Singapore Exchange Limited) निफ्टीमध्ये 0.19 टक्क्यांची घट झाली आहे, तर निक्केई 225  (Nikkei 225) इंडेक्समध्ये 0.87 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे. तैवान वेटेड (Taiwan Capitalization Weighted Stock Index) आणि कोस्पी (Korea Stock) यांचा व्यापार सपाट झाला आहे. त्याच वेळी शांघाय कंपोझिट (Shanghai Composite) देखील 0.20 टक्क्यांनी घसरले आहे.